Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 31

43 Mantra
5/31
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- विराट् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
वि॒भूर॑सि प्र॒वाह॑णो॒ वह्नि॑रसि हव्य॒वाह॑नः। श्वा॒त्रोऽसि प्रचे॑तास्तु॒थोऽसि वि॒श्ववे॑दाः॥३१॥

वि॒भूरिति॒ वि॒ऽभूः। अ॒सि॒। प्रवा॒ह॑णः। प्रवा॒ह॑न॒ इति॑ प्र॒ऽवाह॑नः। वह्निः॑। अ॒सि॒। ह॒व्य॒वाह॑न॒ इति॑ हव्य॒ऽवाह॑नः। श्वा॒त्रः। अ॒सि॒। प्रचे॑ता॒ इति॒ प्रऽचे॑ताः। तु॒थः। अ॒सि॒। वि॒श्ववे॑दा॒ इति॑ वि॒श्वऽवे॑दाः ॥३१॥

Mantra without Swara
विभूरसि प्रवाहणो वह्निरसि हव्यवाहनः श्वात्रो सि प्रचेतास्तुथोसि विश्ववेदाः ॥

विभूरिति विऽभूः। असि। प्रवाहणः। प्रवाहन इति प्रऽवाहनः। वह्निः। असि। हव्यवाहन इति हव्यऽवाहनः। श्वात्रः। असि। प्रचेता इति प्रऽचेताः। तुथः। असि। विश्ववेदा इति विश्वऽवेदाः॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर अथवा हे विद्वान्, ज्याप्रमाणे (प्रवाहणः) प्रवाहमय वायू वा महानद आहे, ज्याप्रमाणे आकाश व्यापक आहे आणि एक राजा विशाल ऐश्‍वर्याचा स्वामी असतो, तसे आपण (विभूः) व्यापक आणि ऐश्‍वर्ययुक्त आहात. यथा (वह्निः) अग्नी आहुत पदार्थांना योग्य ठिकाणी, तसे आपण (हव्यवाहनः) हवन करण्यास योग्य अशा पदार्थांची रचना करणारे वा व्यवस्था करणारे (असे) आहात. ज्याप्रमाणे जीवांमधे प्राण आहेत, ज्याप्रमाणे (प्रचेताः) प्रयुद्ध करणारे (श्‍वात्रः) विद्वान (असि) आहेत, जसे सूत्रात्मा पवन सर्वांत व्याप्त आहे, त्याप्रमाणे आपण (विश्‍वेवदाः) विश्‍वात्तो ज्ञान असणारे व (तुथः) ज्ञान वाढविणारे (असि) आहात. या कारणामुळे आपण सत्कार व स्तुती करण्यास योग्य आहात, असे आम्ही मानतो. (म्हणून आम्ही आपली स्तुती, उपासना करतो. ॥31॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष आणि उपमा अलंकार आहेत. सर्व मनुष्यांकरिता हेच उचित व हितावह आहे की त्यानी ईश्‍वराचा आणि विद्वानांचा सत्कार सदैव करावा. या सत्कार-कर्त्तव्यापासून कधीही च्युत होऊ नये, कारण की अन्य कोणत्या प्रकारे वा कोणत्या व्यक्तीकडून विद्या आणि सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. ॥31॥
Subject
पुनश्‍च, त्या दोन विषयीच या मंत्रात कथन केले आहे -