Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 8

37 Mantra
4/8
Devata- ईश्वरो देवता Rishi- आत्रेय ऋषिः Chhand- आर्षी अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तुर्मर्त्तो॑ वुरीत स॒ख्यम्। विश्वो॑ रा॒यऽइ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॒ स्वाहा॑॥८॥

विश्वः॑। दे॒वस्य॑। ने॒तुः। मर्त्तः॑। वु॒री॒त॒। स॒ख्यम्। विश्वः॑। रा॒ये। इ॒षु॒ध्य॒ति॒। द्यु॒म्नम्। वृ॒णी॒त॒। पु॒ष्यसे॑। स्वाहा॑ ॥८॥

Mantra without Swara
विश्वो देवस्य नेतुर्मर्ता वुरीत सख्यम् । विश्वो राय इषुध्यति द्युम्नँ वृणीत पुष्यसे स्वाहा ॥

विश्वः। देवस्य। नेतुः। मर्त्तः। वुरीत। सख्यम्। विश्वः। राये। इषुध्यति। द्युम्नम्। वृणीत। पुष्यसे। स्वाहा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -(विश्‍वः) सर्व (मर्तः) मनुष्यांनी (वेतुः) सर्वांना पुढे नेणार्‍या (देवस्य) सर्वांना प्रेरणा देणार्‍या परमेश्‍वरासह (सख्यम्) मैत्री करावी आणि त्याच्या उत्तम गुणकर्म समूहाचा (वुरीत) स्वीकार करावा व त्या ईश्‍वरसंगतीद्वारे (राय) धनसंपत्तीची प्राप्तीसाठी व (इषुध्यति) बाणादी शास्त्रांना धारण करून (द्युम्नम्) धनाची प्राप्ती केली पाहिजे त्याप्रमाणे हे माणसा, तू देखील या सर्वांची (ईश्‍वरोपासना, गुणधारण, यज्ञ, शस्त्र आदी संगतीत राहो (स्वाहा) सदाचार, सत्कर्म व सक्रिया करून तूही (पुष्यसे) पुष्ट हो ॥8॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमालंकार आहे. सर्व मनुष्यांनी परमेश्‍वराची उपासना करावी. परस्परात मैत्री ठेवावी आणि युद्धात दुष्ट शत्रूंवर विजय मिळवून राज्य लक्ष्मी प्राप्त करून सुखी राहावे ॥8॥
Subject
मनुष्यांनी परमेश्‍वराच्या आश्रयात राहून काय काय करावे, पुढील मंत्रात या विषयी उपदेश केला आहे -