Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 9

37 Mantra
4/9
Devata- विद्वान् देवता Rishi- आङ्गिरस ऋषयः Chhand- आर्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ऋ॒क्सा॒मयोः॒ शिल्पे॑ स्थ॒स्ते वा॒मार॑भे॒ ते मा॑ पात॒मास्य य॒ज्ञस्यो॒दृचः॑। शर्मा॑सि॒ शर्म॑ मे यच्छ॒ नम॑स्तेऽअस्तु॒ मा मा॑ हिꣳसीः॥९॥

ऋक्सा॒मयो॒रित्यृ॑क्ऽसा॒मयोः॑। शि॒ल्पे॒ऽइति॒ शि॒ल्पे॑। स्थः॒। तेऽइति॒ ते। वा॒म्। आ। र॒भे॒। तेऽइति॒ ते। मा॒। पा॒त॒म्। आ। अ॒स्य। य॒ज्ञस्य॑। उ॒दृचः॒ इत्यु॒त्ऽऋचः॑। शर्म्म॑। अ॒सि॒। शर्म्म॑। मे॒। य॒च्छ॒। नमः॑। ते॒। अ॒स्तु॒। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒ ॥९॥

Mantra without Swara
ऋक्सामयोः शिल्पे स्थस्ते वामारभे ते मा पातमास्य यज्ञस्योदृचः । शर्मासि शर्म मे यच्छ नमस्ते अस्तु मा मा हिँसीः ॥

ऋक्सामयोरित्यृक्ऽसामयोः। शिल्पेऽइति शिल्पे। स्थः। तेऽइति ते। वाम्। आ। रभे। तेऽइति ते। मा। पातम्। आ। अस्य। यज्ञस्य। उदृचः इत्युत्ऽऋचः। शर्म्म। असि। शर्म्म। मे। यच्छ। नमः। ते। अस्तु। मा। मा। हिꣳसीः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान महाशय, आपण (ऋक्सामयोः) ऋग्वेद व सामवेदाचे अध्ययन केल्यानंतर (उद्दचः) त्या ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहार आणि कृतीचे (अस्य) या (यज्ञस्य) शिल्पविद्येद्वारे तसेच (यंत्र, तंत्र व कौशल्य आदी) यज्ञाद्वारे (वाम्) ज्या (शिल्पे) मन (कल्पना, वोजनादी) कला-कौशल्य मिळविले आहे. त्या ज्ञान क्रिया आदींचा (आभे) मी आरंभ करीत आहे. (आपणांकडून शिकत आहे) त्या काळात ते (मा) माझे (पातम्) रक्षण करणारे आहेत, ते योग्य त्या ठिकाणी उपस्थित (स्थः) राहोत (ज्यायोगे माझी शिल्पविद्या, कृती व कौशल्य निर्विघ्नपणे पार पडेल) मी शिल्पविद्येचे व कृतीचे ज्ञान विद्वानांच्या संगतीत राहून ग्रहण करीत आहे. हे विद्वान, (ते) आपल्याकरिता (मे) माझा (नमः) अन्नादीद्वारे सेवा सत्कार करून नमस्कार (अस्तु) असो. आपण (मा) मला या ज्ञानग्रहण कार्यात विचलित करू नका (कार्यात खंड वा विघ्न येऊ देऊ नका) (यत्) जे (शर्म) सुख (असि) (ज्यास सुख म्हणतात) ते (शर्म) सुख (मे) मला (देहि) द्या. ॥9॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी उचित आहे की त्यांनी विद्वज्जनांच्या संगतीत राहून वेदाध्ययन करून शिल्पविद्या त्याची कृती व कला-कौशल्य शिकून घ्यावे आणि त्याद्वारे विमान आदी यानांची निर्मिती करून सर्वप्रकारे सुखी व्हावे. (वेदात जे विज्ञान, तंत्रज्ञान व त्याचे प्रात्याक्षिक क्रिया- ज्ञान सांगितले आहे, त्याचे ज्ञान वैज्ञानिकांदी कडून मिळवून उन्नती साधावी) ॥9॥
Subject
मनुष्यांनी शिल्प विद्येची प्राप्ती कशी करावी, या विषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -