Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 25

37 Mantra
4/25
Devata- सविता देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- भूरिक् शक्वरी,भूरिक् गायत्री, Swara- निषादः, षड्जः
Mantra with Swara
अ॒भि त्यं दे॒वꣳ स॑वि॒तार॑मो॒ण्योः क॒विक्र॑तु॒मर्चा॑मि स॒त्यस॑वꣳ रत्न॒धाम॒भि प्रि॒यं म॒तिं क॒विम्। ऊ॒र्ध्वा यस्या॒मति॒र्भाऽअदि॑द्यु॒त॒त् सवी॑मनि॒ हिर॑ण्यपाणिरमिमीत सु॒क्रतुः॑ कृ॒पा स्वः॑। प्र॒जाभ्य॑स्त्वा प्र॒जास्त्वा॑ऽनु॒प्राण॑न्तु प्र॒जास्त्वम॑नु॒प्राणि॑हि॥२५॥

अ॒भि। त्यम्। दे॒वम्। स॒वि॒ता॑रम्। ओण्योः᳖। क॒विक्र॑तु॒मिति॑ क॒विऽक्र॑तु॒म्। अर्चा॑मि। स॒त्यस॑व॒मिति॑ स॒त्यऽस॑वम्। र॒त्न॒ऽधामिति॑ रत्न॒धाम्। अ॒भि। प्रि॒यम्। म॒तिम्। क॒विम्। ऊ॒र्ध्वा। यस्य॑। अ॒मतिः॑। भाः। अदि॑द्यु॒तत्। सवी॑मनि। हिर॑ण्यपाणि॒रिति॒ हिर॑ण्यऽपाणिः। अ॒मि॒मी॒त॒। सु॒क्रतु॒रिति॑ सु॒ऽक्रतुः॑। कृ॒पा। स्व॒रिति॒ स्वः॑। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒ऽजाभ्यः॑। त्वा॒। प्र॒जा इति॑ प्र॒ऽजाः। त्वा॒। अ॒नु॒प्राण॒न्त्वित्य॑नु॒ऽप्राण॑न्तु॒। प्र॒जा इति॑ प्र॒ऽजाः। त्वम्। अ॒नु॒ऽप्राणि॒हीत्य॑नु॒ऽप्राणि॑हि ॥२५॥

Mantra without Swara
अभि त्यं देवँ सवितारमोण्योः कविक्रतुमर्चामि सत्यसवँ रत्नधामभि प्रियम्मतिङ्कविम् । ऊर्ध्वा यस्यामतिर्भा अदिद्युतत्सवीमनि हिरण्यपाणिरमिमीत सुक्रतुः कृपा स्वः । प्रजाभ्यस्त्वा । प्रजास्त्वानुप्राणन्तु प्रजास्त्वमनुप्राणिहि ॥

