Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 41

43 Mantra
5/41
Devata- विष्णुर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒रु वि॑ष्णो॒ विक्र॑मस्वो॒रु क्षया॑य नस्कृधि। घृ॒तं घृ॑तयोने पिब॒ प्रप्र॑ य॒ज्ञप॑तिं तिर॒ स्वाहा॑॥४१॥

उ॒रु। वि॒ष्णो॒ऽइति॑ विष्णो। वि। क्र॒म॒स्व॒। उ॒रु। क्षया॑य। नः॒। कृ॒धि॒। घृ॒तम्। घृ॒त॒यो॒न॒ इति॑ घृतऽयोने। पि॒ब॒। प्रप्रेति॒ प्रऽप्र॑। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। ति॒र॒। स्वाहा॑ ॥४१॥

Mantra without Swara
उरु विष्णो विक्रमस्वोरु क्षयाय नस्कृधि । घृतङ्घृतयोने पिब प्रप्र यज्ञपतिन्तिर स्वाहा ॥

उरु। विष्णोऽइति विष्णो। वि। क्रमस्व। उरु। क्षयाय। नः। कृधि। घृतम्। घृतयोन इति घृतऽयोने। पिब। प्रप्रेति प्रऽप्र। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। तिर। स्वाहा॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे सर्व पदार्थांत व्याप्त असलेला वायू गती करतो, प्रवाहित होतो, त्याप्रमाणे विद्या आदी गुणांमध्ये गुरांमधे व्याप्त (गती) असलेले हे विद्वान महोदय, आपण (उरु) अत्यंत विस्तारासाठी (क्षयाय) आपल्या विद्या व विज्ञानाला (विक्रमस्व) सर्व दृष्टीनीं विविध अंगांनी परिपूर्ण करा आणि (नः) आम्हाला सुखी (कृधि) करा. जसे जलाचे निमित्त विद्युत आहे, तसे पदार्थ-विद्येच्या विद्वान मनुष्या, तू विद्युतेप्रमाणे (घृतं) पाणी जलाचे (पिब) पान कर. (पाणी व विद्युतेचा भरपूर उपयोग कर) तसेच ज्याप्रमाणे मी यज्ञपती यजमानाला दुःख सागरातून पैलतीरास नेतो, त्याप्रमाणे तू देखील (स्वाहा) श्रेष्ठ हवन आदी कर्म करून (प्रपतिर) दुःखसागरातून तरून जा. ॥41॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे पवन सर्वांसाठी सुखकर होऊन सर्वत्र राहणारा आणि सर्वांचा जिवनाधार आहे, त्याप्रमाणेच विद्वान व्यक्तीने देखील व्हावयास हवे. (विद्यादींचे शिक्षण देऊन सर्वांना सुखी करावे वा वैज्ञानिक साधनांद्वारे सर्वांना सुख-सोयी द्याव्यात)
Subject
पुनश्‍च त्या दोघांनी (आचार्य व शिष्य) कसे वर्तन करावे, पुढील मंत्रात याविषयी वर्णन केले आहे -