Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 40 / Mantra 1

17 Mantra
40/1
Devata- आत्मा देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ई॒शा वा॒स्यमि॒दंꣳ सर्वं॒ यत्किञ्च॒ जग॑त्यां॒ जग॑त्।तेन॑ त्य॒क्तेन॑ भुञ्जीथा॒ मा गृ॑धः॒ कस्य॑ स्वि॒द्धन॑म्॥१॥

ई॒शा। वा॒स्य᳖म्। इ॒दम्। स॒र्व॑म्। यत्। किम्। च॒। जग॑त्याम्। जग॑त् ॥ तेन॑। त्य॒क्तेन॑। भु॒ञ्जी॒थाः॒। मा। गृ॒धः॒। कस्य॑। स्वि॒त्। धन॑म् ॥१ ॥

Mantra without Swara
ईशा वास्यमिदँ सर्वँयत्किञ्च जगत्याञ्जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ॥

ईशा। वास्यम्। इदम्। सर्वम्। यत्। किम्। च। जगत्याम्। जगत्॥ तेन। त्यक्तेन। भुञ्जीथाः। मा। गृधः। कस्य। स्वित्। धनम्॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्या, (तू हे सदा ध्यानात असू दे की) (इदम्) प्रकृतीपासून पृथ्वीपर्यंत (यत्) हे जे (सर्वम्) सर्व (जगत्पाम्) गमनशील सृष्टीमधे (जगत्) जंगम वा चर प्राणिमात्र आहेत, तसेच जे स्थावर-अचेतन पदार्थ आहेत) ते (ईशा) समस्त ऐश्‍वर्यवान सर्वशक्तिमान परमेश्‍वराने (वास्यम्) आच्छादित आहे, तो या सर्वांना व्यापून आहे. (तेन) त्याने त्याग केलेल्या या सृष्टीचा, (भुञ्जीथा) पदार्थांचा हे मानवा, तू उपभोग घे, पण (कस्य, स्वित्) कुणाच्याही (धनम्) कोणत्याही पदार्थांची (मा) (गृधः) अभिलाषा कर नकोस ॥1॥
Essence
भावार्थ - जे मनुष्य कोणतेही कर्म करताना, परमेश्‍वर आम्हाला सदा निरंतर सर्वत्र पाहत आहे, असा विचार करून परमेश्‍वराची भीती बाळगतात, (ते धर्मात्मा होऊन इहलोकी परलोकी सुख वा मुक्तिसुख अनुभवतात) तसेच जे असाही विचार ठेवतात की हे जग ईश्‍वराद्वारे व्याप्त असून ईश्‍वर सर्वत्र विद्यमान आहे, अशाप्रकारे त्याला व्यापक, अंतर्यामी मानून जे लोक अन्याय-अत्याचाराने कुणाचेही काही द्रव्य हरण करीत नाही, ते धर्मात्मा होतात आणि इहलोकी व परलोकी सुख तसेच मोक्षसुख प्राप्त करून नेहमी आनंदमग्न असतात. ॥1॥
Subject
आता चाळीसाव्या अध्यायाचा आरंभ केला जात आहे, या मंत्रात सांगितले आहे की माणसाने ईश्‍वराला जाणून काय केले पाहिजे.