Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 30

37 Mantra
4/30
Devata- वरुणो देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- स्वराट् याजुषी त्रिष्टुप्,आर्षी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
अदि॑त्या॒स्त्वग॒स्यदि॑त्यै॒ सद॒ऽआसी॑द। अस्त॑भ्ना॒द् द्यां वृ॑ष॒भोऽअ॒न्तरि॑क्ष॒ममि॑मीत वरि॒माण॑म्पृथि॒व्याः। आसी॑द॒द्विश्वा॒ भुव॑नानि स॒म्राड् विश्वेत्तानि॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑॥३०॥

अदि॑त्याः। त्वक्। अ॒सि॒। अदि॑त्यै। सदः॑। आ। सी॒द॒। अस्त॑भ्नात्। द्याम्। वृ॒ष॒भः। अ॒न्तरिक्ष॑म्। अमि॑मीत। व॒रि॒माण॑म्। पृ॒थि॒व्याः। आ। अ॒सी॒द॒त्। विश्वा॑। भुव॑नानि। स॒म्राडिति॑ स॒म्ऽराट्। विश्वा॑। इत्। तानि॑। वरु॑णस्य। व्र॒तानि॑ ॥३०॥

Mantra without Swara
अदित्यास्त्वगसि अदित्यै सद आ सीद । अस्तभ्नाद्द्याँ वृषभो अन्तरिक्षममिमीत वरिमाणम्पृथिव्याः । आसीदद्विश्वा भुवनानि सम्राड्विश्वेत्तानि वरुणस्य व्रतानि ॥

अदित्याः। त्वक्। असि। अदित्यै। सदः। आ। सीद। अस्तभ्नात्। द्याम्। वृषभः। अन्तरिक्षम्। अमिमीत। वरिमाणम्। पृथिव्याः। आ। असीदत्। विश्वा। भुवनानि। सम्राडिति सम्ऽराट्। विश्वा। इत्। तानि। वरुणस्य। व्रतानि॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर, आपण (आदित्याः) पृथ्वीला (त्वक) शरिरास त्वचेप्रमाणे आच्छादन करणारे आहांत (पृथ्वीला जागृत करून) (असि) आहात. (वृषभः) श्रेष्ठगुणयुक्त आहात. आपणच (अदित्यै) पृथ्वी आदी सृष्टीस (सदः) स्थापन करणारे (आसीद) सृष्टीला व्यवस्था व नियमात चालविणारे आहात. (याम्) सूर्याला आपणच (अस्तभ्नात्) धारण केले आहे (वरिमाणम्) अत्यंत उत्तम अशा (अन्तरिक्षम्) अंतरीक्षाची (अमिमीत) रचना करणारे व (सम्राट) अत्यंत प्रकाशमय व सर्वांचे अधिपती आहात. आपणच (पृथिन्याः अंतरिक्षामधे (विश्‍वा) सर्व (भुवनानि) लोकांच्या गृह-तार्‍यांची (आसीदत्) स्थापना करणारे आहात (ते) (विश्‍वाः) सर्व सृष्टीरचनादी कार्य (वरूशस्य) आपल्या सारख्या श्रेष्ठाचे रूप आहेत (ते) आपले (इत) निशिचत (व्रतानि) सत्य स्वभाव आणि कर्म आहेत, असे आम्ही (अपद्महि) जाणतो व मानतो (सृष्टीचा रचविता, सूर्य, अंतरिक्ष, पृथ्वी आदी निर्माता व धारक ईश्‍वरच आहे, हा आमचा दृढ विश्‍वास आहे) ॥30॥^(वृषभः) श्रेष्ठ व (सम्राट) स्वतः प्रकाशमान असे जे सूर्य आणि वायु आहेत, ते (आदित्याः) पृथ्वी आदी नां (त्वक्) त्वचेप्रमाणे आच्छादित करणारे (असि) आहेत. तसेच (अदित्यै) पृथ्वी सहित सर्व (सदः) लोकांना योग्य स्थानी (आसीद) स्थापन करणारे व (धाम्) प्रकाश देणारे (बरिमाणम्) श्रेष्ठ (अन्तरिक्षम्) आकाशाची (अमिमीत) मोजमाप करून (पृथिन्याः) आकाशामधे (विश्‍वा) सर्व (भुवनानि) लोकलोकांतराना (आसीदत्) स्थापित करतात (म्हणजे स्थान वय कक्षेत ठेवतात) (तानि) ते (सर्व नियम, भ्रमण, कक्ष आदी) (ते) त्या (वरूरस्य) सूर्य आणि वायूचे (इत्) च निश्‍चयाने (व्रतामि) स्वभाव आणि कर्म आहेत, असे आम्ही लोक (अपद्महि) जाणतो (असा आमचा विश्‍वास आहे ॥2॥ ॥30॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. तसेच या मंत्रात या पूर्वीच्या मंत्रापासून (अपद्महि) या शब्दाची अनुवृत्ती केली आहे, असे जाणावे. ज्याप्रमाणे परमेश्‍वराचा स्वभाव आहे की सर्वत्र व्याप्त असून तो सूर्य आणि वायु आदींची रचना करतो व त्यांना धारण करतो, त्याच प्रमाणे सूर्य आणि वायु यांचाही स्वभाव असा आहे की ते लोक लोकांतराना प्रकाश देतात व त्यांना धारण करतात (स्वस्थितीत नियमित करतात) ॥30॥
Subject
पुढील मंत्रात ईश्‍वर, सूर्य आणि वायू यांच्या गुणांविषयी सांगितले आहे -