Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 2

37 Mantra
4/2
Devata- आपो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् ब्राह्मी त्रिष्टुप्, Swara- धैवतः
Mantra with Swara
आपो॑ऽअ॒स्मान् मा॒तरः॑ शुन्धयन्तु घृ॒तेन॑ नो घृत॒प्वः पुनन्तु। विश्व॒ꣳ हि रि॒प्रं प्र॒वह॑न्ति दे॒वीरुदिदा॑भ्यः॒ शुचि॒रा पू॒तऽए॑मि। दी॒क्षा॒त॒पसो॑स्त॒नूर॑सि॒ तां त्वा॑ शि॒वा श॒ग्मां परि॑दधे भ॒द्रं वर्णं॒ पुष्य॑न्॥२॥

आपः॑। अ॒स्मान्। मा॒तरः॑। शु॒न्ध॒य॒न्तु॒। घृ॒तेन॑। नः॒। घृ॒त॒प्व᳖ इति॑ घृतऽप्वः॒। पु॒न॒न्तु॒। विश्व॑म्। हि। रि॒प्रम्। प्र॒वह॒न्तीति॑ प्र॒ऽवह॑न्ति। दे॒वीः। उत्। इत्। आ॒भ्यः॒। शुचिः॑। आ। पू॒तः। ए॒मि॒। दी॒क्षा॒त॒पसोः॑। त॒नूः। अ॒सि॒। ताम्। त्वा॒। शि॒वाम्। श॒ग्माम्। परि॑। द॒धे॒। भ॒द्रम्। वर्ण॑म्। पुष्य॑न् ॥२॥

Mantra without Swara
आपो अस्मान्मातरः शुन्धयन्तु घृतेन नो घृतप्वः पुनन्तु । विश्वँ हि रिप्रं प्रवहन्ति देवीरुदिदाभ्यः शुचिरा पूत एमि । दीक्षातपसोस्तनूरसि तन्त्वा शिवाँ शग्माम्परि दधे भद्रँवर्णम्पुष्यन् ॥

आपः। अस्मान्। मातरः। शुन्धयन्तु। घृतेन। नः। घृतप्व इति घृतऽप्वः। पुनन्तु। विश्वम्। हि। रिप्रम्। प्रवहन्तीति प्रऽवहन्ति। देवीः। उत्। इत्। आभ्यः। शुचिः। आ। पूतः। एमि। दीक्षातपसोः। तनूः। असि। ताम्। त्वा। शिवाम्। शग्माम्। परि। दधे। भद्रम्। वर्णम्। पुष्यन्॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो जसे (भद्रं) सर्वांना अत्यंत सुंदर (वर्णम्) रूप वेणारे (पुष्यम्) पुष्ट करणारे (घृतप्वः) गृताला पवित्र करणारे (देवीः) दिव्यगुणमुक्त आणि (मातरः) मातेसमान पालन करणारेहे (आपः) जल आहे (रिप्रम्) वारीच्या उच्चारासाठी अथवा न त्याच्या (जलाच्या) गुणांचे ज्ञान देण्यासाठी (विश्‍वम्) सर्वांसाठी (प्रवहन्ति) ते जल वाहत आहे. या जलाने विद्वजन (अस्मान्) आम्हांला (शुन्थपन्तु) आणि बाह्यदेशाला पवित्र करोत. तसेच (गृतेन) गृताने पुष्ट होणारे जे जल आहे. ते (नः) आम्हांला (पुनन्तु) पवित्र करो (यज्ञाग्नीत आहुत घृत वृष्टी देणारे आणि जलाला शुद्ध करणारे असते) (उत्) चांगल्या रीतीने (इत्) या (आभ्यः) जलाद्वारे (शुचिः) पवित्र आणि (आपूतः) शुद्ध होऊन (दीक्षातपसोः) ब्रह्मचर्य आदी उत्तमोत्तम व्रतांचे पालन करण्यासाठी व धर्मानुष्ठानासाठी हा जो (तनूः) शरीर (असि) आहे, त्या (शिवाम्) कल्याणकारी (शग्माम्) सुखरूप शरीराला मी (एमि) प्राप्त करतो आणि (परिदधे) याचा निट सांभाळ करतो, त्याप्रमाणे तुम्ही लोक देखील त्या हितकारी जलाला व (ताम्) त्या (त्वाम्) अत्युत्तम शरीराला धारण करा (जलाव्दारे शरिराची शुद्धी करून शरीर स्वस्थ व उत्तम ठेवा) ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. (म्हणजे उपमा अलंकाराचा वाचक शब्द जे जसे ते तसे लुप्त आहे, पण उपमा अलंकार मात्र आहे) मनुष्यांनी हे जाणावे की जल हे सर्व सुखदायक आहे, प्राणधारण करण्यास आवश्यक आहे आणि मातेप्रमाणे सर्वांचे पालन करणारे आहे. अशा या महोपकारी जलाने पवित्र होऊन, जलाच्या गुणांचा शोध करून मनुष्यांनी त्याचा नित्य वापर करावा. जलामुळे शरिराचा वर्ण (रंगरूप) सुंदर होतो, रोगरहित होतो. यामुळे सर्वांनी निरंतर प्रयत्न करीत धर्माच्या पालनासह पुरूषार्थ करीत जलापासून आनंद उपभोगला पाहिजे. ॥2॥
Subject
त्या जलापासून कोणते लाभ घ्यावेत, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -