Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 10

17 Mantra
40/10
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न्यदे॒वाहुः स॑म्भ॒वाद॒न्यदा॑हु॒रस॑म्भवात्।इति॑ शुश्रुम॒ धीरा॑णां॒ ये न॒स्तद्वि॑चचक्षि॒रे॥१०॥

अ॒न्यत्। ए॒व। आ॒हुः। स॒म्भ॒वादिति॑ सम्ऽभ॒वात्। अ॒न्यत्। आ॒हुः। अस॑म्भवा॒दित्यस॑म्ऽभवात् ॥ इति॑। शु॒श्रु॒म॒। धीरा॑णाम्। ये। नः॒। तत्। वि॒च॒च॒क्षि॒र इति॑ विऽचचक्षि॒रे ॥१० ॥

Mantra without Swara
अन्यदेवाहुः सम्भवादन्यदाहुर्शम्भवात् । इति शुश्रुम धीराणाँये नस्तद्विचचक्षिरे ॥

अन्यत्। एव। आहुः। सम्भवादिति सम्ऽभवात्। अन्यत्। आहुः। असम्भवादित्यसम्ऽभवात्॥ इति। शुश्रुम। धीराणाम्। ये। नः। तत्। विचचक्षिर इति विऽचचक्षिरे॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, आम्ही विद्वज्जनांनी (धीराणाम्) मेधावी योगी विद्वानांकडून वचन (शुश्रुम) ऐकले आहे (ये) त्या मेधावी योगी जनांनी (नः) आम्हाला (विचचक्षिरे) विशेषत्वाने व्याख्यान करून सांगितले आहे की ते (सम्भवात्) संयोगजन्य कार्यांचा (म्हणजे संयोग-संमिश्रणाने उत्पन्न होणारे सर्व पदार्थाचा (अन्यत्, एव) अन्य वेगळेच कार्य वा परिणाम (आहुः) असतो, असे ते योगीजन आम्हाला सांगतात (असम्भवात्) उत्पन्न न होणारे कारण (म्हणजे प्रकृती) (अन्यत्) कार्यापेक्षा वेगळे असते, असेही ते योगी आम्हास (आहुः) सांगतात. (इति) हे त्यांचे वचन हे मनुष्यानो, तुम्हीही आमच्याकडून ऐका आणि सत्य जाणून घ्या. ॥10॥
Essence
भावार्थ : हे मनुष्यानो, विद्वज्जन कार्य कारणरूप वस्तूपासून (प्रकृती, सत्त्वादी गुण आणि सर्व उत्पन्न पदार्थापासून) भिन्न-भिन्न लाभ प्राप्त करतात आणि इतरांनाही त्या लाभांची प्राप्ती करून देतात. आणि त्या कार्यकारणाचे गुण ते विद्वान (वैज्ञानिक) सर्वांना सांगतात तुम्ही देखील त्याच्याप्रमाणे अवश्य करा. ॥10॥
Subject
मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -