Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 4

17 Mantra
40/4
Devata- ब्रह्म देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृत्त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अने॑ज॒देकं॒ मन॑सो॒ जवी॑यो॒ नैन॑द्दे॒वाऽआ॑प्नुव॒न् पूर्व॒मर्ष॑त्।तद्धाव॑तो॒ऽन्यानत्ये॑ति॒ तिष्ठ॒त्तस्मि॑न्न॒पो मा॑त॒रिश्वा॑ दधाति॥४॥

अने॑जत्। एक॑म्। मन॑सः। जवी॑यः। न। ए॒न॒त्। दे॒वाः। आ॒प्नु॒व॒न्। पूर्व॑म्। अर्ष॑त् ॥ तत्। धाव॑तः। अ॒न्यान्। अति॑। ए॒ति॒। तिष्ठ॑त्। तस्मि॑न्। अ॒पः। मा॒त॒रिश्वा॑। द॒धा॒ति॒ ॥४ ॥

Mantra without Swara
अनेजदेकम्मनसो जवीयो नैनद्देवाऽआप्नुवन्पूर्वमर्शत् । तद्धावतोन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥

अनेजत्। एकम्। मनसः। जवीयः। न। एनत्। देवाः। आप्नुवन्। पूर्वम्। अर्षत्॥ तत्। धावतः। अन्यान्। अति। एति। तिष्ठत्। तस्मिन्। अपः। मातरिश्वा। दधाति॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान मनुष्यहो (हे जाणून घ्या की) तो परब्रह्म (एकम्) अद्वितीय व एकच आहे. तो (अनेजत्) कंप पावणारा वा कंपित होणारा नाही म्हणजे अचल असून आपल्या नित्यदशेपासून यत्किंचितही कंपित वेगवान असून (पूर्वम्) तोच सर्वाच्या पुढे (अर्षत्) चालणारा आहे म्हणजे कोणीही मनुष्य चालत कुठे जातो, तर ब्रह्म त्याच्या आधी (नित्य व व्यापक असल्यामुळे) तिथे विद्यमान असतो. (एनत्) या पूर्ववर्णित ईश्‍वराला (देवाः) नेत्र आदी इंद्रियें (न) (आन्पवन्) प्राप्त करू शकत नाही (तो अति सूक्ष्म असून इंद्रियांचा विषय नाही) (तत्) तो परब्रह्म स्वतःच्या सामर्थ्याने (तिष्ठत्) स्थिर असून अनंत व सर्वव्यापक असल्यामुळे (धावतः) विषयांकडे धावणार्‍या (अन्यान्) मन, वाणी आदी इंद्रियांना (अति, एति) उल्लंघून पुढे जातो (इंद्रियें त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत.) (तस्मिन्) त्या सर्वव्यापी ईश्‍वराच्या स्थिरतेमधे (मातरिश्‍वा) अंतरिक्षात प्राणांचे धारण करणार्‍या वायूप्रमाणे जीवात्मा (अपः) कर्म (दधति) करतो वा क्रिया करतो. (ब्रह्म सर्वव्यापक व स्थिर असून सर्व जीवात्मा त्यामधे गती व क्रिया करतात म्हणजे कोणीही आत्मा वा पदार्थ त्याच्या बाहेर नाही.) ॥4॥
Essence
भावार्थ - तो परब्रह्म अनंत आहे यामुळे मन जेथे जेथे जाते, सर्वव्यापी ब्रह्म तेथे तेथे आधीपासून विद्यमान असते. त्या ईश्‍वराचे ज्ञान शुद्ध मनाने होत असून तो नेत्र आदी इंद्रियांद्वारे गम्य नाही आणि अविद्वान मनुष्यांद्वारा ज्ञातव्य वा ज्ञेय नाही. तो ब्रह्म स्वतः निश्‍चळ असून सर्व जीवांना नियमाप्रमाणे चालवितो वा धारण करतो. तो अति सूक्ष्म असल्यामुळे इंद्रियगम्य नाही, त्यामुळे केवळ धर्मात्मा विद्वान योगी यांनाच त्याचे साक्षात ज्ञान होते, अन्यांना नाही. ॥4॥
Subject
कोण ईश्‍वराचा साक्षात्कार करू शकतो, याविषयी -