Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 5

17 Mantra
40/5
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
तदे॑जति॒ तन्नैज॑ति॒ तद् दू॒रे तद्व॑न्ति॒के।तद॒न्तर॑स्य॒ सर्व॑स्य॒ तदु॒ सर्व॑स्यास्य बाह्य॒तः॥५॥

तत्। ए॒ज॒ति॒। तत्। न। ए॒ज॒ति॒। तत्। दू॒रे। तत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। अ॒न्ति॒के ॥ तत्। अ॒न्तः। अ॒स्य॒। सर्व॑स्य। तत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सर्व॑स्य। अ॒स्य॒। बा॒ह्य॒तः ॥५ ॥

Mantra without Swara
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सरवस्यास्य बाह्यतः ॥

तत्। एजति। तत्। न। एजति। तत्। दूरे। तत्। ऊँऽइत्यँू। अन्तिके॥ तत्। अन्तः। अस्य। सर्वस्य। तत्। ऊँऽइत्यँू। सर्वस्य। अस्य। बाह्यतः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (जाणून घ्या की) (तत्) तो ब्रह्म (एजति) अज्ञानी लोकांच्या दृष्टीने (चल वा इकडे-तिकडे चालणारा) असेल, पण वस्तुतः (तत्) तो (न, एजति) स्वस्वरुपाने चलायमान नाही आणि कोणी त्याला चालवू शकत नाही. (तत्) तो परब्रह्म अधर्मात्मा अविद्वान अयोगी लोकांपासून अति अति दूर म्हणजे कोटी कोटी वर्षात देखील ते त्याला प्राप्त करू शकत नाहीत (कारण तो ज्ञानगम्य आहे आणि मूर्खांजवळ ज्ञानाचा अभाव असतो.) (तत्) (उ) पण तोच परब्रह्म (अन्तिके) विद्वानांच्या अतिसमीप असतो (ते ज्ञानाद्वारे हृद्यस्थ ईश्‍वराला साक्षात करतात) (वत्) तो (अस्य) याच्या (या मनुष्याच्या म्हणणे) (सर्वस्य) सर्व प्राण्यांच्या व सर्व सृष्टीच्या (अन्तः) मध्ये (उ) आणि (तत्) तो (अस्य, सर्वस्य) या प्रत्यक्ष वा परोक्ष जगाच्या (बाह्यतः) बाहेरदेखील विद्यमान आहे ॥5॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, तो परब्रह्म मूर्खाच्या विचारात ??दित वा चलायमान आहे (म्हणजे मूर्खजन त्याला तसा मानतात) पण वस्तुला तो सर्वव्यापक असल्यामुळे चलायमान नाही. जे लोक त्याच्या आज्ञेविरुद्ध वागतात, ते इकडे-तिकडे व्यर्थ भटकतात आणि त्या परब्रह्माला जाणु शकत नाहीत. याउलट जे ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहेत, ते आपल्या आत्म्यात विद्यमान अतिनिकटस्थित ईश्‍वराला प्राप्त करतात. जो ब्रह्म प्रकृती आदीच्या आत-बाहेर सर्व अवयवांत व्याप्त असून, अंतर्यामी असल्यामुळे सर्व जीवांची पाप-पुण्यकर्में जाणतो व त्यांचे यथोचित फळ देतो, त्याचेच सर्वांनी ध्यान केले पाहिजे आणि वाईट कर्म करताना त्यापासून भीती बाळगली पाहिजे. ॥5॥
Subject
ब्रह्म विद्वांनाच्याजवळ असून अविद्वानांपासून दूर आहे -