Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 11

43 Mantra
5/11
Devata- वाग्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒न्द्र॒घो॒षस्त्वा॒ वसु॑भिः पु॒रस्ता॑त् पातु॒ प्रचे॑तास्त्वा रु॒द्रैः प॒श्चात् पा॑तु॒ मनो॑जवास्त्वा पि॒तृभि॑र्दक्षिण॒तः पातु॑ वि॒श्वक॑र्मा त्वादि॒त्यैरु॑त्तर॒तः पा॑त्वि॒दम॒हं त॒प्तं वार्ब॑हि॒र्धा य॒ज्ञान्निःसृ॑जामि॥११॥

इ॒न्द्र॒घो॒ष इती॑न्द्रघो॒षः। त्वा॒ वसु॑भि॒रिति॒ वसु॑ऽभिः। पु॒रस्ता॑त्। पा॒तु॒। प्रचे॑ता॒ इति॒ प्रऽचे॑ताः। त्वा॒। रु॒द्रैः। प॒श्चात्। पा॒तु॒। मनो॑जवा॒ इति॒ मनः॑ऽजवाः। त्वा॒। पि॒तृभि॒रिति॑ पि॒तृऽभिः॑। द॒क्षि॒ण॒तः। पा॒तु॒। वि॒श्वक॒र्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। त्वा॒। आ॒दि॒त्यैः। उ॒त्त॒र॒तः। पा॒तु॒। इ॒दम्। अ॒हम्। त॒प्तम्। वाः। ब॒हि॒र्धेति॑ बहिः॒ऽधा। य॒ज्ञात्। निः। सृ॒जा॒मि॒ ॥११॥

Mantra without Swara
इन्द्रघोषस्त्वा वसुभिः पुरस्तात्पातु प्रचेतास्त्वा रुद्रैः पश्चात्पातु मनोजवास्त्वा पितृभिर्दक्षिणतः पातु विश्वकर्मा त्वादित्यैरुत्तरतः पात्विदमहन्तप्तँवार्बहिर्धा यज्ञान्निः सृजामि ॥

इन्द्रघोष इतीन्द्रघोषः। त्वा वसुभिरिति वसुऽभिः। पुरस्तात्। पातु। प्रचेता इति प्रऽचेताः। त्वा। रुद्रैः। पश्चात्। पातु। मनोजवा इति मनःऽजवाः। त्वा। पितृभिरिति पितृऽभिः। दक्षिणतः। पातु। विश्वकर्मेति विश्वऽकर्मा। त्वा। आदित्यैः। उत्तरतः। पातु। इदम्। अहम्। तप्तम्। वाः। बहिर्धेति बहिःऽधा। यज्ञात्। निः। सृजामि॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - विद्वज्जनहो, (प्रचेताः) उत्तम ज्ञानयुक्त (इन्द्रघोषः) परमेश्‍वराच्या वेदविद्येचा आणि विद्युतेचा घोष सांगणारी म्हणजे शब्द आणि अर्थाचा संंबंध दाखविणार्‍या वाणीला (विश्‍वकर्मा) सर्व यज्ञ अध्यापनादी कर्मामधे कुशल असलेला मी (यज्ञात) अध्ययन-अध्यापनाने वाढवितो अथवा होमरूप यज्ञाने (इदम्) या आंत असणार्‍या (तप्तम्) उष्ण जलाला आणि (बहिर्धा) बाहेर असणार्‍या शीतल (वाः) जलाला (निःसृजामि) निर्माण करतो वा बाहेर काढतो (यज्ञाच्या वेळी वेदवाणीचे उच्चारण करीत आवश्यक जलाला उष्ण करतो, शेष शीतल जल साठी ठेवतो) याप्रकारे तुम्ही सर्वजण देखील करा. (वसुभिः) अग्नी आदी पदार्थाबाबत अथवा चोवीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण केलेल्या मनुष्याजवळ (इन्द्रघोषः) परमेश्‍वर जीव आणि विद्युत या तिन्ही संबधी अनेक शब्द असलेली जी वाणी आहे (शब्दम्पप्ती वा भाषागौरव आहे) त्या वाणीचे मी (पुरस्तात्) पूर्वदेशाकडून रक्षण करतो (ती वाणी विकृत होऊ नये वा विस्मृत होऊ नये, यासाठी सर्व दिशांकडून त्या वाणीचे रक्षण करतो) त्याप्रमाणे तुम्ही जण देखील त्या वाणीला (पातु) जपा वा रक्षण करा. (रूदैः) प्राणांसोबत असणारी अथवा चवेचाळीस वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धारण करणार्‍या मनुष्याजवळ जी (प्रचेताः) उत्तम ज्ञानदायिनी वाणी आहे,त्याचे मी (पश्‍चात्) पश्‍चिम दिशेकडून रक्षण करतो. त्याप्रमाणे तुम्ही देखील (पातु) त्या वाणीचे रक्षण करा. (पितृभिः) ऋतूंच्यासोबत असणारी अथवा ज्ञानी पुरूषांजवळ असणारी जी (मनोजवा:) मनाच्या वेगाप्रमाणे वेगवती वाणी आहे, त्याचे मी (दक्षिणतः) दक्षिण दिशे कडून रक्षण करतो त्याप्रमारे तुम्हीही (पातु) त्याचे रक्षण करा. (आदित्यै) बारा महिने असणारी वा अठ्ठेचाळीस वर्ष ब्रह्मचर्य धारण केलेल्या विद्वानाजवळ जी (विश्‍वकर्मा) कर्मयुक्त वाणी आहे, त्याचे मी (उत्तरतः) उत्तरदिशेकडून रक्षण करतो (अथवा पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर या दिशामधे त्या वाणीचे पालन व अभिवृत्ती करतो) त्याप्रमाणे तुम्ही जण देखील (पातु) त्याचे रक्षण, पालन व वृद्धी करा. (वाणीमधे शब्द आणि अर्थाचा संबंध असावा. निरर्थक शब्दांना वाणीत स्थान नाही वाणीमधे अनेकोअर्थवाची शब्द असावेत 3) वाणी उत्तम ज्ञान देणारी असावी 3) वाणी वेगवती म्हणजे प्रवाहमयी असावी वाणीची वा भाषेची ही चार वैशिष्टें या मंत्रात सांगितली आहेत.) ॥11॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. मनुष्यांसाठी हे उचित आहे की त्यानी वसु, रूद्र, आदित्य आणि पितरांनी सेवन केलेल्या वाणीचा अथवा यज्ञाची पूर्तता करणार्‍या वाणीचा उपयोग करावा तसेच जलाच्या विविध प्रयोग उत्तम क्रिया आदीद्वारे व विधिपूर्वक विद्युत उत्पादन करावे आणि निरंतर त्या विद्युतेपासून लाभ प्राप्त करावेत (येथे जलप्रपाता) पासून विद्युत-उत्पादनाचा संकेत दिसतो) ॥11॥
Subject
पुनश्‍च, तो परमेश्‍वर कसा आणि ती वाणी कशी आहे, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -