Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 36

37 Mantra
4/36
Devata- सूर्य्यो देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- विराट् ब्राह्मी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
वरु॑णस्यो॒त्तम्भ॑नमसि॒ वरु॑णस्य स्कम्भ॒सर्ज॑नी स्थो॒ वरु॑णस्यऽऋत॒सद॑न्यसि॒ वरु॑णस्यऽ ऋत॒सद॑नमसि॒ वरु॑णस्यऽऋत॒सद॑न॒मासी॑द॥३६॥

वरु॑णस्य। उ॒त्तम्भ॑नम्। अ॒सि॒। वरु॑णस्य। स्क॒म्भ॒सर्ज॑नी॒ऽइति॑ स्कम्भ॒ऽसर्जनी॑। स्थः॒। वरु॑णस्य। ऋ॒त॒सद॒नीत्यृ॑तऽसद॑नी। अ॒सि॒। वरु॑णस्य। ऋ॒त॒सद॑न॒मित्यृ॑त॒ऽसद॑नम्। अ॒सि॒। वरु॑णस्य। ऋ॒त॒सद॑न॒मित्यृ॑त॒ऽसद॑नम्। आ। सी॒द॒ ॥३६॥

Mantra without Swara
वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्कम्भसर्जनी स्थो वरुणस्य ऋतसदन्यसि वरुणस्य ऋतसदनमसि वरुणस्य ऋतसदनमा सीद ॥

वरुणस्य। उत्तम्भनम्। असि। वरुणस्य। स्कम्भसर्जनीऽइति स्कम्भऽसर्जनी। स्थः। वरुणस्य। ऋतसदनीत्यृतऽसदनी। असि। वरुणस्य। ऋतसदनमित्यृतऽसदनम्। असि। वरुणस्य। ऋतसदनमित्यृतऽसदनम्। आ। सीद॥३६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - या मंत्राचे दोन अर्थ - ईश्‍वरपरक व सूर्यपरक हे जगदीश्‍वर, आपण (वरूणस्व या उत्तम जगाचे (उत्तम्भमम्) चांगल्याप्रकारे प्रतिबंध, नियंत्रण व संचालन करणारे (असि) आहात. (वरूणस्य) वायूमधे असलेल्या (स्कम्भसर्जनी) आधार रूप पदार्थाची उत्पत्ती करणारी जी शक्ती आहे तसेच (वरूणस्य) सूर्यामधे असलेली (ऋतसदनी) जलाचे गमनागमन करणारी जी क्रिया, (स्यः) आहेत त्यांना आपणच धारण करीत आहात (आपणच वायु व सुर्यास ते सामर्थ्य दिले आहे) आपणच (वरूणस्य) उत्तम (ऋतसदनम्) पदार्थाच्या स्थितीचे आधार (असि) आहात. (वरूणस्य) उत्तम (ऋतसदनम्) पदार्थांच्या यथार्थतेचे म्हणजे गुण व प्रभावाचे ज्ञान आम्हांस (आसीद) प्राप्त करवितात. यामुळे आम्ही आपल्या आश्रयास येत आहोत वा आश्रयाखाली राहत आहोत. ॥1॥ जो सूर्य (वरूणस्य) जगाला (उत्तम्भनम्) धारण करणारा (असि) आहे, जो (वरूणस्य) वायूची (स्कम्भसर्जनी) पदार्थांचा आधार उत्पन्न करणारी शक्ती आहे व सूर्य (वरूणस्य) सूर्याच्या (ऋतसदनी) जलाचे गमन आगमन करणारी क्रिया (स्वः) आहे, त्यांना धारण करणारा सूर्य आहे, (वरूणस्य) उत्तम अशा (ऋतसदनम्) सत्य पदार्थांचा जे स्थान वा आधार (असि) आहे, तोच (वरूणस्य) उत्तम (ऋतसदनम्) पदार्थांना स्थान म्हणजे गुण व शक्ती (आसीद) देतो आणि त्या पदार्थात शक्तीचे धारण करतो (सूर्य पदार्थांना गुण देतो व त्या गुरांना स्थिर ठेवतो, सूर्यामुळे पदार्थाचे गुण नष्ट होत नाहीत) अशा महान् उपकारक सूर्याच्या शक्तीचा आपण उपयोग का बरे करू नये? ॥36॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषअलंकार आहे (वरूणस्य, उत्तम्भनम्), या शब्दात श्‍लेष आहे) परमेश्‍वरा व्यतिरिक्त कोणीही असा नाही की जो जगाची रचना, धारण आणि पालन करण्यास समर्थ आहे. त्याचप्रमाणे भूमी आदीवर व जगाला प्रकाश देणारा आणि धारण करणारा सूर्याशिवाय इतर कोणीही समर्थ नाही. यामुळे सर्व मनुष्यांनी ईश्‍वराची उपासना करावी व सुर्यापासून लाभ घ्यावेत ॥36॥
Subject
पुनश्‍च, त्या दोन्हीविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -