Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 6

37 Mantra
4/6
Devata- यज्ञो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
स्वाहा॑ य॒ज्ञं मन॑सः॒ स्वाहो॑रोर॒न्तरि॑क्षा॒त् स्वाहा॒ द्यावा॑पृथि॒वीभ्या॒ स्वाहा॒ वाता॒दार॑भे॒ स्वाहा॑॥६॥

स्वाहा॑। य॒ज्ञम्। मन॑सः। स्वाहाः॑। उ॒रोः। अ॒न्तरि॑क्षात्। स्वाहा॑। द्यावा॑पृथि॒वीभ्या॑म्। स्वाहा॑। वाता॑त्। आ। र॒भे॒ स्वाहा॑ ॥६॥

Mantra without Swara
स्वाहा यज्ञम्मनसः स्वाहोरोरन्तरिक्षात्स्वाहा द्यावापृथिवीभ्याँस्वाहा वातादा रभे स्वाहा ॥

स्वाहा। यज्ञम्। मनसः। स्वाहाः। उरोः। अन्तरिक्षात्। स्वाहा। द्यावापृथिवीभ्याम्। स्वाहा। वातात्। आ। रभे स्वाहा॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (याज्ञिक म्हणत आहे) हे मनुष्यांनो, ज्या प्रमाणे मी (स्वाहा) वेदोक्त (स्वाहा) उत्तम उपदेशाद्वारे (स्वाहा) विद्यांचा प्रकाश करीत आहे, (स्वाहा) सर्व जीवांचे कल्याण करणारी करणार्‍या सत्य वाणीचे उच्चारण करीत (स्वाहा) उत्तम विधी आणि पद्धतीद्वारे (उरोः) अत्यधिक (अन्तरिक्षात्) आकाश आणि (वातात्) वायूची शुद्धी करतो, तसेच ज्याप्रमाणे मी (द्यावापृथिवीभ्याम) शुद्ध प्रकाश आणि भूमीवरील पदार्थांना (मनसः) विज्ञान संमत व शास्त्रोक्त विधीप्रमाणे क्रिया करीत (यज्ञम्) यज्ञ पूर्ण करण्यासाठी पुरूषार्थ (आरभे) करीत आहे व करतो, त्याप्रमाणे तुम्ही लोक देखील करीत जा ॥6॥
Essence
भावार्थ - वेदोक्त रीतीने केला जाणारा तसेच मन, वचन आणि कर्माने संपन्न होणारा यज्ञ आकाशस्थ वायु आदी पदार्थांची शुद्धी करून सर्वांना सुखी करतो ॥6॥
Subject
कोणत्या प्रयोजनासाठी यज्ञ करावा, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित केला आहे -