Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 1

43 Mantra
5/1
Devata- विष्णुर्देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- स्वराट् ब्राह्मी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अ॒ग्नेस्त॒नूर॑सि॒ विष्ण॑वे त्वा॒ सोम॑स्य त॒नूर॑सि॒ विष्ण॑वे॒ त्वा॒ऽति॑थेराति॒थ्यम॑सि॒ विष्ण॑वे त्वा श्ये॒नाय॑ त्वा सोम॒भृते॒ विष्ण॑वे त्वा॒ऽग्नये॑ त्वा रायस्पोष॒दे विष्ण॑वे त्वा॥१॥

अ॒ग्नेः। त॒नूः। अ॒सि॒। विष्ण॑वे ॥ त्वा॒ सोम॑स्य। त॒नूः अ॒सि॒। विष्ण॑वे। त्वा॒। अति॑थेः। आ॒ति॒थ्यम्। अ॒सि॒। विष्ण॑वे। त्वा॒। श्येनाय॑। त्वा॒। सो॒म॒भृत॒ इति॑ सोम॒ऽभृते॑। विष्ण॑वे। त्वा॒। अ॒ग्नये॑। त्वा॒। रा॒य॒स्पो॒ष॒द इति॑ रायस्पोष॒ऽदे। विष्ण॑वे। त्वा॒ ॥१॥

Mantra without Swara
अग्नेस्तनूरसि विष्णवे त्वा सोमस्य तनूरसि विष्णवे त्वातिथेरातिथ्यमसि विष्णवे श्येनाय त्वा सोमभृते विष्णवे त्वाग्नये त्वा रायस्पोषदे विष्णवे त्वा ॥

अग्नेः। तनूः। असि। विष्णवे॥ त्वा सोमस्य। तनूः असि। विष्णवे। त्वा। अतिथेः। आतिथ्यम्। असि। विष्णवे। त्वा। श्येनाय। त्वा। सोमभृत इति सोमऽभृते। विष्णवे। त्वा। अग्नये। त्वा। रायस्पोषद इति रायस्पोषऽदे। विष्णवे। त्वा॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जो (अग्नेः) विद्युतरूप अग्नीच्या (तनूः) शरीरासमान (असि) आहे (विद्युतनिर्मितीसाठी ज्या ज्या वस्तु आवश्यक आहेत) (त्वा) त्यांचा मी (विष्णवे) यज्ञाच्या सिद्धी करिता स्वीकार करतो . (सोमस्य) संसारात उत्पन्न पदार्थ समूहाचा (तनूः) जो विस्तृत भाग आहे अर्थात विविध पदार्थ (असि) आहे (त्वा) त्यांचा मी (विष्णवे) वायूच्या शुद्धतेकरिता उपयोग करतो. (अतिथेः) सन्यासी आदी सत्कारयोग्य व्यक्तींचा (आतिथ्यम्) जो आतिथ्यरूप सेवाकर्म (असि) आहे, (त्वा) त्यास मी (विष्णवे) विज्ञानरूप यज्ञाच्या पूर्ततेसाठी ग्रहण करीत आहे (श्येनाय) ज्या वस्तू शयन म्हणजे बहिरीससाणा पक्ष्याप्रमाणे वेगाने जाण्यासाठी (असि) आहेत, (त्वा) त्या द्रव्याला मी अग्नीमधे सोडत आहे. (विष्णवे) सर्व विद्या व कर्मांनी मुक्त (सोमभृते) सोम समूहास म्हणजे सोम आदी औषधीस धारण करणार्‍या यजमानाच्या सुखाकरिता जे (असि) आहे (तव) त्या सोमसमूहाचा ग्रहण करीत आहे. (अग्नये) या अग्नीला प्रदीप्त करण्यासाठी जी काष्ठ आदी सामग्री आहे (त्वा) त्याचा मी स्वीकार करीत आहे. (रायस्पोषदे) धनाची भरपूर वृद्धी करणारे व (विष्णवे) उत्तम गुण, कर्म विद्येच्या प्राप्तीकरता जे जे उत्तम आहेत (त्वा) त्यांचा मी ग्रहण करीत आहे. हे मनुष्यांनो माझ्याप्रमाणे तुम्ही देखील यज्ञासाठी वरील सर्व वस्तूंचा संचय व उपयोग करीत जा. (यज्ञाचे विविध उपयोग आणि त्यासाठी आवश्यक द्रव्य-सामग्रीचे वर्णन या मंत्रात आहे, विद्युतरूप अग्नी, द्रव्यपदार्थ, आतिथ्य, वेगवान यान, यजमानाचे कल्याण, काष्ठादी द्रव्य, धनवृद्धी, आदी यज्ञाचे रूप व उपयोग आहेत) ॥1॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे मनुष्यांकरिता हे उचित हितकारी कर्म आहे की त्यांनी मंत्रात वर्णिलेल्या लाभांच्या प्राप्तीसाठी तीन प्रकारच्या यज्ञाचे अनुष्ठान नित्य करावे (विद्युत-प्राप्ती, वायुशुद्धी, आतिथ्य, यान विज्ञान, विद्या, धन, उत्तम गुण कर्म, या सर्वांची प्राप्ती हे सर्व यज्ञाचे लाभ आहेत) ॥1॥
Subject
॥अथ पंचमाध्यायारम्भः॥^आतां चवथ्या अध्यायानंतर पाचव्या अध्यायाच्या भाष्याचा आरंभ केला जात आहे -^कोणत्या प्रयोजनासाठी यज्ञाचे अनुष्ठान करणे उचित आहे, या विषयाचे कथन पुढील मंत्रात केले आहे -