अभि। त्यम्। देवम्। सवितारम्। ओण्योः। कविक्रतुमिति कविऽक्रतुम्। अर्चामि। सत्यसवमिति सत्यऽसवम्। रत्नऽधामिति रत्नधाम्। अभि। प्रियम्। मतिम्। कविम्। ऊर्ध्वा। यस्य। अमतिः। भाः। अदिद्युतत्। सवीमनि। हिरण्यपाणिरिति हिरण्यऽपाणिः। अमिमीत। सुक्रतुरिति सुऽक्रतुः। कृपा। स्वरिति स्वः। प्रजाभ्य इति प्रऽजाभ्यः। त्वा। प्रजा इति प्रऽजाः। त्वा। अनुप्राणन्त्वित्यनुऽप्राणन्तु। प्रजा इति प्रऽजाः। त्वम्। अनुऽप्राणिहीत्यनुऽप्राणिहि॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -(यस्य) मी सच्चिदान्द गुणयुक्त परमेश्‍वराची स्तुती व उपासना करतो तसेच धार्मिक सभापतीचे व त्यांच्या प्रजाजनांचे पूजन म्हणजे सत्कार करतो, (सवीमनि) या संसारात त्यांचे (उर्द्वा) उत्तम (अमतिः) स्वरूप म्हणजे उत्तम यश(भाः) प्रकाशमान (आदिद्युतत्) होऊन चमकत आहे. त्यांची (कृपा) करूणा (स्वः) सुखदायक असते (हिरण्यापाणिः) परमेश्‍वराने सूर्य आदी ज्योतिर्मय पदार्थाना उत्पन्न केले आहे, सभापतीने सांसारिक व्यवहारामधे उत्तम गुणकर्मांचे पालन व रक्षण केले आहे तसेच प्रजाजनांनी उत्तम गुणांना धारण केलेले आहे (सुक्रतुः) ईश्‍वर, सभापती आणि प्रजानन सर्व उत्तम प्रज्ञा धारण करणारे व उत्तम कर्म करणारे आहेत, (स्वः) परमेश्‍वराने सूर्याची उत्पत्ती व सभापतीनी सुखाची (अमिष्टिमीत) निर्मिती वा व्यवस्था केली आहे. (त्यम्) त्या परमेश्‍वराने (ओण्योः) द्युलोक आणि पृथ्वी लोकांना तसेच (सवितारम्) असी आदी पदार्थांना उत्पन्न व संप्रयुक्त केले आहे (कविक्रतुम्) तो सर्वंज्ञ व क्रांतदर्शी आहे (रत्नाघाम्) रमणीय मननीय ज्ञानरूप रत्नांचा दाता आहे (सत्यसवभ्) सत्य आहे व सर्व ऐश्‍वर्यानी मुक्त आहे. (प्रियम्) प्रितीकारक (मतिम्) वेदादी शास्त्रांचा प्रदाता व विद्वानांसाठी माननीय (कविम्) वेद विद्येचा उपदेश करणार्‍या (देवम्) अशा सुखदायक परमेश्‍वराची मी (अर्चामि) पूजा वा अर्चना करता (सभापती व प्रजाजन देखील मना प्रिय, माननीय व सुख दायक आहेत, मी त्यांचेही पूजन वा सत्कार करतो, कारण ते सत्कारास पात्र आहेत) हे परमेश्‍वरा (त्वा) तुला (प्रजाभ्य) तू उत्पन्न केलेल्या सृष्टीद्वारे म्हणजे सृष्टिनिर्माता म्हणून मी तुझी व तुझ्या सृष्टीची पूजा म्हणजे सत्कार करतो. तुझ्या या सृष्टीमधे (पुजाः) मनुष्यांनी (अनुप्राणन्तु) पूर्ण आमचा उपयोग घ्यावा. तू कृपा करून (प्रजाः) आपल्या या जीवांवर अनुकूल होऊन (अनुप्राणिहि) त्यांना अनुग्रहीत कर. ॥25॥।
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. यात म्हटले आहे की सर्व मनुष्यांनी जगदुत्पादक, निराकार, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सच्चिदानंद लक्षणयुक्त परमेश्‍वराची स्तुती व उपासना करावी. तसेच धार्मिक सभापती व धर्मनिष्ठ प्रजाजनांचाच सत्कार करावा. या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही नको. विद्वज्जनांसाठी हेच उचित कर्त्तव्य आहे की त्यांनी प्रजाजनांना सुख प्राप्ती करिता परमेश्‍वराचीच स्तुती व उपासना करण्याचा उपदेश करावा आणि श्रेष्ठ सभापती आणि धार्मिक प्रजाजनांचाच सत्कार-आदर करावा की ज्यामुळे सर्व मनुष्य त्यांच्या आज्ञेप्रमाणे आचरण करतील. ज्याप्रमाणे सर्व जीवांना आपला प्राण प्रिय आहे, परमेश्‍वराविषयी देखील त्यांचा मनात तेवढेच प्रेम असावयास हवे ॥25॥
Subject
पुढच्या मंत्रात ईश्‍वर, राजसभा व प्रजेच्या गुणांविषयी कथन केले आहे -