Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 16

43 Mantra
5/16
Devata- विष्णुर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- स्वराट् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒रा॑वती धेनु॒मती॒ हि भू॒तꣳ सूय॑व॒सिनी॒ मन॑वे दश॒स्या। व्य॑स्कभ्ना॒ रोद॑सी विष्णवे॒ते दा॒धर्त्थ॑ पृथि॒वीम॒भितो॑ म॒यूखैः॒ स्वाहा॑॥१६॥

इरा॑वती॒ इतीरा॑ऽवती। धे॒नु॒मती॒ इति॑ धे॒नु॒ऽमती॑। हि। भू॒तम्। सू॒य॒व॒सिनी॑। सु॒य॒व॒सिनी॒ इति॑ सु॒ऽयव॒सिनी॑। मन॑वे। द॒श॒स्या। वि। अ॒स्क॒भ्नाः॒। रोद॑सी॒ इति॒ रोद॑सी। वि॒ष्णो॒ऽइति॑ विष्णो। ए॒तेऽइत्ये॒ते॑। दा॒धर्त्थ॑। पृ॒थि॒वीम्। अ॒भितः॑। म॒यूखैः॑। स्वाहा॑ ॥१६॥

Mantra without Swara
इरावती धेनुमती हि भूतँ सूयवसिनी मनवे दशस्या । व्यस्कभ्ना रोदसी विष्णवेते दाधर्थ पृथिवीमभितो मयूखैः स्वाहा ॥

इरावती इतीराऽवती। धेनुमती इति धेनुऽमती। हि। भूतम्। सूयवसिनी। सुयवसिनी इति सुऽयवसिनी। मनवे। दशस्या। वि। अस्कभ्नाः। रोदसी इति रोदसी। विष्णोऽइति विष्णो। एतेऽइत्येते। दाधर्त्थ। पृथिवीम्। अभितः। मयूखैः। स्वाहा॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - या मंत्राचे दोन अर्थ आहेत - हे (विष्रो) सर्वव्यापी परमेश्‍वरा, तूच या (इरावती) उत्कृष्ट अन्न-धान्याने भरलेल्या (धेनुमती) प्रशंसनीय वाणी, पुत्र व पशू आदीनी समृद्ध असलेल्या तसेच (सूर्यवासिनी) मिश्रित वा अमिश्रित अनेक वस्तू धारण करणार्‍या (पृथिवीम्) भूमीला धारण करतोस (तुझ्या कृपेमुळेच ही भूमी अन्न-धान्यदायिनी समृद्ध आहे व स्थित आहे) तसेच ही भूमी (स्वाहा) तुझ्या वेदवाणीमुळे (भूतम्) या उत्पन्न जगाला (मयूखैः) ज्ञानाचा प्रकाश देणारी आहे गुणांमुळे उत्तम करीत जगाला (अभित्) सर्वप्रकारे (दाधर्थ) धारण करणारी आहे. तूच या (रोदसी) सूर्यलोकाचे व पृथ्वीलोकाचे (व्यस्कभ्नाः) सम्यक प्रकारे स्तंभन व संचालन करीत आहेस. (मनवे) मान-विज्ञानयुक्त अशा तुला (दशस्या) दंतपंक्तीमधे स्थित असलेल्या जिह्वेप्रमाणे स्थिती असलेल्या तुला (दंतसमूहामूळे जिह्वा शुद्ध आणि सुंदर उच्चारण करते, त्याप्रमाणे परमेश्‍वराचे स्थान महत्त्वाचे आहे) (एते) आम्ही अशा सर्व जगांचा महिमा तुझ्यासमोर ठेवीत आहोत (तुझ्या सृष्टीच्या स्वरूपाची स्तुती करीत आहोत) ॥1॥^(विष्णोः) जी प्राण शक्तीने व्याप्त आहे (इरावती) उत्तम अन्नाने समृद्ध (धेनुमती) गौ आदी पशूंनी सुसंपन्न व (सूर्यवसिनी) अतीव मिश्रित वा अमिश्रित पदार्थानी भरलेली (पृथवीम्) पृथ्वी आहे, त्या भूमीला (स्वाहा) सुंदर व पुष्ट करण्यासाठी सूर्य (मयूखैः) आपल्या किरणांनी (अमितः) सर्व प्रकारे (दाधर्य) धारण करतो, आणि (रोदसी) ज्याचा प्रकाश भूमीला (व्यस्कभ्नाः) स्थिर वा पालन करतो त्या (दशस्या) दंशन वा दाताप्रमाणे आचरण करणार्‍या (दात अन्नपाचनाची साधनें आहेत) (मनवे) प्रकाश देणार्‍या व पाहण्याचे साधन असणार्‍या सूर्याचे दान (भूवंहि) निश्‍चयाने ईश्‍वराने सर्वांसाठी दिले आहे, (एते) आम्ही सर्व जग निश्‍चयाने असे मानतो. (या मंत्रात ‘सूघवयिनी’ विशेषण वाणी करिता देखील प्रयुक्त आहे. त्यावरून या मंत्राचा असाही अर्थ आहे की मिश्रित वा अमिश्रित, शुद्ध वा अशुद्ध अशा वाणीने व्याप्त या पृथ्वीवर (सकवाहा) वाक्र इंद्रियें (मयूखैः) आपल्या शक्तीने (अभितः) सर्वप्रकारे उच्चारण करतात. ईश्‍वराने अशा वाणीचे उच्चारण करण्यासाठी दंत आदी अवयव दिले आहेत. ॥2॥ ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्य किरणांद्वारे सर्व भूमी आदी जगाला प्रकाशित, आकर्षित आणि विभाजित करून धारण करीत आहे, त्याप्रमाणे परमेश्‍वराने आणि प्राणशक्तीने आपल्या सामर्थ्याने सर्व सूर्य आदी जगाला धारण करून उत्तमप्रकारे स्थापित केले आहे ॥16॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वर आणि सूर्य, यांच्या गुणांचे कथन केले आहे -