Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 37

43 Mantra
5/37
Devata- अग्निर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अ॒यं नो॑ऽअ॒ग्निर्वरि॑वस्कृणोत्व॒यं मृधः॑ पु॒रऽए॑तु प्रभि॒न्दन्। अ॒यं वाजा॑ञ्जयतु॒ वाज॑साताव॒यꣳ शत्रू॑ञ्जयतु॒ जर्हृ॑षाणः॒ स्वाहा॑॥३७॥

अ॒यम्। नः॒। अ॒ग्निः। वरि॑वः। कृ॒णो॒तु॒। अ॒यम्। मृधः॑। पु॒रः। ए॒तु॒। प्र॒भि॒न्दन्निति॑ प्रऽभि॒न्दन्। अ॒यम्। वाजा॑न्। ज॒य॒तु॒। वाज॑साता॒विति॒ वाज॑ऽसातौ। अ॒यम्। शत्रू॑न्। ज॒य॒तु॒। जर्हृ॑षाणः। स्वाहा॑ ॥३७॥

Mantra without Swara
अयन्नोऽअग्निर्वरिवस्कृणोत्वयम्मृधः पुर एतु प्रभिन्दन् । अयँ वाजाञ्जयतु वाजसातावयँ शत्रूञ्जयतु जर्हृषाणः स्वाहा ॥

अयम्। नः। अग्निः। वरिवः। कृणोतु। अयम्। मृधः। पुरः। एतु। प्रभिन्दन्निति प्रऽभिन्दन्। अयम्। वाजान्। जयतु। वाजसाताविति वाजऽसातौ। अयम्। शत्रून्। जयतु। जर्हृषाणः। स्वाहा॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हा (अग्निः) परमेश्‍वराचा उपासक मनुष्य (नः) आम्हा प्रजाजनांचे (वरिवः) निरंतर रक्षण (कृणोतु) करो. ज्याप्रमाणे युद्धकलानिपुण वीर युद्दांत आपल्या सैन्यासह निंदनीय दुष्ट वैरीनां आधीच जाऊन वेढतो (प्रत्यक्ष युद्धपूर्वी चापल्याने शत्रुसैन्यास वेढा घालतो) त्याप्रमाणे (अयं) या युद्धनिपुण सेनापतीने (वाजसातौ) संग्रामभूमीत दुष्ट शत्रूवर (पुरः) युद्धाच्या आधीच चाल करून (एतु) त्याला वेढावे. (अयं) वीरांना प्रोत्साहित व हर्षित करणार्‍या या सेनापतीने दुष्ट शत्रूंना (प्रभिन्दन्) छिन्न-भिन्न करावे आणि (वाजान्) युद्ध (जयतु) जिंकावे. (अयं विजय संपादन करणाऱ्या या सेनापतीनें निरंतर (जर्हृषाणः) आनंदित होऊन, उल्हासाने (स्वाहा) युद्ध-व्यवस्थेविषयी आदेश द्यावेत (तसेच सैन्याचा उत्साह वाढविणारे जयघोष करावेत) व अशाप्रकारे (जयतु) युद्धात विजय प्राप्त करावा. ॥37॥
Essence
भावार्थ - जे लोक परमेश्‍वराची उपासना करीत नाहीत, कधीही ते विजयी होत नाहीत. जे लोक (व जे देश) सैनिकांस उत्कृष्ट प्रशिक्षण देत नाहीत, तसेच युद्धात पराक्रम करणार्‍या शूरवीर पुरुषांचा सत्कार-सम्मान करीत नाहीत, त्यांचा सर्व ठिकाणी पराजय होतो शत्रू त्यांचा सहजपणे पराजय करतो. याकरिता हितैषी रक्षणार्थी माणसांनी दोन प्रकारे प्रबन्ध वा कार्य करावे- एक हे की परमेश्‍वराची उपासना करावी आणि दुसरे म्हणजे आपल्या वीरांचे रक्षण करावे (त्यांना सम्मानित करून त्यांचा उत्साह वाढवावा.) ॥37॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वराची उपासना करणार्‍या शूरवीरा विषयी कथन केले आहे -