Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 15

17 Mantra
40/15
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- स्वराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
वा॒युरनि॑लम॒मृत॒मथे॒दं भस्मा॑न्त॒ꣳ शरी॑रम्।ओ३म् क्रतो॑ स्मर। क्लि॒बे स्म॑र। कृ॒तꣳ स्म॑र॥१५॥

वा॒युः। अनि॑लम्। अ॒मृत॑म्। अथ॑। इ॒दम्। भस्मा॑न्त॒मिति॒ भस्म॑ऽअन्तम्। शरी॑रम् ॥ ओ३म्। क्रतो॒ इति॒ क्रतो॑। स्म॒र॒। क्लि॒बे। स्म॒र॒। कृ॒तम्। स्म॒र॒ ॥१५ ॥

Mantra without Swara
वायुरनिलममृतमथेदम्भस्मान्तँ शरीरम् । ओ३म् । क्रतो स्मर । क्लिबे स्मर । कृतँ स्मर ॥

वायुः। अनिलम्। अमृतम्। अथ। इदम्। भस्मान्तमिति भस्मऽअन्तम्। शरीरम्॥ ओ३म्। क्रतो इति क्रतो। स्मर। क्लिबे। स्मर। कृतम्। स्मर॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (क्रतो) कर्म करणार्‍या जीवात्मा, तू शरीरत्याग करतेवेळी (ॐ) या ईश्‍वरनामाचे (स्मर) स्मरण कर. (विलबे) (या कठिण प्रसंगी धैर्य व शांतीसाठी) आपल्या नित्य आत्मस्वरूपाचे आणि परमेश्‍वराचे (स्मर) स्मरण कर (कृतम्) केलेल्या कर्मांचे (स्मर) स्मरण कर. या अंत्येष्टि संस्काराच्या वेळी (वायुः) धनंजय आदीरूप वायू (अनिलम्) कारणरूप वायूला आणि तो कारणरूप वायू (अमृतम्) अविनाशी कारण (म्हणजे प्रकृती) याला जाऊन मिळतो (अथ) यानंतर (इदम्) हे (शरीरम्) सुख भोगण्याचे साधन हे नाशवान शरीर (भस्मान्तम्) अन्ततः भस्म हाणार आहे, हे तू ध्यानात असू दे. ॥15॥
Essence
भावार्थ - मृत्युसमयी जशी चित्तवृत्ती असते आणि शरीराहून वेगळे होते वेळी आत्म्याची जी पृथक्वृत्ती असते, तशी वृत्ती (स्मशानात उपस्थित जनांची) असावी (म्हणजे शांती, वैराग्य, ईशस्मरण आदी सर्वांनी करीत असावे.) मृतदेहाचा दहन विधी भस्म होईपर्यंत करावा. यानंतर शरीरावर करण्याचा कोणताही संस्कार शेष नाही (अंत्येष्टि-संस्कार हा मानवदेहाचा अंतिम संस्कार आहे.) अशाने की (अंत्येष्टि-संस्कारप्रसंगी केवळ ईश्‍वराज्ञेचे पालन करावे, त्याची उपासना करावी, शोक सहन करण्यासाठी आपले सामर्थ्य (मनोबल) वाढवावे. केलेले सत्कर्म निष्फळ होत नाहीत, हे लक्षात ठेऊन धर्माविषयी प्रीती आणि अधर्माविषयी अप्रीती भाव ठेवावा ॥15॥
Subject
देहांत होतेवेळी प्राण शरीर सोडून जाताना काय करावे, याविषयी -