Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 35

37 Mantra
4/35
Devata- सूर्य्यो देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- निचृत् आर्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
नमो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ चक्ष॑से म॒हो दे॒वाय॒ तदृ॒तꣳ स॑पर्यत। दू॒रे॒दृशे॑ दे॒वजा॑ताय के॒तवे॑ दि॒वस्पु॒त्राय॒ सूर्या॑य शꣳसत॥३५॥

नमः॑। मि॒त्रस्य॑। वरु॑णस्य। चक्ष॑से। म॒हः। दे॒वाय॑। तत्। ऋ॒तम्। स॒प॒र्य्य॒त॒। दू॒रे॒दृश॒ इति॑ दूरे॒ऽदृशे॑। दे॒वजा॑ता॒येति॑ दे॒वऽजा॑ताय। के॒तवे॑। दि॒वः। पु॒त्राय॑। सूर्य्या॑य। श॒ꣳस॒त॒ ॥३५॥

Mantra without Swara
नमो मित्रस्य वरुणस्य चक्षसे महो देवाय तदृतँ सपर्यत । दूरेदृशे देवजाताय केतवे दिवस्पुत्राय सूर्याय शँसत ॥

नमः। मित्रस्य। वरुणस्य। चक्षसे। महः। देवाय। तत्। ऋतम्। सपर्य्यत। दूरेदृश इति दूरेऽदृशे। देवजातायेति देवऽजाताय। केतवे। दिवः। पुत्राय। सूर्य्याय। शꣳसत॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
या मंत्राचे दोन अर्थ आहे 1. ईश्‍वरपरक 2. सूर्यपरक हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही उपासकगण (यत्) ज्या (मित्रस्य) सर्वांचा सखा असलेल्या (वरूणस्य) श्रेष्ठत्व धारण करणार्‍या (दिवः) प्रकाशस्वरूप परमेश्‍वराच्या (ऋतम्) सत्य स्वरूपाचे (तत्) ध्यान म्हणजे त्याची उपासना करतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील सदा त्याचे ध्यान (सपर्य्यत) करीत जा. तसेच ज्याप्रमाणे त्या (महः) महान् (दूरद्दशे) दूरवरील पदार्थांना दाखविणार्‍या (सृष्टीच्या गूढ रहस्यांची उकल सांगणार्‍या (चक्षसे) सर्वांना पाहणार्‍या (देवजाताय) दिव्यगुणयुक्त (केतवे) विज्ञानरूप (देवाय) दिव्यगुणयुक्त (पुत्राय) पवित्र करणार्‍या (सूर्य्याय) चराचरव्यापी परमात्म्याला (नमः) नमस्कार करतो, तसे तुम्ही देखील (प्रशंसत) त्याची स्तुती करीत जा ॥35॥^हे मनुष्यांनो, (मित्रस्य) प्रकाशमय (वरूणस्य) श्रेष्ठ (दिवः) प्रकाशस्वरूप सूर्यलोकाचे जे (ऋतम्) यर्थाथरूप आहे, (तत्) त्या प्रकाशस्वरूप सूर्याला तुम्ही देखील आमच्याप्रमाणे विद्या-ज्ञानाआदीने (सपर्य्यत) जवळ करा, त्याचे सेवन करा. आम्ही विद्वज्जन (चक्षसे) सर्वांना पाहण्यासाठी (देवजाताय) दिव्यगुणवान (केतमे) पदार्थांचे ज्ञान करून देणार्‍या (सूर्यप्रकाशामुळे पदार्थ दिसतात) अग्नीच्या (पुत्राचे) (दूरेहशे) दूरवर स्थित पदार्थांना पाहण्याकरिता (महः) महाव् (देवाय) दिव्यगुणधारी (सूर्याय) सूर्याचे सेवन करतो, (च्या पासून लाभ घेण्यासाठी यत्न करतो) त्याप्रमाणे तुम्ही देखील आमच्याप्रमाणे सूर्यसेवनाकडे प्रवृत्त व्हा. ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेष आणि वाचकलुप्तोपमा हे दोन काव्यालंकार आहेत (मित्रस्य, दिवः, केतने आदी शब्दात श्‍लेषालंकार आहे म्हणजे प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ आहेत तसेच विद्वान हा उपमान पक्ष व मनुष्यगण हा उपमेयपक्ष आहे, पण मंत्रात ‘यथा, तथा’ आदी उपमावाचक शब्द लुप्त आहेत) ज्या परमेश्‍वराच्या कृपेने चोर, चोरटे, डाकू आदी माणसांना लुटणारे दुष्ट लोक चौरकर्मापासून निवृत्त होतात आणि ज्या सूर्याच्या प्रकाशामुळे चोर चोरटे चौरकर्म करण्यास घाबरतात, मनुष्यांनी त्या परमेश्‍वराची व सूर्याची स्तुती केली पाहिजे व त्याचे गुण प्रकट व प्रसिद्ध केले पाहिजेत. कारण की परमेश्‍वरासमान वा सूर्यासमान समर्थ कोणी नाही ॥35॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वर आणि सूर्य, यांचे स्वरूप विशद केले आहे -