Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 29

43 Mantra
5/29
Devata- ईश्वरसभाध्यक्षौ देवते Rishi- औतथ्यो दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
परि॑ त्वा गिर्वणो॒ गिर॑ऽइ॒मा भ॑वन्तु वि॒श्वतः॑। वृ॒द्धायु॒मनु॒ वृद्ध॑यो॒ जुष्टा॑ भवन्तु॒ जुष्ट॑यः॥२९॥

परि॑। त्वा। गि॒र्व॒णः॒। गिरः॑। इ॒माः। भ॒व॒न्तु॒। वि॒श्वतः॑। वृ॒द्धायु॒मिति॑ वृ॒द्धऽआ॑युम्। अनु॑। वृद्ध॑यः। जुष्टाः॑। भ॒व॒न्तु॒। जुष्ट॑यः ॥२९॥

Mantra without Swara
परि त्वा गिर्वणो गिर इमा भवन्तु विश्वतः । वृद्धायुमनु वृद्धयो जुष्टा भवन्तु जुष्टयः ॥

परि। त्वा। गिर्वणः। गिरः। इमाः। भवन्तु। विश्वतः। वृद्धायुमिति वृद्धऽआयुम्। अनु। वृद्धयः। जुष्टाः। भवन्तु। जुष्टयः॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गिर्वणः) स्तुती गीतांद्वारे स्तववीय प्रार्तना व उपासना करण्यास योग्य अशा) हे परमेश्‍वरा अथवा हे राष्ट्रध्यक्ष, आपण (इमाः) माझ्या द्वारे (म्हणजे माझ्या सारखय प्रजाजनांचय द्वारे) केली जाणारी (इमाम्) ही तुमची (गिरः) स्तुतीवचने (विश्‍वतः) आम्हांसाठी सर्वदृष्ट्या (परि) लाभकारी व्हावीत. केवळ आता किंवा याचवेळी नव्हे, तर (वृद्धायु) (आमच्या वृद्धावस्थे पर्यंत आम्ही स्तुती करीत राहू व तुम्ही आम्हांस हितकारी होत राहा.) अथवा वृद्धाप्रमाणे शांतपणे, सूज्ञपणे विचार व आचार असलेल्या आपणांप्रती (राष्ट्रध्यक्ष) (अनु) आजच्या नंतरही (वृद्धयः) आमच्या या स्तुती वाढत राहोत आणि आम्हांसाठी आपली स्तुती, प्रार्थना व उपासना (जुष्टयः) प्रिय व सेवनीय (जुष्टाः) होऊन आमचे हित करीत राहो. ॥29॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. हे मनुष्यांनो, संपूर्ण उत्तम गुणकर्मांने परिपूर्ण असा जगदीश्‍वर आणि राष्ट्राध्यक्ष स्तवनीय म्हणजे स्तुती, प्रार्थना करण्यास पात्र आहे, तुमचे कर्त्तव्य आहे की ईश्‍वराची आणि सभाध्यक्षाची स्तुती सदैव अवश्य करावी. ॥29॥
Subject
ईश्‍वरापासून काय काम प्राप्तव्य आहे आणि सभाध्यक्षाकडून कोणती कर्त्तव्य-कर्मे करून घेता येतात, या विषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -