Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 18

43 Mantra
5/18
Devata- विष्णुर्देवता Rishi- औतथ्यो दीर्घतमा ऋषिः Chhand- स्वराट् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्याणि॒ प्रवो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजा॑सि। योऽअस्क॑भाय॒दुत्त॑रꣳ स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यो विष्ण॑वे त्वा॥१८॥

विष्णोः॑। नु। क॒म्। वी॒र्या᳖णि। प्र। वो॒च॒म्। यः। पार्थि॑वानि। वि॒म॒मऽइति॑ विऽम॒मे। रजा॑सि। यः। अस्क॑भायत्। उत्त॑रमित्युत्ऽत॑रम्। स॒धस्थ॒मिति॑ स॒धऽस्थ॑म्। वि॒च॒क्र॒मा॒ण इति॑ विऽचक्रमा॒णः। त्रे॒धा। उ॒रु॒गा॒यऽइत्यु॑रुऽगा॒यः। विष्ण॑वे। त्वा ॥१८॥

Mantra without Swara
विष्णोर्नु कँवीर्याणि प्र वोचँयः पार्थिवानि विममे रजाँसि । योऽअस्कभायदुत्तरँ सधस्थँविचक्रमाणस्त्रेधोरुगायः विष्णवे त्वा ॥

विष्णोः। नु। कम्। वीर्याणि। प्र। वोचम्। यः। पार्थिवानि। विममऽइति विऽममे। रजासि। यः। अस्कभायत्। उत्तरमित्युत्ऽतरम्। सधस्थमिति सधऽस्थम्। विचक्रमाण इति विऽचक्रमाणः। त्रेधा। उरुगायऽइत्युरुऽगायः। विष्णवे। त्वा॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो (यः) जो परमेश्‍वर (विचक्रमाणः) सृष्टीच्या निर्माणकरिता कारणरूप असलेल्या अशांना (अणू परमाणू रूपाला) संयुक्त वा एकत्रित करतो, (उकगायः) जो वेदाद्वारे अनेक विद्य अर्थाचा उपदेश देतो आणि (आणि (पार्थिवानि) पृथ्वीच्या विकारापासून म्हणजे तिच्या गुणांपासून उत्पन्न होणार्‍या किंवा अंतरिक्षात विद्यमान (त्रेधा) तीन प्रकारच्या (रजांसि) लोकांची (त्र्यसरेणु) (विममे) अनेक प्रकारे रचना करतो, तोच जगदीश्‍वर (उत्तम) मागील अवयवांच्या (उपादान रूप प्रकृतीच्या अणू आदींच्या कारणरूप अंशांना) (अस्कभायत्) नियंत्रित वा बंधनात ठेवतो (त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती होत नाही) (या) ज्याचा आश्रय (विष्णवे) उपसमारूप यज्ञाच्या वेळी घेतला जातो (जो एकमेव उपास्थदेव आहे) त्या (विष्णोः) व्यापक परमेश्‍वराच्या (वीर्याणि) पराक्रम व अद्वितीय सामर्थ्याने परिपूर्ण अशा कर्मांची (प्रवोचम) मी स्तुती व उपासना करतो. हे परमेश्‍वरा, मी शीघ्रमेव (कम्) सुखस्वरूप अशा (त्वा) तुमच्या आश्रयास येतो. ॥18॥
Essence
भावार्थ - ज्या परमेश्‍वराने पृथ्वी, सूर्य आदीची रचना केली आहे व त्रसरेणु आदी भेदाने तीन प्रकारच्या जगाची उत्पत्ती केली आहे. मनुष्यांनी केवळ त्याच जगदीश्‍वराची उपासना करणे उचित आहे ॥18॥
Subject
पुढील मंत्रात सर्वव्यापी ईश्‍वराच्या गुणांचे वर्णन केले आहे -