Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 31

37 Mantra
4/31
Devata- वरुणो देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- विराट् आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
वने॑षु॒ व्यन्तरि॑क्षं ततान॒ वाज॒मर्व॑त्सु॒ पय॑ऽउ॒स्रिया॑सु। हृ॒त्सु क्रतुं॒ वरु॑णो वि॒क्ष्वग्निं दि॒वि सूर्य॑मदधा॒त् सोम॒मद्रौ॑॥३१॥

वने॑षु। वि। अ॒न्तरि॑क्षम्। त॒ता॒न॒। वाज॑म्। अर्व॒त्स्वित्यर्व॑त्ऽसु। पयः॑। उ॒स्रिया॑सु। हृ॒त्स्विति॑ हृ॒त्ऽसु। क्रतु॑म्। वरु॑णः। वि॒क्षु। अ॒ग्निम्। दि॒वि। सूर्य्य॑म्। अ॒द॒धा॒त्। सोम॑म्। अद्रौ॑ ॥३१॥

Mantra without Swara
वनेषु व्यन्तरिक्षन्ततान वाजमर्वत्सु पय उस्रियासु हृत्सु क्रतुँ वरुणो विक्ष्वग्निन्दिवि सूर्यमदधात्सोममद्रौ ॥

वनेषु। वि। अन्तरिक्षम्। ततान। वाजम्। अर्वत्स्वित्यर्वत्ऽसु। पयः। उस्रियासु। हृत्स्विति हृत्ऽसु। क्रतुम्। वरुणः। विक्षु। अग्निम्। दिवि। सूर्य्यम्। अदधात्। सोमम्। अद्रौ॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वरूणः) परमेश्‍वर सूर्य आणि प्राणवायु अत्युत्तम आहेत, ते (वनषु) आपल्या किरणांनी वा अरण्याद्वारे (अन्तरिक्षम्) आकाशाचा (विततान) विस्तार करतात (सूर्य आपल्या किरणांनी व वायु वनांद्वारे आकाशात, वातावरणात प्राणांचा संचार करतात) ईश्‍वर, सूर्य आणि वायु (अर्वत्सु) अतिशय वेगादी गुणांनी युक्त अशा विद्युत आदी पदार्थामधे आणि घोडे आदी पशूंमधे (वाजम्) वेग गुण निर्माण करतात. ते दोन्ही (उस्रियासु) गौ-गायीमधे (पयः) दूध (हृत्सु) हृदयामधे (क्रतुम्) प्रज्ञाबुद्धी आणि कर्माची प्रेरणा (विक्षु) प्रजा वा संततीमधे (अग्निम्) अग्नी म्हणजे तेज व उत्साह (दिवी) प्रकाशामधे (सूर्य) आदित्य आणि (अद्रो) पर्वतामधे अथवा मेघामधे (सोमम्) सोमवल्ली आदी औषधी वा उपकारक श्रेष्ठ रस (अदधात्) धारण करतात, (परमेश्‍वराच्या कृपेमुळे व सूर्य आणि वायूच्या गुणांमुळे वरील पदार्थामधे वरील उक्त गुण येतात) त्याच परमेश्‍वराची उपासना करावी आणि सूर्य व वायू या दोन्ही पदार्थापासून योग्य तो लाभ घ्यावा ॥311
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. परमेश्‍वराने आपल्या विद्येचा प्रकाश करून व जगाची रचना करून सर्व पदार्थांमधे त्या त्या पदार्थाचे स्वभावगत विशिष्ट गुण स्थापित केले आहेत आणि ज्ञान-विज्ञानाचे गुण निश्‍चित करून पवन, सुर्य आदींच्या गुणांचा विस्तार केला आहे, त्याचप्रामाणे सूर्य आणि वायु देखील सर्वांसाठी सुखाचा विस्तार करतात. ॥31॥
Subject
पुनश्‍च, ते (ईश्‍वर, सूर्य आणि वायु) कसे आहेत, याविषयी पुढील मंत्रात पुन्हा कथन केले आहे -