Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 28

37 Mantra
4/28
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- साम्नी बृहती,साम्नी उष्णिक्, Swara- मध्यमः
Mantra with Swara
परि॑ माग्ने॒ दुश्च॑रिताद् बाध॒स्वा मा॒ सुच॑रिते भज। उदायु॑षा स्वा॒युषोद॑स्थाम॒मृताँ॒२ऽअनु॑॥२८॥

परि॑। मा॒। अ॒ग्ने॒। दुश्च॑रिता॒दिति॒ दुःऽच॑रितात्। बा॒ध॒स्व॒। आ। मा॒। सुच॑रित॒ इति॒ सुऽच॑रिते। भ॒ज॒। उत्। आयु॑षा। स्वा॒युषेति॑ सुऽआ॒युषा॑। उत्। अ॒स्था॒म्। अ॒मृता॑न्। अनु॑ ॥२८॥

Mantra without Swara
परि माग्ने दुश्चरिताद्बाधस्वा मा सुचरिते भज । उदायुषा स्वायुषोदस्थाममृताँ अनु ॥

परि। मा। अग्ने। दुश्चरितादिति दुःऽचरितात्। बाधस्व। आ। मा। सुचरित इति सुऽचरिते। भज। उत्। आयुषा। स्वायुषेति सुऽआयुषा। उत्। अस्थाम्। अमृतान्। अनु॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) परमेश्‍वरा ज्या व जशा कर्मामुळे मी (स्वायुषा) उत्तम आणि प्राणवान् (आयुषा) जीवनास प्राप्त करू शकेन व त्याद्वारे (अमृतान्) जीवन्मुक्त विद्वानांच्या संगती वा मोक्षरूप आनंदास (उदस्थान्) प्राप्त करू शकेन, कृपा करून मला त्या तशा उत्तम कर्माकडे ने (मला उत्तम कर्म करण्याची प्रेरणा दे) (मा) मला तशा श्रेष्ठकर्माकडे नेऊन (दुश्‍चरितात्) दुष्टाचारापासून (उदबाधस्व) दूर ठेव. (मा) मला (सुचरिते) उत्तमोत्तम धर्माचरणयुक्त व्यवहार कर्माकडे (अनुभज) प्रवृत्त कर ॥28॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हे उचित कर्म आहे की त्यांनी अधर्माचा त्याग आणि धर्माचे ग्रहण करण्यासाठी सत्य मनाने परमेश्‍वराची प्रार्थना करावी, कारण की प्रार्थित तो परमेश्‍वर उपासकांना लवकरच अधर्मापासून दूर करून धर्माकडे प्रवृत्त करतो. सर्वासाठी हे आवश्यक आहे की जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत धर्माचरण करीत राहावे आणि संसारात मिळणार्‍या व नंतर मोक्षवस्थेत मिळणार्‍या सुखाचे सर्वप्रकारे सेवन करावे ॥28॥
Subject
सर्व मनुष्यांसाठी उचित आहे की सर्व करणीय उत्तम कर्मांच्या शुभारंभी, मध्यावस्थेत आणि कार्यपूर्तीच्या वेळी नेहमी परमेश्‍वराची प्रार्थना करावी, पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे -