Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 40

43 Mantra
5/40
Devata- अग्निर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
अग्ने॑ व्रतपा॒स्त्वे व्र॑तपा॒ या तव॑ त॒नूर्मय्यभू॑दे॒षा सा त्वयि॒ यो मम॑ त॒नूस्त्वय्यभू॑दि॒यꣳ सा मयि॑। य॒था॒य॒थं नौ॑ व्रतपते व्र॒तान्यनु॑ मे दी॒क्षां दी॒क्षाप॑ति॒रम॒ꣳस्तानु॒ तप॒स्तप॑स्पतिः॥४०॥

अग्ने॑। व्र॒त॒पा॒ इति॑ व्रतऽपाः। ते॒। व्र॒त॒पा॒ इति॑ व्रतऽपाः। या। तव॑। त॒नूः। मयि॑। अभू॑त्। ए॒षा। सा। त्वयि॑। योऽइति॒ यो। मम॑। तनूः। त्वयि॑। अभू॑त्। इ॒यम्। सा। मयि॑। य॒था॒य॒थमिति॑ यथाऽय॒थम्। नौ। व्र॒त॒प॒त॒ इति॑ व्रतऽपते। व्र॒तानि॑। अनु। मे॒। दी॒क्षाम्। दी॒क्षाप॑ति॒रिति॑ दीक्षाऽप॑तिः। अमं॑स्त। अनु॑। तपः॑। तप॑स्पति॒रिति॒ तपः॑ऽपतिः ॥४०॥

Mantra without Swara
अग्ने व्रतपास्त्वे व्रतपा या तव तनूर्मय्यभूदेषा सा त्वयि यो मम तनूस्त्वय्यभूदियँ सा मयि । यथायथन्नौ व्रतपते व्रतान्यनु मे दीक्षान्दीक्षापतिरमँस्तानु तपस्तपस्पतिः ॥

अग्ने। व्रतपा इति व्रतऽपाः। ते। व्रतपा इति व्रतऽपाः। या। तव। तनूः। मयि। अभूत्। एषा। सा। त्वयि। योऽइति यो। मम। तनूः। त्वयि। अभूत्। इयम्। सा। मयि। यथायथमिति यथाऽयथम्। नौ। व्रतपत इति व्रतऽपते। व्रतानि। अनु। मे। दीक्षाम्। दीक्षापतिरिति दीक्षाऽपतिः। अमंस्त। अनु। तपः। तपस्पतिरिति तपःऽपतिः॥४०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
(एक विद्यार्थी शिष्य आचार्यास म्हणत आहे) ^शब्दार्थ - हे (व्रतपा) सत्यव्रताचे पालन करणार्‍या (अग्ने) विशेष ज्ञानमय मनुष्या, (व्रतपाः) सत्यविद्या आणि गुणांचे व्रत वा संकल्प देणारा जो माझा एक आचार्य (अभूत्) होऊन गेला (ज्याने मला सत्य विद्या व सद्गुणांचे शिक्षण दिले, त्याच्या प्रमाणे मी (ते) तुझा शिष्य होऊ इच्छितो. (या) जो (तव) तुझा (तनुः) विद्यादी गुणांनी व्याप्त देह आहे, (सा) तो (मयि) माझ्यात देखील होवो (तुझ्या शरीराप्रमाणे माझे शरीर देखील सद्गुणमय होवो) (एषा) ही (त्वयि) तुझी बुद्धी माझ्याकरिता व्हावी. (या) जो (मम) माझा (तनूः) विद्येचा विस्तार आहे, जेवढे काही ज्ञान मला आहे) (सा) त्या ज्ञानाचा अधिक विस्तार व विकास (त्वयि) तुझ्यामुळे माझ्यात होवो (आचार्य म्हणतात) (इय) ही बुद्धी (मयि) हे माझ्या शिष्या, तुझ्यात येवो. (व्रतपते) सत्याचरण करणारा सत्यगुण शिकणारा आणि सत्य उपदेश देणारा जसा एक विद्वान आचार्य व शिष्य असतो, त्याप्रमाणे मी व तू (यथायथं) यथोचित वर्तन करणारे मित्र होऊन (व्रतामि) सत्याचरण आदी व्रतांचे पालन करू या. हे मित्रा (हे माझ्या प्रिय शिष्या) (तव) तुझा (दीक्षापतिः) यथोचित उपदेश देणारा मी तुझ्यासाठी (दीक्षां) सत्याचा उपदेश (अमंस्त) करीत आहे किंवा करण्याची रीती जाणत आहे. माझ्याप्रमाणे तूदेखील माझ्याविषयी अशीच (अनु) भावना ठेव. (व्रत ग्रहणासाठी खरी इच्छा असू दे) ज्याप्रमाणे (तपस्पतिः) अखंड ब्रह्मचर्याचे पालन करणार्‍या तुझ्या पूर्वीच्या आचार्याने तुला (तपः) तप करण्याची म्हणजे आधी कष्ट कारक पण नंतर सुखदायक अशा ब्रह्मचर्याची दीक्षा दिली आहे, त्याप्रमाणे हे शिष्या, तू मला देखील जाण वा माझ्याकडून तशीच दृढ दीक्षा घे. ॥40॥
Essence
भावार्थ - पूर्वीच्या काळी विद्या शिकविणारे जसे अध्यापकगण होऊन गेले, आम्ही देखील तसेच व्हायला हवेत. जोपर्यंत माणसें सुख-दुःख, हानी-लाभ याविषयीं आपल्याप्रमाणे इतरांच्या बाबत आत्मवत् वृत्ती ठेवणार नाहीत, आपल्याप्रमाणेच दुसर्‍याच्याही सुख-दुःख, लाभ-हानी आदीचा विचार करणार नाहीत, तोपर्यंत कुणालाच पूर्ण सुखाची प्राप्ती होणार नाही. यासाठी मनुष्यांनी सदा एकमेकाशी श्रेष्ठ आचरण करावे.
Subject
पुनश्‍च, त्या दोघांनी (अध्यापक आणि शिष्य यांनी) कसे आचरण करावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादिला आहे -