Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 36

43 Mantra
5/36
Devata- अग्निर्देवता Rishi- आगस्त्य ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अग्ने॒ नय॑ सु॒पथा॑ रा॒येऽअ॒स्मान् विश्वा॑नि देव व॒युना॑नि वि॒द्वान्। यु॒यो॒ध्यस्मज्जु॑हुरा॒णमेनो॒ भूयि॑ष्ठां ते॒ नम॑ऽउक्तिं विधेम॥३६॥

अग्ने॑। नय॑। सु॒पथेति॑ सु॒ऽपथा॑। रा॒ये। अ॒स्मान्। विश्वा॑नि। दे॒व॒। व॒युना॑नि। वि॒द्वान्। यु॒यो॒धि। अ॒स्मत्। जु॒हु॒रा॒णम्। एनः॑। भूयि॑ष्ठाम्। ते॒। नम॑उक्ति॒मिति॒ नमः॑ऽउक्तिम्। वि॒धे॒म॒ ॥३६॥

Mantra without Swara
अग्ने नय सुपथा रायेऽअस्मान्विश्वानि देव वयुनानि विद्वान् । युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नमउक्तिँ विधेम ॥

अग्ने। नय। सुपथेति सुऽपथा। राये। अस्मान्। विश्वानि। देव। वयुनानि। विद्वान्। युयोधि। अस्मत्। जुहुराणम्। एनः। भूयिष्ठाम्। ते। नमउक्तिमिति नमःऽउक्तिम्। विधेम॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) सर्वांना सन्मार्गावर नेणार्‍या आणि (देव) सर्वांना आनंद देणार्‍या (विद्वान्) समस्त विद्याविभूषित परमेश्‍वरा, तुझ्या कृपेने (राये) मोक्षरूप उत्तम धनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे (सुपथा) धार्मिक जन उत्तम मार्गाने (विश्‍वानि) जाऊन संपूर्ण (वयुनानि) उत्तम कर्म व श्रेष्ठ संतती प्राप्त करतात, त्याप्रमाणे (अस्मान्) आम्हाला देखील (नय) त्या उत्तम मार्गाने वा तोच मार्ग आम्हास दाखव. हे जगदीश्‍वरा, (जुहुराणम्) कुटिल (एनः) दुःखरूप पापाला (अस्मत्) आमच्यापासून (युयोधि) दूर ठेव. याकरिता आम्ही तुझे उपासक (ते) तुझ्यासमोर (भूयिष्ठां) अत्यंत व वारंवार (नमउक्तिम्) नमस्कारमय वचन (तसधेम) बोलत आहोत (तुला विनवीत आहोत) ॥36॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. सत्य मनाने व प्रेमभावनेने उपासना केल्यास ज्याप्रमाणे परमेश्‍वर जीवांना दुष्टमार्गापासून दूर ठेवतो, धर्ममार्गावर चालण्याची प्रेरणा देतो आणि जीवांच्या कर्मानुसार जीवांना सुख देतो, त्याप्रमाणे न्यायाधीश आदी न्यायकारीजनांनी देखील करावे (दोष व निर्दोषजनांना त्यांच्या कर्मानुसार योग्य न्याय द्यावा. आणि दोषींना सन्मामार्गावर न्यावे) ॥36॥
Subject
ईश्‍वराची प्रार्थना कोणत्या कारणांसाठी व का करावी, पुढील मंत्रात याविषयी उपदेश केला आहे -