Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 16

37 Mantra
4/16
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्स ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी पङ्क्ति, Swara- पञ्चमः
Mantra with Swara
त्वम॑ग्ने व्रत॒पाऽअ॑सि दे॒वऽआ मर्त्ये॒ष्वा। त्वं य॒ज्ञेष्वीड्यः॑। रास्वेय॑त्सो॒मा भूयो॑ भर दे॒वो नः॑ सवि॒ता वसो॑र्दा॒ता वस्व॑दात्॥१६॥

त्वम्। अ॒ग्ने॒। व्र॒त॒पा॒ इति॑ व्रत॒ऽपाः। अ॒सि॒। दे॒वः। आ। मर्त्त्ये॑षु। आ। त्वम्। य॒ज्ञेषु॑। ईड्यः॑। रास्व॑। इय॑त्। सो॒म। आ। भूयः॑। भ॒र॒। दे॒वः। नः॒। स॒वि॒ता। वसोः॑। दा॒ता। वसु॑। अ॒दा॒त् ॥१६॥

Mantra without Swara
त्वमग्ने व्रतपा असि देव आ मर्त्येष्वा । त्वँयज्ञेष्वीड्यः । रास्वेयत्सोमा भूयो भर देवो नः सविता वसोर्दाता वस्वदात् ॥

त्वम्। अग्ने। व्रतपा इति व्रतऽपाः। असि। देवः। आ। मर्त्त्येषु। आ। त्वम्। यज्ञेषु। ईड्यः। रास्व। इयत्। सोम। आ। भूयः। भर। देवः। नः। सविता। वसोः। दाता। वसु। अदात्॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या मंत्राचे दोन अर्थ आहेत) पहिला अर्थ ईश्‍वरासंबंधी-हे (सोम) ईश्‍वर्यदाता (अग्ने) परमेश्‍वरा, (त्वम्) तू (मर्त्येषु) मनुष्यांमधे (व्रतपाः) धर्माचरणाची व सत्याची प्रेरणा देतोस. (सविता) तूच सर्व जगाचा उत्पत्तिकर्ता आहेस (यज्ञेषु( आदरणीय व उपासना कार्यात तूच (ईड्यः) स्तवनीय आहेत. तूच (नः) आम्हाला (वसोः) धनसंपदेचा (दाता) दाता आहेस. तूच (वसु) प्रत्यक्ष ऐश्‍वर्या (अदात्) दान करणारा आहेस. हे परमेश्‍वरा, (हयत्) इतके जे तू दिले वा देत आहेस, तेव्हां (भूयः) पुढेही वारंवार अत्यंत धनाचे (आरास्व) दान देऊन आम्हांस (आभर) सर्व सुखांनी परिपूर्ण कर. ॥1॥^दुसरा अर्थ - (अग्ने) जो अग्नी (मर्त्येषु) मरणधर्मा मनुष्यांच्या व्यवहारात कामाला येतो (व्रतपाः) जो नियम वा निश्‍चयांचे पालन करण्यात सहाय्यभूत (देवः) प्रकाश देणारा (यज्ञेषु) अग्निहोत्रादी यज्ञामधे (ईड्यः) प्रयुज्य होणारा आहे. (सोम) ऐश्‍वर्य देणारा (सविता) प्रेरणा देणारा आणि (देवः) प्रकाशमान अग्नी आहे, तो (नः) आम्हांला (वसोः) धनसंपदेचे (दाता) दान करणारा (इथत्) होत (भूयः) पुनः पुनः वारंवार वा दररोज (वसु) अधिकाधिक धन (अदात्) देतो, (आरास्त) तो धन प्राप्तीचे मु्ख्य कारण असून (आभार) आमच्यासाठी सर्व सुखसोयींची व्यवस्था करतो. (अग्नीमुळेच मनुष्यांचे दैनंदिन व्यवहार होतात प्रकाश, उर्जा, विद्युत यांद्वारे धन प्राप्त होते) ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. मनुष्यांसाठी हेच उचित आहे की त्यांनी सत्यस्वरूप, सर्व जगदुत्पादक व सकलसुखदाता जगदीश्‍वराची उपासना करून सुखी व्हावे. त्याचप्रमाणे लौकिक कार्य-व्यवहारादीसाठी अग्नीचा उपयोग करून सर्व सुख प्राप्त करावेत. ॥16॥
Subject
अग्नी आणि परमेश्‍वर कसे आहेत, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -