Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 27

37 Mantra
4/27
Devata- विद्वान् देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- भूरिक् ब्राह्मी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
मि॒त्रो न॒ऽएहि॒ सुमि॑त्रध॒ऽइन्द्र॑स्यो॒रुमावि॑श॒ दक्षि॑णमु॒शन्नु॒शन्त॑ꣳ स्यो॒नः स्यो॒नम्। स्वान॒ भ्राजाङ्घा॑रे॒ बम्भा॑रे॒ हस्त॒ सुह॑स्त॒ कृशा॑नवे॒ते वः॑ सोम॒क्रय॑णा॒स्तान् र॑क्षध्वं॒ मा वो॑ दभन्॥२७॥

मि॒त्रः। नः॒। आ। इ॒हि॒। सुमि॑त्रध॒ इति॒ सुऽमि॑त्रधः। इन्द्र॑स्य। उ॒रुम्। आ। वि॒श॒। दक्षि॑णम्। उ॒शन्। उ॒शन्त॑म्। स्यो॒नः। स्यो॒नम्। स्वान॑। भ्राज॑। अङ्घा॑रे। बम्भा॑रे। हस्त॑। सुह॒स्तेति॒ सुऽहस्त॑। कृशा॑नो॒ऽइति॒ कृशानो। ए॒ते। वः॒। सो॒म॒क्रय॑णा॒ इति॑ सोम॒ऽक्रय॑णाः। तान्। र॒क्ष॒ध्व॒म्। मा। वः॒। द॒भ॒न् ॥२७॥

Mantra without Swara
मित्रो न एहि सुमित्रधः इन्द्रस्योरुमा विश दक्षिणमुशन्नुशन्तँ स्योनः स्योनम् । स्वान भ्राजाङ्घारे बम्भारे हस्त सुहस्त कृशानोवेते वः सोमक्रयणास्तान्रक्षध्वम्मा वो दभन् ॥

मित्रः। नः। आ। इहि। सुमित्रध इति सुऽमित्रधः। इन्द्रस्य। उरुम्। आ। विश। दक्षिणम्। उशन्। उशन्तम्। स्योनः। स्योनम्। स्वान। भ्राज। अङ्घारे। बम्भारे। हस्त। सुहस्तेति सुऽहस्त। कृशानोऽइति कृशानो। एते। वः। सोमक्रयणा इति सोमऽक्रयणाः। तान्। रक्षध्वम्। मा। वः। दभन्॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे सभाध्यक्ष, (राष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी), आपण (स्वाहा) उपदेश देणारे, व मार्गदर्शक आहात,(भ्राज) कीर्तीने प्रकाशित आहात, (अंधारे) छळ-छळाचे वैरी आहात, (निष्कपट आहात) (बम्भारे) तुमच्या विचार व निर्णयांचा विरोध करणार्‍यांचे शत्रु आहात. आपण (हस्त) सदैव प्रसन्नवदन व (सुहस्त) हस्त क्रिया, शिल्पादी विद्यांचे ज्ञाता आहात (कृशानो) दुष्ट-दुर्जनांना क्षीण करणारे व (सुमित्रधः) मित्रांशी उत्तम संबंध ठेवणारे आहात (मित्रः) सर्वांचे मित्र आहात, (स्योनः) सुखाची (उशन्) कामना करणारे आहात. आपण (नः) आम्हां प्रजाजनांसाठी (एहि) हितकारक व्हा (चांगलेपणाने वर्तन करणारे रहा) तसेच आमच्याकरिता (दक्षिणम्) उत्तम व अनुकूल राहून (उरूम्) बहुत उत्तम पदार्थानी युक्त व स्वीकार करण्यास योग्य अशा (उशंतम्) कामनीय (स्योनम्) सुखाची प्राप्ती करून देणारे म्हणून आमच्याजवळ (आविश) या. हे सभाध्यक्षगण, (राष्ट्राचे, राज्याचे प्रमुख अधिकारी गण) (इद्रस्थ) परम ऐश्‍वर्ययुक्त श्रीमंत प्रजाजन आणि कर्मचारी सेवकादी वर्ग (वः) तुमचे रक्षण करणारे होवोत आणि आपणही त्या लोकांचे सदा रक्षण करा. तुमचे शत्रु (तान्) त्या तुमच्या कर्मचारी सेवकगणाची (वः) तसेच हिंसा करण्यात यशस्वी (मादभन्) होऊ नयेत (यासाठी तुम्ही सतत जागरूक राहा) नपेक्षा ते तुमच्याशी सुयोग्यरीतीने व प्रेमाने व्यवहार करणारे होवोत. अशा प्रकारे तुम्ही अधिकारीगण व कर्मचारीगण एकमेकाशी योग्यरीतीने व प्रेमळ वागणूक ठेवणारे राहोत. (अशी आम्हा प्रजाजनांची कामना आहे) ॥27॥
Essence
भावार्थ - राज्याचे अधिकारी आणि प्रजाजन यांच्यासाठी उचित आहे की त्या दोघांनी एकमेकाशी प्रेमळ, उपकारक आणि धर्मयुक्त आचरण ठेवावे. अशा रीतीने शत्रूंचे निवारण करून अविद्या आणि अन्यायरूप अंधकाराचा विनाश करीत चक्रवर्ती राज्याची स्थापना व संचालन करावे व सर्वदा आनंदात असावे. ॥27॥
Subject
मनुष्यांचे विद्वान मनुष्याबरोबर आणि विद्वानाचे सर्व मनुष्यांबरोर कशा प्रकारचे आचरण असावे, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -