Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 24

43 Mantra
5/24
Devata- सूर्यविद्वांसौ देवते Rishi- औतथ्यो दीर्घतमा ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
स्व॒राड॑सि सपत्न॒हा स॑त्र॒राड॑स्यभिमाति॒हा ज॑न॒राड॑सि रक्षो॒हा स॑र्व॒राड॑स्यमित्र॒हा॥२४॥

स्व॒राडिति॑ स्व॒ऽराट्। अ॒सि॒। स॒प॒त्न॒हेति॑ सपत्न॒ऽहा। स॒त्र॒राडिति॑ सत्र॒ऽराट्। अ॒सि॒। अ॒भि॒मा॒ति॒हेत्य॑भिमाति॒ऽहा। ज॒न॒राडिति॑ जन॒ऽराट्। अ॒सि॒। र॒क्षो॒हेति॑ रक्षः॒ऽहा। स॒र्व॒राडिति॑ सर्व॒ऽराट्। अ॒सि॒। अ॒मि॒त्र॒हेत्य॑मित्र॒ऽहा ॥२४॥

Mantra without Swara
स्वराडसि सपत्नहा सत्रराडस्यभिमातिहा जनराडसि रक्षोहा सर्वराडस्यमित्रहा ॥

स्वराडिति स्वऽराट्। असि। सपत्नहेति सपत्नऽहा। सत्रराडिति सत्रऽराट्। असि। अभिमातिहेत्यभिमातिऽहा। जनराडिति जनऽराट्। असि। रक्षोहेति रक्षःऽहा। सर्वराडिति सर्वऽराट्। असि। अमित्रहेत्यमित्रऽहा॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - या मंत्राचे दोन अर्थ आहेत 1) असभाध्यक्ष म्हणजे राष्ट्राध्यक्षपरक 2) सूर्यपरक - हे विद्वान (वा विद्वान् समर्थ शक्तिमान) राष्ट्राध्यक्ष, आपण (विराट) स्वयमेव स्वतःच्या कीर्तीमुळे प्रसिद्ध आहात. (सपन्तहा) शत्रूंचे संहारक आणि (सत्रराट) यज्ञामधे विशेष प्रतिष्ठित वा कीर्तीमंत आहात. (जनराट्) धार्मिक विद्वांद्वारे सम्मानित असून (रक्षोहा) राक्षसांना अर्थात दुर्जनांचा वध करणारे आहात. आपण (सर्वराट) सर्वत्र प्रतिष्ठित व कीर्तिमंत आणि (अमित्रहा) अमित्रांना म्हणजे शत्रूंचा नाश करणारे आहात ॥1॥^हा सूर्य (स्वराट) स्वतः प्रकाशमान (असि) आहे. (सपलहा) ढगांच्या अवयवांना (जलकणांना) छिन्न-भिन्न करणारा (त्तृष्टी करणारा) आणि (सत्रराट्) यज्ञामधे पूज्य (असि) आहे (अभिमातिहा) अभिमानी चोर, दरोडेखोर यांचा वध करणारा आणि (जनराट) धार्मिक विद्वज्जनांना मनामधे प्रेरणा देणारा वा विद्वज्जनांद्वारे विशेषत्वाने ज्ञातव्य (असि) आहे. हा सूर्य (रक्षोहा) राक्षसांचा म्हणजे दुष्टांचा संहार करणारा व (सत्रराट्) सर्व दीप्तिमान पदार्थांमधे सर्वाधिक प्रकाशमान (असि) आहे. तसेच हा (अमित्रहा) दुष्टांना दंडित करण्याचे एक निमित्त आहे (सूर्यप्रकाशामुळे चोर, दुर्जन आदी दूराचारी जन त्वरित पकडले जातात)
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे (स्वराट् सपत्नहा, जनराट्, रक्षोहा आदी पदांचे प्रसंगाप्रमाणे दोन अर्थ आहेत. यांमुळे श्‍लेष आहे) हे विद्वान् सभाध्यक्ष, (पंतप्रधान वा राष्ट्रपती) ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशामुळे चोर-दरोडेखोर, वाद्य आदी प्राण्यांना भयभीत करतो आणि त्याद्वारे सर्व प्राण्यांना सुखी करतो, त्याप्रमाणे आपण देखील सर्व शत्रूंचे निवारण करून प्रजेला (जनतेला व नागरिकांना) सुखी करा॥24॥
Subject
पुढील मंत्रात सूर्याच्या सभाध्यक्षाच्या गुणांविषयी कथन केले आहे -