Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 17

17 Mantra
40/17
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
हि॒र॒ण्मये॑न॒ पात्रे॑ण स॒त्यस्यापि॑हितं॒ मुखम्।यो॒ऽसावा॑दि॒त्ये पु॑रुषः॒ सोऽसाव॒हम्। ओ३म् खं ब्रह्म॑॥१७॥

हि॒र॒ण्मये॑न॒। पात्रे॑ण। स॒त्यस्य॑। अपि॑हित॒मित्यपि॑ऽहितम्। मुख॑म् ॥ यः। अ॒सौ। आ॒दि॒त्ये। पुरु॑षः। सः। अ॒सौ। अ॒हम्। ओ३म्। खम्। ब्रह्म॑ ॥१७ ॥

Mantra without Swara
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । यो सावादित्ये पुरुषः सो सावहम् । ओ३म् खं ब्रह्म ॥

हिरण्मयेन। पात्रेण। सत्यस्य। अपिहितमित्यपिऽहितम्। मुखम्॥ यः। असौ। आदित्ये। पुरुषः। सः। असौ। अहम्। ओ३म्। खम्। ब्रह्म॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ईश्‍वर उपदेश देत आहे) हे मनुष्यानो, जो (हिरण्मयेन जोतिस्वरूप (पात्रेण) आणि सर्वांचा रक्षक असून (सत्यस्य) जो अविनाशी यथार्थ कारण आहे. ज्याद्वारे (अपिहितम्) हे सर्व आच्छादित आहे. (मुखम्) मुखाप्रमाणे उत्तम अंगाद्वारे (जसे तुम्ही) वाणी प्रकाशित करता, तसा) उत्तम वेदवाणीचा प्रकाश) (यः) जो करतो, (असौ) तो जो (आदित्ये) प्राणात वा सूर्यमंडळात व्याप्त (पुरुष) पूर्ण परमात्मा आहे (सः) तो (असौ) परोक्षरूप (अहम्) मी असून मीच (खम्) आकाशाप्रमाणे व्यापक असून (ब्रह्म) गुण, कर्म, स्वभाव यांदृष्टीने सर्वाहून अधिक आहे (ओ3म्) सर्वाचा रक्षक जो मी, त्याचे नांव (ओ3म्) ओ3म् आहे, असे जाणा ॥17॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर मनुष्यमात्रासाठी उपदेश देत आहे की हे मनुष्यानो, जो मी इथे (भूगोलावर) आहे, तोच मी अन्यत्र सूर्य आदी सर्व लोकांमधे आहे जो मी अन्य सूर्यादी स्थानात आहे, तोच व तसाच मी येथेही आहे. मी सर्वत्र परिपूर्ण भरलेला असून आकाशात व्यापक आहे माझ्यापासून कोण वेगळा वा दूर नाही आणि माझ्याहून कोणी महान नाही. मी सर्वांहून महान आहे. माझ्या सुलक्षणांनी संपन्न, मला पुत्रवत प्रिय प्राणांहून प्रिय असे माझे नाम ओ3म् आहे. जो कोणी प्रेमाने व सत्याचरणाद्वारे माझ्या आश्रयात येतो, मी अंतर्यामी असल्यामुळे त्याच्या अज्ञानाचा नाश करतो आणि त्याच्या आत्म्यात ज्ञान प्रकाशित करतो. त्याला शुभगुण, कर्म, स्वभावमय करून त्याच्यावर माझे सत्यावरण स्थिर करतो. योगाद्वारे विशेष ज्ञान देऊन त्याला सर्व दुःखापासून मुक्त करतो आणि त्यास मोक्षसुख प्रदान करतो ॥इति॥17॥
Subject
अनन्तः ईश्‍वर मनुष्यांना उपदेश देत आहे -
Footnote
या अध्यायात ईश्‍वराच्या गुरांचे वर्णन, अधर्म त्यागाविषयी उपदेश, सदा सर्वकाळी सत्कर्म करण्याची आवश्यकता, अधर्माचरणाची निन्दा, परमेश्‍वराच्या अतिसूक्ष्म स्वरूपाचे वर्णन, विद्वानाने विद्यावान असणे, अविद्वानाला आपल्या अज्ञानाची जाणीव असणे, सर्वत्र तोच परमात्मा असल्यामुळे वा आपल्याप्रमाणे सर्वांचा आत्मा याची जाणीव ठेऊन. हिंसेपासून दूर असणे वा अहिंसाधर्माचे रक्षण, त्यामुळे मोह, शोक आदींचा त्याग, ईश्‍वराचे जन्म आदी दोषांपासून मुक्त असणे, वेदविद्येचा उपदेश, कार्यकारणरूप अचेतन जगताच्या उपासनेचा निषेध त्या कार्यकारणाने मृत्यूस निवेदित करून मोक्षादीची सिद्धी, जड म्हणजे अचेतन वस्तुच्या उपासनेचा निषेध, चेतन ईश्‍वराच्या उपासनेचा विधी, चेतन-अचेतन दोघांचे स्वरूप यथार्थरूपाने जाणण्याची आवश्यकता, शरीराचा स्वभाव, समाधीद्वारा परमेश्‍वराला आपल्या आत्म्यात धारण करून शरीर त्यागणें, मृतदेहाच्या दहनानंतर अन्य कोणती क्रिया करण्याविषयी निषेध, अधर्मत्यागाकरिता आणि धर्मवृद्धीकरिता परमेश्‍वराची प्रार्थना, ईश्‍वराच्या स्वस्वरूपाचे वर्णन, आणि ‘ओ’म्’ हे नाव सर्व नांवा घेता उत्तम, या सर्व विषयांचे या अध्यायात प्रतिपादन केले आहे. यामुळे या (४० व्या) अध्यायात सांगितलेल्या अर्थाची संगती या पुर्वीच्या (३९ व्या) अध्यायाच्या अर्थाशी आहे, असे जाणावे. ॥^श्रीमान् महर्षी दयानंद सरस्वती कृत यजुर्वेद हिन्दी भाष्याच्या ४०व्या अध्यायाचा मराठी भाष्यानुवाद समाप्त