Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 4

43 Mantra
5/4
Devata- अग्निर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒ग्नाव॒ग्निश्च॑रति॒ प्रवि॑ष्ट॒ऽऋषी॑णां पु॒त्रोऽअ॑भिशस्ति॒पावा॑। स नः॑ स्यो॒नः सु॒यजा॑ यजे॒ह दे॒वेभ्यो॑ ह॒व्यꣳ सद॒मप्र॑युच्छ॒न्त्स्वाहा॑॥४॥

अ॒ग्नौ। अ॒ग्निः। च॒र॒ति॒। प्रविष्ट॑ इति॒ प्रऽवि॒ष्टः। ऋषी॑णाम्। पु॒त्रः। अ॒भि॒श॒स्ति॒पावेत्य॑भिशस्ति॒ऽपावा॑। सः। नः॒। स्यो॒नः। सु॒यजेति॑ सु॒ऽयजा॑। य॒ज॒। इ॒ह। दे॒वेभ्यः॑। ह॒व्यम्। सद॑म्। अप्र॑युच्छ॒न्नित्यप्र॑ऽयुच्छन्। स्वाहा॑ ॥४॥

Mantra without Swara
अग्नावग्निश्चरति प्रविष्ट ऋषीणाम्पुत्रोऽअभिशस्तिपावा । स नः स्योनः सुयजा यजेह देवेभ्यो हव्यँ सदमप्रयुच्छन्त्स्वाहा ॥

अग्नौ। अग्निः। चरति। प्रविष्ट इति प्रऽविष्टः। ऋषीणाम्। पुत्रः। अभिशस्तिपावेत्यभिशस्तिऽपावा। सः। नः। स्योनः। सुयजेति सुऽयजा। यज। इह। देवेभ्यः। हव्यम्। सदम्। अप्रयुच्छन्नित्यप्रऽयुच्छन्। स्वाहा॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो अध्यापक विद्वान (अभिशस्ति पावा) सर्व प्रकारच्या हिंसा वा पीडापासून दूर आहे (जो निर्भय आहे ज्याला कोणी पीडा देऊ शकत नाही किंवा जो कोणाला पीडा देत नाही) तसेच जो (अग्नौ) विद्युत रूप अग्नी विद्येत (प्रविष्टः) प्रवीण आहे वा अग्नीविद्या सांगणारी वैज्ञानिक आहे, जो (ऋपीणाम्) वेदादि शास्त्रांच्या शब्दार्थांना यथावत जाणणार्‍या विद्वानां कडून (पुत्रः) ज्ञान प्राप्त केलेला शिष्य वा विद्यार्थी आहे (स्थोनः) सर्वथा सुखकारी असून (सुयजा) विद्या सत्य ज्ञानाच्या संगतीमुळे साक्षात अनुभवी झालेला आहे (अग्नीः) असा उज्वल आत्म्याचा (अप्रयुच्छन्) अप्रमादी अध्यापक विद्वान असलेला तसेच (चरति) आचरण करणारा (नः) आम्हांला (इह) या संसारात (देवेभ्यंः) विद्या व दिव्यगुणांनी संपन्न करतो वा करो. (हव्यम्) दान आणि ग्रहण करण्यास योग्य असे जे (सदम्) ज्ञान आहे आणि (स्वाहा) हवन करण्यासाठी योग्य उत्तम अन्न आदी सामग्रीचा जो दान करतो (सः) अशा त्या विद्वानांने आम्हांस (यज) सर्व विद्यांची प्राप्ती करवावी (आम्हांस यज्ञविधी, वेद विद्या शिकवावी)
Essence
भावार्थ - अग्नी कार्य आणि कारणरूपाने दोन प्रकारचा आहे. कार्यरूपाने सूर्य आदीमधे आणि कारणरूपाने तो विद्युत मधे असून सर्व मूर्त अमूर्त द्रव्यामधे त्याचा प्रवेश आहे. याकरिता संसारामधे विद्या आणि तंत्र रीतीद्वारे त्याचा वापर कार्यामधे करून त्यापासून लाभ घ्यावेत, मनुष्यासाठी हे उचितकर्म आहे ॥4॥
Subject
विद्युत, विद्वान आणि अग्नी यांचे स्वरूप कसे आहे, हा विषय पुढील मंत्रात सांगितला आहे -