Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 33

43 Mantra
5/33
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
स॒मु॒द्रोऽसि वि॒श्वव्य॑चाऽअ॒जोऽस्येक॑पा॒दहि॑रसि बु॒ध्न्यो वाग॑स्यै॒न्द्रम॑सि॒ सदोऽ॒स्यृत॑स्य द्वारौ॒ मा मा॒ सन्ता॑प्त॒मध्व॑नामध्वपते॒ प्र मा॑ तिर स्व॒स्ति मे॒ऽस्मिन् प॒थि दे॑व॒याने॑ भूयात्॥३३॥

स॒मु॒द्रः। अ॒सि॒। वि॒श्वव्य॑चा॒ इति॑ वि॒श्वऽव्य॑चाः। अ॒जः। अ॒सि॒। एक॑पा॒दित्येक॑ऽपात्। अहिः॑। अ॒सि॒। बु॒ध्न्यः᳖। वाक्। अ॒सि॒। ऐ॒न्द्रम्। अ॒सि॒। स॒दः॑। अ॒सि॒। ऋत॑स्य। द्वा॒रौ॒। मा। मा॒। सम्। ता॒प्त॒म्। अध्व॑नाम्। अ॒ध्व॒प॒त॒ इत्य॑ध्वऽपते। प्र। मा॒। ति॒र। स्व॒स्ति। मे॒। अ॒स्मिन्। प॒थि। दे॒व॒यान॒ इति॑ देव॒ऽयाने॑। भू॒या॒त् ॥३३॥

Mantra without Swara
समुद्रोसि विश्वव्यचाऽअजो स्येकपादहिरसि बुध्न्यो वागस्यैन्द्रमसि सदोस्यृतस्य द्वारौ मा मा सन्ताप्तमध्वनामध्वपते प्र मातिर स्वस्ति मेस्मिन्पथि देवयाने भूयान्मित्रस्य मा॥

समुद्रः। असि। विश्वव्यचा इति विश्वऽव्यचाः। अजः। असि। एकपादित्येकऽपात्। अहिः। असि। बुध्न्यः। वाक्। असि। ऐन्द्रम्। असि। सदः। असि। ऋतस्य। द्वारौ। मा। मा। सम्। ताप्तम्। अध्वनाम्। अध्वपत इत्यध्वऽपते। प्र। मा। तिर। स्वस्ति। मे। अस्मिन्। पथि। देवयान इति देवऽयाने। भूयात्॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - परमेश्‍वर (समुद्रः) सर्व प्राण्यांना या जगात गमन-आगमन करविणारा आहे (प्राण्यांना जन्म देऊन जगात पाठविणारा आणि मृत्यूद्वारे जगातून घेऊन जाणारा आहे) आणि (विश्‍वव्यचाः) जगात व्यापक असून (अजः) अजन्मा (असि) आहे, त्याच्या (एकपात्) एका पायामधे समस्त विश्‍व आहे (समस्त विश्‍व ज्याची एका पायाची समता करू शकत नाही अथवा जो एकमेव असा आहे की ज्याची शक्ती अपद्विमित असून त्याच्या केवळ अल्पशा आधाराने देखील समस्त जग स्थिर व संचालित आहे) तो (अहिः) व्यापनशील असून (बुध्न्यः) अंतरिक्षाहून पुढे व विशालतम (असि) आहे. तो (वाक्) साक्षात वाणीरूप (असि) आहे. (ऐन्द्रं) उत्तम ऐश्‍वर्याचे (सदः) स्थान म्हणजे ऐश्‍वर्यप्रदाता आहे आणि (ऋतस्य) सत्याच्या (द्वारौ) मुखांनो (मासंताप्तम्) तप्त वा दूषित करणारा नाहीं (सत्यभाषण व सत्यवर्तन करण्यासाठी प्रेरक आहे) हे (अध्वपते) धर्ममार्गावर अनुसरण करण्यार्‍या विद्वज्जनहो, तुम्ही देखील त्या परमेश्‍वराप्रमाणे मुखास वा आपल्या वाणीस शांत ठेवा, तप्त वा कटु होऊ देऊ नका. हे परमेश्‍वर, (मा) मला (अध्वनम्) धर्माच्या मार्गावरून ना विद्या-शिल्पादींच्या अध्ययनापासून (प्रतिर्) दूर करू नका वा या विद्या-शिल्पसागरातून पैलतीरास न्या. (मे) माझा (अस्मिन्) हा मार्ग (देवयाने) विद्वानांच्या आवागमनास योग्य तसेच (पथि) या निर्भय व निष्कंटक होईल अशा प्रकारचा (स्वस्ति) सुखमय (भूयात्) व्हावा, अशी कृपा करा. (धर्ममार्गावर चालतांना विघ्न-भय आदींचा उपद्रव होऊ नये, ही प्रार्थना आहे) ॥33॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ईश्‍वर तसेच जगाचा कारणरूप जीव अनादी आहेत आणि त्यांचा जन्म होत नसल्यामुळे दोघे अविनाशी आहेत. परमेश्‍वराची कृपा प्राप्त करून जे लोक त्याची उपासना करतात आणि सृष्टी-विद्येचे ज्ञान संपादित करून स्वपुरुषार्थाने यत्न करतात, तेच विद्वज्जनांच्या मार्गाचे अनुगमन करतात व सुखी होतात. आळशी व निरोद्योगी जनांना कदापी विद्वत्-संगती आणि सुख प्राप्त होत नाही. ॥33॥
Subject
यानंतर पुढील मंत्रात उपदेश केला आहे की ईश्‍वर जसा आहे, विद्वानांनानीदेखील त्याप्रमाणे व्हायला पाहिजे -