Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 42

43 Mantra
5/42
Devata- अग्निर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- भूरिक् अत्यष्टि, Swara- धैवतः
Mantra with Swara
अत्य॒न्याँ२ऽअगां॒ नान्याँ२ऽउपा॑गाम॒र्वाक् त्वा॒ परे॒भ्योऽवि॑दं प॒रोऽव॑रेभ्यः। तं त्वा॑ जुषामहे देव वनस्पते देवय॒ज्यायै॑ दे॒वास्त्वा॑ देवय॒ज्यायै॑ जुषन्तां॒ विष्ण॑वे त्वा। ओष॑धे॒ त्राय॑स्व॒ स्वधि॑ते॒ मैन॑ꣳ हिꣳसीः॥४२॥

अति॑। अ॒न्यान्। अगा॑म्। उप॑। अ॒गा॒म्। अ॒र्वाक्। त्वा॒। परे॑भ्यः। अवि॑दम्। प॒रः॒। अव॑रेभ्यः। तम्। त्वा॒। जु॒षा॒म॒हे॒। दे॒व॒। व॒न॒स्प॒ते॒। दे॒व॒य॒ज्याया॒ इति॑ देवऽय॒ज्यायै॑। दे॒वाः। त्वा॒। दे॒व॒य॒ज्याया इति देवऽय॒ज्यायै॑। जु॒ष॒न्ता॒म्। विष्ण॑वे। त्वा॒। ओष॑धे। त्रा॑यस्व। स्वधि॑ते। मा। ए॒न॒म्। हि॒ꣳसीः॒ ॥४२॥

Mantra without Swara
अत्यन्याँ अगान्नान्याँ उपागामर्वाक्त्वा परेभ्योविदम्परो वरेभ्यः । तन्त्वा जुषामहे देव वनस्पतेदेवयज्यायै देवास्त्वा देवयज्यायै जुषन्ताँ विष्णवे त्वा । ओषधे त्रायस्व स्वधिते मैनँ हिँसीः ॥

अति। अन्यान्। अगाम्। उप। अगाम्। अर्वाक्। त्वा। परेभ्यः। अविदम्। परः। अवरेभ्यः। तम्। त्वा। जुषामहे। देव। वनस्पते। देवयज्याया इति देवऽयज्यायै। देवाः। त्वा। देवयज्याया इति देवऽयज्यायै। जुषन्ताम्। विष्णवे। त्वा। ओषधे। त्रायस्व। स्वधिते। मा। एनम्। हिꣳसीः॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वनस्पते) औषधोपयोगी जडीबुटींचा संग्रह करणार्‍या अथवा वनांचा रक्षक हे माणसा (देव) (रोगनिदान, उपचारादीमधे निष्णात असलेल्या वैद्यराज) अथवा हे ज्ञानी विद्वान मनुष्या, ज्याप्रमाणे तू (अन्यानः) विद्वज्जनांचा विरोध करणार्‍या अज्ञानी माणसांपासून दूर राहून (अन्यान्) अज्ञानीजनांचा विरोध करणार्‍या विद्वज्जनांजवळ जातोस, त्याप्रमाणे मी देखील विद्वज्जनांचा विरोध करणार्‍या लोकांपासून दूर राहून तुमचा (उप) जवळ (अगाम्) जातो किंवा येतो. तू (परेभ्यः) उत्तमांहून (परः) उत्तम आहेस आणि (अवरेभ्यः) लहानाहून (अर्वाक्) लहान मनुष्यासाठी देखील प्राप्तव्य व इष्ट आहेस (तं) अशा तुला मी (अविदम्) प्राप्त करावे (लहान-थोर सर्वांना तुझ्याजवळील औषधी-वनस्पती उपयोगी आहेत. मीही त्या वनस्पतींचा उपयोग घ्यावा) (देवाः) विद्वान वा शहाणी माणसें (देवयज्यायै) उत्तम प्रभाव व गुण येण्यासाठी (रोगापासून मुक्तीसाठी) (त्वा) तुझी कामना करतात, त्याप्रमाणे आम्हीदेखील (त्वा) तुला (जुषामहे) इच्छितो, (देवयज्यायै) सद्गुणांच्या प्राप्तीसाठी आम्ही (त्वा) तुला प्रिय मानतो, त्याप्रमाणे अन्य लोकांनीही तुझी कामना करावी. ज्याप्रमाणे तुझ्याजवळील औषधी संग्रहाचा (विष्णवे) यज्ञासाठी उपयोग केल्यानंतर त्या औषधी-वनस्पती सर्वांसाठी रक्षक (रोगनिवारक) होतात. यामुळे (स्वधिते) दुःखांचा नाश करू इच्छिवणारे आम्ही (याज्ञिक वा रोगी जन) (त्वा) तुला यज्ञाकरिता आवश्यक मानतो. ज्याप्रमाणे कोणीही श्रेष्ठ विद्वान अशा उपकारक यज्ञाचा नाश करण्यास तत्पर होणार नाही, आणि मी देखील कदापी यज्ञाचा व औषधींचा नाश करणार नाही, त्याप्रमाणे तू देखील (एनं) या यज्ञाचा व औषधी-संग्रहाचा कदापी (मा) नाश करून नकोस वा (हिंसी) यज्ञाला विकृत अथवा खंडित होऊ देऊ नकोस. ॥42॥
Essence
भावार्थ - येथे वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी हे हितकर आहे की त्यांनी नीच व्यवहार वा दुष्कर्म करणे सोडावे, नीच माणसांचा संग त्यागावा आणि सदैव उत्तम कर्म करीत उत्तम विद्वानाच्या संगतीत राहावे. त्यांनी उत्तमाहून उत्तम ज्ञान आणि कनिष्ठाहून किंचित अल्पसे ज्ञानदेखील अवश्य ग्रहण करावे. यज्ञाचा अवमान अथवा यज्ञीय पदार्थ, वनस्पती आदींचा तिरस्कार कदापी करू नयें अशा प्रकारे सर्वांनी सर्वांशी मिळून-मिसळून सुखी व्हावे. ॥42॥
Subject
वरील मंत्रात उल्लेखिलेल्या व्रतादी नियमांच्या विपरीत आचरण करणारे जे मनुष्य असतील, मनुष्यांनी त्यांचा संग करू नये, हा विषय पुढील मंत्रात सांगितला आहे -