Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 37

37 Mantra
4/37
Devata- यज्ञो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- निचृत् आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
या ते॒ धामा॑नि ह॒विषा॒ यज॑न्ति॒ ता ते॒ विश्वा॑ परि॒भूर॑स्तु य॒ज्ञम्। ग॒य॒स्फानः॑ प्र॒तर॑णः सु॒वीरोऽवी॑रहा॒ प्रच॑रा सोम॒ दुर्या॑न्॥३७॥

या। ते॒। धामा॑नि। ह॒विषा॑। यज॑न्ति। ता। ते॒। विश्वा॑। प॒रि॒भूरिति॑ परि॒ऽभूः। अ॒स्तु॒। य॒ज्ञम्। ग॒य॒स्फान॒ इति॑ गय॒ऽस्फानः॑। प्र॒तर॑ण॒ इति॑ प्र॒ऽतर॑णः। सु॒वीर॒ इति॑ सु॒ऽवीरः॑। अवी॑र॒हेत्यवी॑रऽहा। प्र। च॒र॒। सो॒म॒। दुर्य्या॑न् ॥३७॥

Mantra without Swara
या ते धामानि हविषा यजन्ति ता ते विश्वा परिभूरस्तु यज्ञम् । गयस्पानः प्रतरणः सुवीरो वीरहा प्रचरा सोम दुर्यान् ॥

या। ते। धामानि। हविषा। यजन्ति। ता। ते। विश्वा। परिभूरिति परिऽभूः। अस्तु। यज्ञम्। गयस्फान इति गयऽस्फानः। प्रतरण इति प्रऽतरणः। सुवीर इति सुऽवीरः। अवीरहेत्यवीरऽहा। प्र। चर। सोम। दुर्य्यान्॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, विद्वजन (ते) तुमच्या सत्कार-पूजनसाठी (या) ज्या (धामानि) यज्ञस्थानाला हवी देण्यास योग्य अशा द्रव्याद्वारे (यजन्ति) सत्कारपूर्वक स्वीकार करतात (जेथे आदरभावे यज्ञ करतात) त्याप्रमाणे आम्ही देखील (ता) त्या (विश्‍वा) सर्व द्रव्यांना एकत्रित करावे व यज्ञ करावा. हा यज्ञ (ते) आपण विद्वज्जनांसाठी सन्तान, धन आणि ग्रहांची वृद्धी करणारा आहे. (प्रतरणः) दुखसागरापासून तारणारा व (सुवीरः) उत्तम वीरांची प्राप्ती करून देरारा आहे (अवीरहा) कायर आणि दरिद्र अशा अवीर मनुष्यांना म्हणजे पुरूषार्थशून्य माणसांना व शत्रूंना मारणारा आहे आणि (परिभूः) सर्व प्रकारे सुखकारी आहे, हे विद्वजन, आपल्या कृपेने आपल्याप्रमाणे आमच्यासाठी ही तो यज्ञ तसाच फलदायी (अस्तु) होवो. तसेच विद्वान ज्या यज्ञाचे (यजन्ति) अनुष्ठान करतात, त्या यज्ञाचे अनुष्ठान आम्ही लोकांनी देखील करावा याशिवाय (सोम) सोमविद्येचे संपादन करणारे आम्ही विद्वानजन यज्ञ करून घरामधे आनंदित आहोत यज्ञाचे ज्ञान घेत आहोत व त्यासाठी कर्म-यत्नादी करीत आहोत, त्याप्रमाणे (यज्ञविषयी श्रद्धा बाळगणार्‍या हे माणसा) तू देखील यज्ञ करून आपल्या (दुर्य्यान्) घरांत (प्रचर)) सुखाचा प्रसार कर, यज्ञाचे महत्त्व जाणून घे व यज्ञ करीत जा ॥37॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष आणि वाचक लुप्तोपमा हे दोन काव्यालंकार आहेत. ज्याप्रमाणे विद्वजन ईवराविषयी श्रद्धा-प्रेम बाळगतात व यज्ञानुष्ठान करतात, त्याप्रमाणे सर्व अनुष्यांनी केले पाहिजे. हेच उचित कर्म आहे ॥37॥
Subject
पुनश्‍च, ईश्‍वर आणि सुर्य यांविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -
Footnote
या चवथ्या अध्यायात खालील विषयांचे प्रतिपादन केले आहे. शिल्पविद्या, वृष्टीची पवित्रताकरणे, विद्वज्जनांची संगती, यज्ञाचे अनुष्ठान, उत्साह उत्पन्न होणे, शिल्पविद्येची प्रशंसा, यज्ञाच्या गुणांचे वर्णन, सत्यव्रत-धारण, अग्नी आणि जलाच्या गुणांचे वर्णन, पुनर्जन्म विषयी कथन, ईश्‍वराची प्रार्थना, यज्ञानुष्ठान, माता-पिता आणि पुत्रांदींची परस्परात प्रीती, यज्ञाची व्याख्या, दिव्य बुद्धीची प्राप्ती, परमेश्‍वराची अर्चना, सूर्याच्या गुणांचे वर्णन, पदार्थांच्या क्रय-विक्रमाविषयी प्रतिपादन, मैत्री करणे, धर्ममार्गाचा प्रचार, परमेश्‍वराच्या व सूर्याच्या गुणांचे विवेचन, चोर आदींपासून संरक्षण, ईश्‍वर व सूर्य आदींचे गुणवर्णन आणि यज्ञाचे फळ वा त्यापासून लाभ. या चवथ्या अध्यायाची संगती भागील तिसर्‍या अध्यायाशी लावणे आवश्यक आहे. ऊबट आणि महीधर आदींनी या अध्यायाच्या मंत्रांचा शब्दार्थ देखील अगदी विरूद्ध (व असत्य) केला आहे. ॥37॥^॥यजुर्वेद भाष्यातील चतुर्थ अध्याय समाप्त॥