Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 7

17 Mantra
40/7
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यस्मि॒न्त्सर्वा॑णि भू॒तान्या॒त्मैवाभू॑द्विजान॒तः।तत्र॒ को मोहः॒ कः शोक॑ऽएकत्वम॑नु॒पश्य॑तः॥७॥

यस्मि॑न्। सर्वा॑णि। भू॒तानि॑। आ॒त्मा। ए॒व। अभू॑त्। वि॒जा॒न॒त इति॑ विऽजान॒तः ॥ तत्र॑। कः। मोहः॑। कः। शोकः॑। ए॒क॒त्वमित्ये॑क॒ऽत्वम्। अ॒नु॒पश्य॑त॒ऽइत्य॑नु॒पश्य॑तः ॥७ ॥

Mantra without Swara
यस्मिन्त्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः । तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥

यस्मिन्। सर्वाणि। भूतानि। आत्मा। एव। अभूत्। विजानत इति विऽजानतः॥ तत्र। कः। मोहः। कः। शोकः। एकत्वमित्येकऽत्वम्। अनुपश्यतऽइत्यनुपश्यतः॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (यस्मिन्) ज्या परमेश्‍वराला ज्ञान, विज्ञान आणि धर्म, यांद्वारे (विजानतः) विशेत्वाने ध्यानदृष्टीने पाहणारे (विद्वान, वा योगीजन) (सर्वाणि) (भूतानि) सर्व प्राण्यांमधे (आत्मा, एव) इतरांचे सुख-दुःख आपले सुख-दुःख मानतात (परमेश्‍वराला प्राणिमात्रात पाडून) (अभूत्) सर्वांना आपले मानतात (तत्र) त्या परमात्म्यात (एकत्वम्) अद्वितीय भाव (अनु, पश्यतः) पाहतात (अर्थात् तो एकच आहे, अनेक नाही, असो मानतात) तसेच योगाभ्यासाने त्याला साक्षात अनुभवतात, त्या योगीजनांना (कः) कसलाच कुठला (मोहः) मोहवा अज्ञान, संशय होणार? (सर्वांत तोच परमेश्‍वर असल्यामुळे आपला कोण व परका कोण/ईश्‍वराच्या नात्याने सर्व जण आपलेच असा शुद्ध भान असणार) तसेच योगीजनांना (कः) (शोकः) कसला शोक वा क्लेश? म्हणजे योगीजनांना मोह व शोक सतावणार नाही. ॥7॥
Essence
भावार्थ - जे विद्वान संन्यासी परमेश्‍वराचे सहचारी होऊन (त्याला आपला साथीयातून व त्याला सर्वत्र विद्यमान मानतात, प्राणिमात्राला आपल्याप्रमाणे मानतात, म्हणजे जसे ते स्वहित चाहतात, त्याप्रमाणे इतरांच्या कल्याणासाठी झटतात. ते (सुखी होतात.) तसेच जे केवळ एकमेव अद्वितीय परमेश्‍वराच्या आनयात राहतात त्यांना मोह, लोक आणि लोभ आदी कदापि पीडा देणार नाहीत. जे लोक आपल्या आत्म्यास ओळखून परमेश्‍वराला ओळखतात, (म्हणजे मी कोण व ईश्‍वर कोण कसा असे स्पष्ट जाणतात) ते सदैव सुखी, आनंदी असतात. ॥7॥
Subject
अविद्या आदी दोषांचा कोण त्याग करतात, याविषयी -