Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 7

43 Mantra
5/7
Devata- सोमो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- आर्षी बृहती,आर्षी जगती Swara- मध्यमः, निषाद
Mantra with Swara
अ॒ꣳशुर॑ꣳशुष्टे देव सो॒माप्या॑यता॒मिन्द्रा॑यैकधन॒विदे॑। आ तुभ्य॒मिन्द्रः॒ प्याय॑ता॒मा त्वमिन्द्रा॑य प्यायस्व। आप्या॑यया॒स्मान्त्सखी॑न्त्स॒न्न्या मे॒धया॑ स्व॒स्ति ते॑ देव सोम सु॒त्याम॑शीय। एष्टा॒ रायः॒ प्रेषे भगा॑यऽऋ॒तमृ॑तवा॒दिभ्यो॒ नमो॒ द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म्॥७॥

अ॒ꣳशुर॑ꣳशु॒रित्य॒ꣳशुःऽअ॑ꣳशुः। ते॒। दे॒व॒। सो॒म॒। आ। प्या॒य॒ता॒म्। इन्द्रा॑य। ए॒क॒ध॒न॒विद॒ऽइत्ये॑कधन॒ऽविदे॑। आ। तुभ्य॑म्। इन्द्रः॑। प्याय॑ताम्। आ। त्वम्। इन्द्रा॑य। प्या॒य॒स्व॒। आ। प्या॒य॒य॒। अ॒स्मान्। सखी॑न्। स॒न्न्या। मे॒धया॑। स्व॒स्ति। ते॒। दे॒व॒। सो॒म॒। सु॒त्याम्। अ॒शी॒य॒। एष्टा॒ इत्याऽइ॑ष्टाः। रायः॑। प्र। इ॒षे। भगा॑य। ऋ॒तम्। ऋ॒त॒वादिभ्य॒ इत्यृ॑तवा॒दिऽभ्यः॑। नमः॑। द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म् ॥७॥

Mantra without Swara
अँशुरँशुष्टे देव सोमाप्यायतामिन्द्रायैकधनविदे । आ तुभ्यमिन्द्रः प्यायतामा त्वमिन्द्राय प्यायस्व । आप्याययास्मान्त्सखीन्त्सन्या मेधया स्वस्ति ते देव सोम सुत्यामशीय । एष्टा रायः प्रेषे भगायऽऋतमृतवादिभ्यो नमो द्यावापृथिवीभ्याम् ॥

अꣳशुरꣳशुरित्यꣳशुःऽअꣳशुः। ते। देव। सोम। आ। प्यायताम्। इन्द्राय। एकधनविदऽइत्येकधनऽविदे। आ। तुभ्यम्। इन्द्रः। प्यायताम्। आ। त्वम्। इन्द्राय। प्यायस्व। आ। प्यायय। अस्मान्। सखीन्। सन्न्या। मेधया। स्वस्ति। ते। देव। सोम। सुत्याम्। अशीय। एष्टा इत्याऽइष्टाः। रायः। प्र। इषे। भगाय। ऋतम्। ऋतवादिभ्य इत्यृतवादिऽभ्यः। नमः। द्यावापृथिवीभ्याम्॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सोम) पदार्थांच्या गुणांना जाणणार्‍या हे (देव) दिव्यगुण संपन्न परमेश्‍वर, अथवा हे विद्वन्, वा विद्युत ! (ते) आपले आणि या विद्युतेचे सामर्थ्य (अंशुरंशूः) प्रत्येक अवयवांना, शरीराच्या अंगांना, (आप्यायतास) वाढवितो, अवयवांचे रक्षण करते. (इन्द्रः) आपण वा ही विद्युत दोघे (एकधनविदे) धर्माद्वारे व विज्ञानाद्वारे (इन्द्राय) परम ऐश्‍वर्ययुक्त (आप्यायताम्) माझी व माझ्या ऐश्‍वर्याची वृद्धी करतात (आप्यायस्व) ती आणखी वृद्धिंगत होवो. आपण व विद्युत पदार्थांच्या यथार्थ स्वरूपास प्रकट करणारे आहात, करणारी आहे. त्यामुळे (सन्न्या) यथार्थ ज्ञान देणार्‍या (मेधया) प्रज्ञेने (अस्मान्) आमची म्हणजे अध्यापक व अध्येताची (सखीन्) सर्वांच्या मित्रांची (आप्यायस्व) वृद्धी करा (मेधा बुद्धीचा उपयोग आम्ही विद्वज्ज्यांनी सर्वांचे मित्र म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी करावा) ज्यायोगे सर्वत्र (स्वस्ति) सदा सुख वाढत राहील. हे (सोम) पदार्थ विद्या व पदार्थांच्या गुणधर्मांना जाणणारे हे ईश्‍वर, आपण व हे विद्वन, आपल्या प्रेरणेने आणि विद्युतविद्येने युक्त होऊन मी (सुत्याम्) उत्तम वस्तूंच्या उत्पादनात कौशल्य प्राप्त करून (इषे) कार्यसिद्दीची इच्छा बाळगून वा अन्न आदीच्या प्राप्तीसाठी (भगाय) ऐश्‍वर्यासाठी (एष्टाः) अभीष्ट देणार्‍या (रायः) धनसंपदेला (अशीय) प्राप्त करावे आणि ते धन (ऋतवादिभ्यः) सत्यवादी विद्वानांना दान करून पुन्हा मी सत्य विद्येच्या सहाय्याने (द्यावापृथिवीभ्याम्) द्यूलोक आणि पृथ्वीपासून (ऋतम्) अधिकाधिक अन्न (व ऐश्‍वर्य) प्राप्त करण्यात समर्थ व्हावे. (अशी माझी अध्यापक आणि अध्येता या दोघांची इच्छा आहे) ॥7॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे (देव, इन्द्रः, इषे आदी शब्दात श्‍लेष आहे) मनुष्यांनी परमेश्‍वराची उपासना करावी,विद्वानांची सेवा करावी आणि विद्युतविद्येचा प्रसार करावा आणि याद्वारे शरीराला व आत्म्याला पुष्ट करणार्‍या औषधींचे तसेच अनेक प्रकारच्या धनांचे ग्रहण करून वैद्यक शास्त्राप्रमाणे सर्वांनी आनंदित राहावे ॥7॥
Subject
पुनश्‍च, ईश्‍वर, विद्युत आणि विद्वान कसे आहेत, ते पुढील मंत्रात सांगितले आहे -