Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 18

37 Mantra
4/18
Devata- वाग्विद्युतौ देवते Rishi- वत्स ऋषिः Chhand- स्वराट् आर्षी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
तस्या॑स्ते स॒त्यस॑वसः प्रस॒वे त॒न्वो य॒न्त्रम॑शीय॒ स्वाहा॑। शु॒क्रम॑सि च॒न्द्रम॑स्य॒मृत॑मसि वैश्वदे॒वम॑सि॥१८॥

तस्याः॑। ते॒। स॒त्यस॑वस॒ इति॑ स॒त्यऽस॑वसः। प्र॒स॒व इति॑ प्रऽस॒वे। त॒न्वः᳖। य॒न्त्रम्। अ॒शी॒य॒। स्वाहा॑। शु॒क्रम्। अ॒सि॒। च॒न्द्रम्। अ॒सि॒। अ॒मृत॑म्। अ॒सि॒। वै॒श्व॒दे॒वमिति॑ वैश्वऽदे॒वम्। अ॒सि॒ ॥१८॥

Mantra without Swara
तस्यास्ते सत्यसवसः प्रसवे तन्वो यन्त्रमशीय स्वाहा । शुक्रमसि चन्द्रमस्यमृतमसि वैश्वदेवमसि ॥

तस्याः। ते। सत्यसवस इति सत्यऽसवसः। प्रसव इति प्रऽसवे। तन्वः। यन्त्रम्। अशीय। स्वाहा। शुक्रम्। असि। चन्द्रम्। असि। अमृतम्। असि। वैश्वदेवमिति वैश्वऽदेवम्। असि॥१८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जगदीश्‍वर (सत्यसवसः) आपण सत्य व ऐश्‍वर्ययुक्त आहात. जगाचे निमित्त कारण आहात (ते) आपण (प्रसवे) उत्पन्न केलेल्या या संसारात आपल्या कृपेमुळे ज्या (स्वाहा) वाणी आणि विद्युत या दोन वस्तू आहेत (जगाच्या कल्याणासाठी आपण या वस्तू दिल्या आहेत) (तस्याः) मी विद्या, कौशल्यादीद्वारे त्यांचे ज्ञान मिळवून त्या दोन्हीचे जे (शुक्रम्) शुद्ध तेज व (चन्द्रम्) आल्हाद कारी प्रभाव आहे, वाणी आणि विद्युतापासून (अमृतम्) अमृतकारी कार्य व परमार्थ सिद्ध करणारे (असि) जे व्यवहार आहेत, (वैश्‍वदेवम्) तसेच जे सर्व देवांना म्हणजे विद्वानांना सुख देणारे, (ईस) आहे, अशा (त्) त्या (यंत्रम्) संकोचन, विकाशन (प्रसारण), चालन व बंधन या क्रिया करण्यास समर्थ यंत्राला मी (अशीष) प्राप्त करावे (विद्युतापासून उत्पादनसाठी आवश्यक कशा कलायंत्राचा (मशिनीचा) आविष्करण व विकास करून मी लाभ प्राप्त करावेत) ॥18॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे मनुष्यांसाठी हे उचित आहे मी ईश्‍वर निर्मित या सृष्टीमधे त्यानी विद्या विज्ञान द्वारे कलायंत्रांचे (मशीन) निर्माण करून अग्नी आदी पदार्थापासून उपयोगी वस्तू काढाव्यात व सर्वसुखांची प्राप्ती करावी ॥18॥
Subject
वाणी आणि विद्युत यांचे स्वरूप कसे आहे, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -