Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 5

37 Mantra
4/5
Devata- यज्ञो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् आर्षी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ वो॑ देवासऽईमहे वा॒मं प्र॑य॒त्यध्व॒रे। आ वो॑ देवासऽआ॒शिषो॑ य॒ज्ञिया॑सो हवामहे॥५॥

आ। वः॒। दे॒वा॒सः॒। ई॒म॒हे॒। वा॒मम्। प्र॒य॒तीति॑ प्रऽय॒ति। अ॒ध्व॒रे। आ। वः॒। दे॒वा॒सः॒। आ॒शिष॒ इत्या॒ऽशिषः॑। य॒ज्ञिया॑सः। ह॒वा॒म॒हे॒ ॥५॥

Mantra without Swara
आ वो देवास ईमहे वामम्प्रयत्यध्वरे । आ वो देवास आशिषो यज्ञियासो हवामहे ॥

आ। वः। देवासः। ईमहे। वामम्। प्रयतीति प्रऽयति। अध्वरे। आ। वः। देवासः। आशिष इत्याऽशिषः। यज्ञियासः। हवामहे॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (देवासः) विद्यादीगुणांनी दिप्तीमान असलेल्या विद्वान जनहो, आम्ही (वः) तुम्हाला (प्रयति) सुखदायक व (अध्वरे) हिंसा करण्यास सर्वथा अयोग्य अशा यज्ञाच्या अनुष्ठानासाठी (वः) तुमची व (वामम्) तुमच्या प्रशंसनीय गुणसमूहाची (एमहे) मनापासून याचना करतो (हिंसा विरहित सुखमय यज्ञ करण्यासाठी तुम्हांसारख्या गुणवान याज्ञिक जनांचे आवाहन करतो), तसेच हे (देवासः) विद्वज्जनहो तुम्हां मंडळीकडून (यज्ञिमाः) यज्ञाद्वारे प्राप्त होणार्‍या (आशिषः) इच्छा (आहवामहे) पूर्ण करून घेण्यात आम्ही समर्थ होऊ शकू, अशी शक्ती आम्हांस द्या-आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला प्रार्थना करीत आहोत, त्याप्रमाणे प्रार्थित कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हीही यत्न करा. ॥5॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे करणीय उचित आचरण आहे की त्यानी उत्तम विद्वांनांच्या संगतीत राहून उत्तमोत्तम विदयांचे संपादन करावे आणि आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करून घ्याव्या याकरिता विद्वज्जनांची संगत आणि सेवा सदा करावी ॥5॥
Subject
मनुष्यांनी कशाप्रकारे व कोणते पुरूषार्थ केले पाहिजेत, पुढील मंत्रात हे विशद केले आहे -