Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 12

43 Mantra
5/12
Devata- वाग्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- भूरिक् ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
सि॒ꣳह्यसि॒ स्वाहा॑ सि॒ꣳह्य॒स्यादित्य॒वनिः॒ स्वाहा॑ सि॒ꣳह्यसि ब्रह्म॒वनिः॑ क्षत्र॒वनिः॒ स्वाहा॑ सि॒ꣳह्यसि सुप्रजा॒वनी॑ रायस्पोष॒वनिः॒ स्वाहा॑ सि॒ꣳह्यस्याव॑ह देवान् यज॑मानाय॒ स्वाहा॑ भू॒तेभ्य॑स्त्वा॥१२॥

सि॒ꣳही। अ॒सि॒। स्वाहा॑। सि॒ꣳही। अ॒सि॒। आ॒दित्य॒वनि॒रित्या॑दित्य॒ऽवनिः॑। स्वाहा॑। सि॒ꣳही। अ॒सि॒। ब्र॒ह्म॒वनि॒रिति॑ ब्रह्म॒ऽवनिः॑। क्ष॒त्र॒वनि॒रिति॑ क्षत्र॒ऽवनिः॑। स्वाहा॑। सि॒ꣳही। अ॒सि॒। सु॒प्र॒जा॒वनि॒रिति॑ सुप्रजा॒ऽवनिः॑। रा॒य॒स्पो॒ष॒वनि॒रिति॑ रायस्पोष॒ऽवनिः॑। स्वाहा॑। सि॒ꣳही। अ॒सि॒। आ। वह॒। दे॒वान्। यज॑मानाय। स्वाहा॑। भू॒तेभ्यः॑। त्वा॒ ॥१२॥

Mantra without Swara
सिँह्यसि स्वाहा सिँह्यस्यादित्यवनिः स्वाहा सिँह्यसि ब्रह्मवनिः क्षत्रवनिः स्वाहा सिँह्यसि सुप्रजावनी रायस्पोषवनिः स्वाहा सिँह्यस्यावह देवान्यजमानाय स्वाहा । भूतेभ्यस्त्वा ॥

सिꣳही। असि। स्वाहा। सिꣳही। असि। आदित्यवनिरित्यादित्यऽवनिः। स्वाहा। सिꣳही। असि। ब्रह्मवनिरिति ब्रह्मऽवनिः। क्षत्रवनिरिति क्षत्रऽवनिः। स्वाहा। सिꣳही। असि। सुप्रजावनिरिति सुप्रजाऽवनिः। रायस्पोषवनिरिति रायस्पोषऽवनिः। स्वाहा। सिꣳही। असि। आ। वह। देवान्। यजमानाय। स्वाहा। भूतेभ्यः त्वा॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (याज्ञिक जन म्हणत आहे-) (आदित्यवनिः) बारा आदित्यांदवारे सेवनीय (वर्षाच्या बारा महिन्यात वापरली जाणारी, (सिंघी) क्रूरत्व आदी दोषांचा नाश करणारी व (स्वाहा) ज्योतिः शास्त्राने सुसंस्कारित केलेली वाणी आहे, मी त्या वाणीचा सर्व प्राण्यांसाठी वापर करीत (असि) आहे, तसेच जी (ब्रह्मवनिः) परमेश्‍वर परमात्म्याची वेदवाणी आणि वेदज्ञ विद्वांनांद्वारे प्रयुक्त होणारी वाणी आहे ती (सिंही) अज्ञानाला बलपूर्वक दूर करते आणि (स्वाहा) अध्ययन आणि अध्यापनासाठी प्रयुक्त होणारी व्यवहार्य वाणी (असि) आहे, तिचा मी सर्व प्राण्यांसाठी वापर करीत आहे. (क्षत्रवनिः) राज्य, धनुर्विद्या आणि शूरवीरजनांद्वारे प्रद्युक्त होणारी (सिंही) चोर -डाकू व अन्यायीजनाचा नाश करणारी व (स्वाहा) राज्य-व्यवहारात प्रयुक्त अशी जी समर्थ वाणी (असि) आहे, तिचा मी सर्व प्राण्यांसाठी प्रयोग करीत आहे. (रायस्पोषवनिः) विद्या व धनाचे पोषण करणारी (सिंही) अविद्येचा नाश करणारी जी वाणी (असि) आहे, त्या वाणीचा, तसेच (सुप्रजावनिः) प्रजाजनांचा उत्कर्ष करणारी आणि (सिंही) दुष्टांचा नाश करणारी व (सवाहा) कर्म, श्रम आणि व्यवहाराद्वारे प्राप्त होणारी जी वाणी (असि) आहे, तिचा मी सर्व प्राण्यांसाठी प्रयोग करीत आहे. (यजमानाय) विद्वज्जनांचे पूजन करणार्‍या यजमानाला जी वाणी (स्वाहा) दिव्यगुणांने संपन्न करते आणि (देवान्) विद्वानांना गुण व सुखभोग (आवह) प्राप्त करविते, (त्वा) त्या वाणीला मी याज्ञिकजन (भूतेभ्यंः) सर्व प्राण्यांसाठी (यज्ञात्) यज्ञाद्वारे (निःसृजामि) प्राप्त करतो. (यज्ञाद्वारे याज्ञिक जन अशी वाणी प्राप्त करू शकतो की जी अज्ञानाला दूर करते, (ज्ञानमयवाणी) अन्यायाचा नाश करते (उग्रवाणी), धन-संपदा प्राप्त करविते (मधुर व सत्य वाणी) तसेच गुणसंपन्न करते (विनयपूर्ण वाणी) ॥12॥
Essence
भावार्थ - या मंत्रात पूर्वीच्या मंत्रापासून (यज्ञात्) (निः) (मृजामि) या तीन शब्दांची अनुवृत्ती केली आहे. मनुष्यांनी अध्ययन, अध्यापन आदी द्वारे वर वर्णित वाणी प्राप्त करून सर्व मनुष्यांना तशी (ज्ञानमय, उग्र, धनदा आणि मधुर) वाणी शिकवावी आणि सर्वांना आनंदित असावे. ॥12॥
Subject
पुनश्‍च, ती वाणी कशी आहे तिचे गुण वैशिष्यें पुढील मंत्रात सांगितली आहेत -