Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 2

17 Mantra
40/2
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
कु॒र्वन्ने॒वेह कर्मा॑णि जिजीवि॒षेच्छ॒तꣳ समाः॑।ए॒वं त्वयि॒ नान्यथे॒तोऽस्ति॒ न कर्म॑ लिप्यते॒ नरे॑॥२॥

कु॒र्वन्। ए॒व। इ॒ह। कर्मा॑णि। जि॒जी॒वि॒षेत्। श॒तम्। समाः॑ ॥ ए॒वम्। त्वयि॑। न। अ॒न्यथा॑। इ॒तः। अ॒स्ति॒। न। कर्म॑। लि॒प्य॒ते॒। नरे॑ ॥२ ॥

Mantra without Swara
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः । एवन्त्वयि नान्यथेतो स्ति न कर्म लिप्यते नरे ॥

कुर्वन्। एव। इह। कर्माणि। जिजीविषेत्। शतम्। समाः॥ एवम्। त्वयि। न। अन्यथा। इतः। अस्ति। न। कर्म। लिप्यते। नरे॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (इह) संसारात (कर्माणि) निष्काम भावनेने धर्माय वेदोक्त कर्म (कुर्वन्) करीत (एव) करीतच माणसाने (शतम्) शंभर (समाः) वर्ष (जिजीविषेत्) जगण्याची इच्छा करावी (काही न करता अथवा अधार्मिक कृत्यें करीत जगणे म्हणजे जीवन व्यर्थच) हे मनुष्या, (एवम्) अशाप्रकारे धर्मयुक्त कार्यें करीत (नरे) जीवनावश्यक सर्व व्यवहार करीत जीवन जगत (कर्म) अधर्ममय अवैदिक कर्में त्वदि) तुझ्यात वा तुझ्याशी) (न) (लिप्यते) लिप्त होत नाहीत. (तू दुष्कर्मांच्या तावडीत सापडत नाहीस) (इतः) यामुळे यापेक्षा इतर मार्गाने गेल्यास माणूस (न अस्ति) कर्मात लिप्त होतो (कर्मकाळाच्या आशेशी बद्ध होतो त्याची कर्में निष्काम होत नाहीत) ॥2॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी हे केले पाहिजे की आळस झटकून सर्वकाही पाहणार्‍या न्यायाधीश परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन करीत राहावे, शुभकर्म करीत जावे. ब्रह्मचर्य-पालन, विद्याभ्यास, उपस्थेन्द्रियाचे नियमन, यांद्वारे अल्पकालिक जीवन व अल्पायू टाळावी आणि योग्य आहार-विहार करीत शंभर वर्ष जगावे. माणसें जसजशी सत्कर्मासाठी यत्न आणि शील यांत वृद्धी होत जाते. ॥2॥
Subject
पुढील मंत्रात वेदोक्त कर्म उत्तम कसे, हे प्रतिपादित केले आहे -