Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 9

17 Mantra
40/9
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न्धन्तमः॒ प्र वि॑शन्ति॒ येऽस॑म्भूतिमु॒पास॑ते।ततो॒ भूय॑ऽइव॒ ते तमो॒ यऽउ॒ सम्भू॑त्या र॒ताः॥९॥

अ॒न्धम्। तमः॑। प्र। वि॒श॒न्ति॒। ये। अस॑म्भूति॒मित्यस॑म्ऽभूतिम्। उ॒पास॑त॒ इत्यु॑प॒ऽआस॑ते ॥ ततः॑। भूय॑ऽइ॒वेति॒ भूयः॑ऽइव। ते। तमः॑। ये। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सम्भू॑त्या॒मिति॒ सम्ऽभू॑त्या॒म्। र॒ताः ॥९ ॥

Mantra without Swara
अन्धन्तमः प्र विशन्ति येसम्भूतिमुपासते । ततो भूयऽइव ते तमो यऽउ सम्भूत्याँ रताः ॥

अन्धम्। तमः। प्र। विशन्ति। ये। असम्भूतिमित्यसम्ऽभूतिम्। उपासत इत्युपऽआसते॥ ततः। भूयऽइवेति भूयःऽइव। ते। तमः। ये। ऊँऽइत्यूँ। सम्भूत्यामिति सम्ऽभूत्याम्। रताः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जे लोक परमेश्‍वराची उपासना करणे सोडून (असम्भूतिम्) अनादी आणि सत्त्व, रज, तम या गुणांनी युक्त प्रकृतीरूप जड वस्तूची (उपासते) उपासना करतात (प्रकृति अनादि आहे, पण ती जड अचेतन आहे, त्यामुळे जडची पूजा, मूर्तीपूजा त्याज्य व व्यर्थ आहे) ते प्रकृतिपूजक मनुष्य (अन्धम्, तमः) सर्वांना आवृत करणार्‍या (अज्ञानरूप) अंधकारात (प्रविशन्ति) प्रवेश करतात (अज्ञानन्धकारामुळे त्याना सत्य स्वरूप वा उपास्यदेव कोण, याचा निश्‍चय होत नाही) तसेच (ये) जे मुनष्य (संभूत्याम्) महत्त्व आदी रूपाने परिणामात आलेल्या सृष्टीमधे (रताः) रमण करतात (ते) (उ) तेदेखील अवश्यमेव (ततः) त्या (प्रकृतिजनक मनुष्यापेक्षा) (भूय इव) अधिक प्रगाढ अविद्यारूप अंधकारात सापडतात ॥9॥
Essence
भावार्थ - सर्व अचेतन जगाचे जे नित्य कारण म्हणजे प्रकृती, त्या प्रकृतीला जे लोक उपास्य मानतात, ते अविद्येत गुरफटून दुःख क्लेश भोगतात. तसेच जे त्या कारणरूप प्रकृतीपासून अत्यंत स्थूल सूक्ष्म कार्य कारणरूप अनित्य व संयोगजन्य कार्याला अर्थात् जगाला इष्ट वा उपास्य मानतात, ते अधिक अज्ञानात सापडून त्याहून अधिक दुःख क्लेश भोगतात. यामुळे सर्व लोकांनी केवळ सच्चिदानंद स्वरूप परमेश्‍वराचीच उपासना सदा करावी. ॥9॥
Subject
कोणते मनुष्य अंधकारात चाचपडतात, याविषयी -