Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 43

43 Mantra
5/43
Devata- यज्ञो देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
द्यां मा ले॑खीर॒न्तरि॑क्षं॒ मा हि॑ꣳसीः पृथि॒व्या सम्भव॑। अ॒यꣳहि त्वा॒ स्वधि॑ति॒स्तेति॑जानः प्रणि॒नाय॑ मह॒ते सौभ॑गाय। अत॒स्त्वं दे॑व वनस्पते श॒तव॑ल्शो॒ वि॒रो॑ह स॒हस्र॑वल्शा॒ वि व॒यꣳ रु॑हेम॥४३॥

द्याम्। मा। ले॒खीः॒। अ॒न्तरि॑क्षम्। मा। हि॒ꣳसीः॒। पृ॒थि॒व्या। सम्। भ॒व॒। अयम्। हि। त्वा॒। स्वधि॑ति॒रिति॒ स्वऽधि॑तिः। तेति॑जानः। प्र॒णि॒नाय॑ प्र॒ति॒नायेति॑ प्रऽनि॒नाय॑। म॒ह॒ते। सौभ॑गाय। अतः॑। त्वम्। दे॒व॒। व॒न॒स्प॒ते॒। श॒तवल्श॒ इति॑ श॒तऽव॑ल्शः। वि। रो॒ह॒। स॒हस्र॑वल्शा॒ इति॑ स॒हस्र॑ऽवल्शाः। वि। व॒यम्। रु॒हे॒म॒ ॥४३॥

Mantra without Swara
द्याम्मा लेखीरन्तरिक्षम्मा हिँसीः पृथिव्या सम्भव । अयँ हि त्वा स्वधितिस्तेतिजानः प्रणिनाय महते सौभगाय । अतस्त्वन्देव वनस्पते शतवल्शो विरोह सहस्रवल्शा वि वयँ रुहेम ॥

द्याम्। मा। लेखीः। अन्तरिक्षम्। मा। हिꣳसीः। पृथिव्या। सम्। भव। अयम्। हि। त्वा। स्वधितिरिति स्वऽधितिः। तेतिजानः। प्रणिनाय प्रतिनायेति प्रऽनिनाय। महते। सौभगाय। अतः। त्वम्। देव। वनस्पते। शतवल्श इति शतऽवल्शः। वि। रोह। सहस्रवल्शा इति सहस्रऽवल्शाः। वि। वयम्। रुहेम॥४३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान्, जयप्रमाणे मी सूर्याच्या समोर उभा राहून त्याच्या (द्यां) प्रकाशाला दृष्टिगोचर करीत नाही तू देखील दृष्टिगोचर करू नकोस. मी जसा प्रकाशापासून लाभ व उपयोग घेतो, तूही त्या लाभांपासून वंचित राहू नकोस). ज्याप्रमाणे मी (अंतरिक्षं) पदार्थांच्या विहार, भ्रमण, संचलन आदीसाठी असलेल्या अवकाशाला (वातावरणाला) विकृत वा प्रदूषित करीत नाहीं, त्याप्रमाणे तू देखील कधीही त्या वातावरणाला (मा) (हिंसी) विकृत वा दुषित करू नकोस. ज्याप्रमाणे मी (पृथिव्या) पृथ्वीसह विद्यमान आहे (पृथ्वीच्या निसर्ग, वनस्पती आदींना नष्ट करीत नाही) तसेच तू देखील निसर्ग व प्रकृतीसह जगण्यास (सं) (भव) तत्पर राहा. (हि) जसे (तेतिजानः) अत्यन्त तीक्ष्ण (स्वधितिः) वज्र शत्रूंचा विनाश करून ऐश्‍वर्य प्रदान करतो (अतः) यामुळे (अयं) हा वज्र (त्वा) तुला (महते) अत्यंत श्रेष्ठ (सौभगाय) सौभाग्याने संयुक्त करो. या सृष्टीवरील पदार्थ जसे ऐश्‍वर्य (प्रणिनाय) देतात, तसे तुलाही त्यांच्याकडून वैभव ऐश्‍वर्य मिळो. (देव) हे आनन्ददायक व (वनस्पते) वनांचे रक्षण करणार्‍या विद्वान, ज्याप्रमाणे एकवृक्ष (शतवल्शः) शंभराहून अधिक म्हणजे अनेक अंकुरांच्या रूपाने फलित होतो, त्याप्रमाणे तुही प्रशंसनीय सौभाग्याने (वि) (रोह) चांगल्याप्रकारे फलित म्हणजे वृद्धींगत हो तसेच (सहस्रवल्शाः) हजार अंकुर असलेला वृक्ष ज्याप्रमाणे अनेक रूपाने वाढतो. तसे आम्ही लोक देखील वरील सौभाग्य आणि ऐश्‍वर्याने फलित, पुष्पित अर्थात समृद्ध संपन्न व्हावे. ॥43॥
Essence
भावार्थ - येथे वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. या संसारात कोणाही मनुष्याने विद्येचा सदा निरंतर प्रचार-प्रसार करणे सोडू नये. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेऊन स्वकार्यामधे सर्वदा प्रगती केली पाहिजे. ॥43॥
Subject
यज्ञ परिपूर्ण व संपन्न करणारी जी विद्या आहे त्याचे मनुष्यांनी नित्य सेवन करावे, हेच मनुष्यांसाठी उचित कर्म आहे पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे-
Footnote
या पाचव्या अध्यायात खालील विषयांचे वर्णन केले आहे-^यज्ञानुष्ठान, यज्ञाचे स्वरूप, विद्वानांची आणि ईश्‍वराची प्रार्थना, विद्या आणि विद्वान यांच्या व्याप्तीचे निरूपण, अग्नी आदी पदार्थांद्वारे यज्ञसिद्धी, सर्व विद्या प्राप्तीसाठी वाणीचे महत्त्व, अध्ययन, अध्यापन, यज्ञाचे विवरण, योगाभ्यासाचे लक्षण, सृष्ट्युत्पत्ती, ईश्‍वर आणि सूर्याच्या कर्मांविषयी कथन, प्राण आणि अपानाची क्रिया, सर्वांचे नियमन करणाऱ्या परमेश्‍वराच्या व्याप्तीविषयी, यज्ञाचे अनुष्ठान, सृष्टीपासून लाभ घेणे, सूर्याच्या व सभाध्यक्षाच्या गुण यांचे कथन, यज्ञानुष्ठानाविषयी विधी आदींचे शिक्षण, सविता व सभाध्यक्षाच्या कर्त्तव्यांविषयी कथन, यज्ञामुळे कार्यसिद्धी, ईश्‍वर आणि सभाध्यक्षांपासून आपल्या कार्यांच्या पूर्ततेविषयी, त्यांचे स्वरूप आणि कर्त्तव्यांचे वर्णन, ईश्‍वर आणि विद्वान यांच्या कर्म, व्यवहार आणि लक्षणांविषयी, शूरवीरांच्या गुणांचे वर्णन, ईश्‍वर आणि विद्वान यांचे गुणकथन, ईश्‍वरोपासकांच्या गुणांविषयी, सर्व बंधनापासून मुक्ती, परस्परात चर्चा व संवाद आणि दुष्टांपासून मुक्त राहण्याची रीती ॥ पाचव्या अध्यायात सांगितलेल्या या अर्थांची वा विषयांची संगती चवथ्या अध्यायाच्या अर्थ आणि विषयांशी आहे जाणावे.^यजुर्वेदाच्या हिन्दी भाष्याच्या पाचवा अध्याय समाप्त.