Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 38

43 Mantra
5/38
Devata- विष्णुर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
उ॒रु वि॑ष्णो॒ विक्र॑मस्वो॒रु क्षया॑य नस्कृधि। घृतं घृ॑तयोने पिब॒ प्रप्र॑ य॒ज्ञप॑तिं तिर॒ स्वाहा॑॥३८॥

उ॒रु। वि॒ष्णो॒ऽइति॑ विष्णो। वि। क्र॒म॒स्व॒। उ॒रु। क्षया॑य। नः॒। कृ॒धि॒। घृ॒तम्। घृ॒त॒यो॒न॒ इति॑ घृतऽयोने। पि॒ब॒। प्रप्रेति॒ प्रऽप्र॑। य॒ज्ञप॑ति॒मिति॑ य॒ज्ञऽप॑तिम्। ति॒र॒। स्वाहा॑ ॥३८॥

Mantra without Swara
उरु विष्णो विक्रमस्वोरु क्षयाय नस्कृधि घृतङ्घृतयोने पिब प्रप्र यज्ञपतिन्तिर स्वाहा ॥

उरु। विष्णोऽइति विष्णो। वि। क्रमस्व। उरु। क्षयाय। नः। कृधि। घृतम्। घृतयोन इति घृतऽयोने। पिब। प्रप्रेति प्रऽप्र। यज्ञपतिमिति यज्ञऽपतिम्। तिर। स्वाहा॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याप्रमाणे सर्वव्यापी परमेश्‍वर सर्व जगाची रचना करतो, सृष्टीने कारणरूप होऊन राहतो, त्याप्रमाणे विद्या आदी गुणांचा ज्ञाता असलेल्या हे वीर पुरुषा, तूदेखील आपल्या विद्या, ज्ञान व क्रिया आदीद्वारे (उरु) अत्यंत (वि) सहजतेने फळ वा यश (क्रमस्व) प्राप्त कर. आणि (क्षयाय) निवास करण्यास योग्य घरें आणि उपकारक विज्ञानाच्या प्राप्तीसाठी (नः) आम्हास (कृधि) साहाय्य कर. हे (घृतयोने) विद्या आणि ज्ञानाने समृद्ध अशा पुरुषा, ज्याप्रमाणे अग्नी तूप पिऊन प्रदीप्त होतो. तद्वत तू देखील आपल्या गुरांच्या वृद्धीसाठी (घृतं) घृताचे (प्रप पिब) वारंवार पान कर (तूप खा) आणि भरपूर शारीरिक शक्ती अर्जित कर. ज्याप्रमाणे ऋत्विज आदी विद्वज्जन (यज्ञपतिं) यजमानाचे रक्षण करीत त्याला यज्ञाच्या समाप्ती पर्यंत सकुशल नेतात, त्याप्रमाणे तूदेखील (स्वाहा) यज्ञ-मंत्राच्या उच्चारण आणि क्रियेद्वारे (यज्ञम्) हा यज्ञ (तिर) पोहून पार कर (निर्विघ्नपणे यज्ञ संपन्न कर) ॥38॥
Essence
भावार्थ - परमेश्‍वर जगात व्यापक असून जगाचे निमित्त कारण आहे. तो जगदरचना करून, जगाचे पालन करीत सर्व प्राण्यांना सखी करतो, आम्ही त्याच्या या जगात राहून सदैव प्रसन्न असावे. ज्याप्रमाणे अग्नी काष्ठ, घृत आदी ज्वलनशील पदार्थामुळे अधिकाधिक प्रकाशित होतो, त्याप्रमाणे आम्ही देखील आपल्या शत्रूंना जिंकून अधिकाधिक कीर्तीमान व्हावे. आणि जसे धार्मिक यज्ञकर्त्ता यजमान मिळाल्यानंतर होता आदी विद्वज्जन आपले यज्ञकर्म सिद्ध करतात, तसे आम्हा प्रजाजनांना जेव्हां धर्मात्मा सभापती, (राष्ट्रध्यक्ष वा सेनापती) मिळतो, तेव्हा आम्ही स्वतःच्या सुखांची पूर्तता करून घ्यावी. ॥38॥
Subject
पुनश्‍च, ते दोघे (ईश्‍वरोपासक आणि सेनापती) कसे आहेत, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -