Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 15

43 Mantra
5/15
Devata- विष्णुर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
इ॒दं विष्णु॒र्विच॑क्रमे त्रे॒धा निद॑धे प॒दम्। समू॑ढमस्य पासु॒रे स्वाहा॑॥१५॥

इ॒दम्। विष्णुः॑। वि। च॒क्र॒मे॒। त्रे॒धा। नि। द॒धे॒। प॒दम् ॥ समू॑ढ॒मिति॒ सम्ऽऊ॑ढम्। अ॒स्य॒। पा॒सु॒रे। स्वाहा॑ ॥१५॥

Mantra without Swara
इदँविष्णुर्विचक्रमे त्रेधा नि दधे पदम् । समूढमस्य पाँसुरे स्वाहा ॥

इदम्। विष्णुः। वि। चक्रमे। त्रेधा। नि। दधे। पदम्॥ समूढमिति सम्ऽऊढम्। अस्य। पासुरे। स्वाहा॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विष्णुः) जो परमेश्‍वर सर्व जगात व्यापक असून हे जे काही सर्व जग आहे, त्या जगदीश्‍वरानेच याची (विचक्रमे) रचना केली आहे. तोच (इदम्) या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जगाला (त्रेदा) प्रकारे धारण करीत आहे तोच जगदीश्‍वर या समस्त सृष्टीला 1) प्रकाशवान सूर्यादी (2) प्रकाशरहित पृथ्वी आणि आदी (3) अदृश्य परमाणू या तीन रूपात धारण करीत आहे (स्वाहा) तसेच उत्तम प्रकारे पाहता येईल आणि दाखविता येईल, अशा प्रत्यक्ष जगाला आणि (इदम्) या (समूढम्) सखोल विचार करूनच त्याविषयी सांगता येईल, अशा अप्रत्यक्ष/अदृश्य जगाला तोच (पांसुरे) अंतरिक्षामधे (निदधे) (पदम्) स्थापित करतो आहे वा केले आहे त्याच परमेश्‍वराची सर्व मनुष्यांनी उत्तमरीत्या उपासना करणे उचित आहे (इतर कोणाची नको) ॥15॥
Essence
भावार्थ - परमेश्‍वराने प्रथम लोक म्हणजे प्रकाशवान सूर्यादी लोकांची, द्वितीय लोक म्हणजे प्रकाशरहित पृथ्वी आदी लोकांची आणि तिसरा लोक म्हणजे परमाणु आदी अदृश्य जगाची रचना करून त्यांना अंतरिक्षात स्थापित केले आहे, तोच या सर्व लोकांचे कारणरूप आहे (निमित्त कारण आहे) या तीन लोकांत पृथ्वीमधे औषधी वनस्पती आदींची, सूर्यादी लोकात प्रकाशाची व आकाशात परमाणूंची स्थापना करून सर्व जगाला प्राणांच्या शिरस्थानी स्थापित केले आहे. (त्रेधा निदधे पदम्) म्हणजे जगाला तीन प्रकारे पद म्हणजे स्थानांत स्थापित केले आहे, हा या मंत्राचा वास्तविक अर्थ आहे, पण महीधरनि या मंत्राचा अर्थ पौराणिक अल्पित देवता विष्णु आणि त्याचे वामनावतारात राजा बलिकडून तीन पावलात समस्त जगावर अधिकार मिळविले, असा निराधार व काल्पनिक अर्थ केला आहे.) शतपथ ब्राह्मणातील प्रमाणाच्या आधारे येथे गप शब्दाने प्राण या अर्थाचे ग्रहण केले आहे. या मंत्राविषयी महीधराने जे म्हटले आहे की त्रिविक्रम म्हणजे वामनावतार धारण करून जगाची रचना केली आहे, त्याचे कथन व ही व्याख्या सर्वथा मिथ्य आहे ॥15॥
Subject
तो परमेश्‍वर कसा आहे, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -