Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 13

37 Mantra
4/13
Devata- आपो देवता Rishi- आङ्गिरस ऋषयः Chhand- भूरिक् आर्षी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
इ॒यं ते॑ य॒ज्ञिया॑ त॒नूर॒पो मु॑ञ्चामि॒ न प्र॒जाम्। अ॒ꣳहो॒मुचः॒ स्वाहा॑कृताः पृथि॒वीमावि॑शत पृथि॒व्या सम्भ॑व॥१३॥

इ॒यम्। ते॒। य॒ज्ञिया॑। त॒नूः। अ॒पः। मु॒ञ्चा॒मि॒। न। प्र॒जामिति॑ प्र॒ऽजाम्। अ॒ꣳहो॒मुच॒ इत्य॑ꣳह॒ऽमुचः॑। स्वाहा॑कृता॒ इति॒ स्वाहा॑ऽकृताः। पृ॒थि॒वीम्। आ। वि॒श॒त॒। पृ॒थि॒व्या। सम्। भ॒व॒ ॥१३॥

Mantra without Swara
इयन्ते यज्ञिया तनूरपो मुञ्चामि न प्रजाम् । अँहोमुचः स्वाहाकृताः पृथिवीमाविशत । पृथिव्या सम्भव ॥

इयम्। ते। यज्ञिया। तनूः। अपः। मुञ्चामि। न। प्रजामिति प्रऽजाम्। अꣳहोमुच इत्यꣳहऽमुचः। स्वाहाकृता इति स्वाहाऽकृताः। पृथिवीम्। आ। विशत। पृथिव्या। सम्। भव॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ- हे विद्वान महाशय (ते) तुमचे जो (इयम्) हे (यज्ञिया) यज्ञ करण्यास समर्थ व योग्य असे स्वस्थ (तनू) शरीर आहे त्याचे (अपः) हे जल (प्रजाम्) तुमचे व सन्तानांचे रक्षण करते, अथवा त्या जलापासून बलवान झालेला प्राण त्यांचे रक्षण करतो. अशा उपकारक देहाला तुम्ही कधी सोडत नाही तुम्ही जल सेवनाद्वारे दीर्घ जीवनाची कामना करता) त्याचप्रमाणे मी पूर्ण आयुष्य भोगल्याशिवाय या शरीराला त्याग करणार नाही. (हा माझा निर्धार आहे) (विद्वान म्हणतात) पृथिन्या) हे मनुष्या हो या भूमीपासून वैभव व ऐश्‍वर्य प्राप्त करीत मी (अ ्ँ होमुचः) दुःखाचा नाश करणार्‍या आणि (स्वाहाकृताः) वाणीने शुद्ध केलेला (अपः) जलाना आणि (पृथिवीम्) भूमीला (आविशत) उत्तम विज्ञानाद्वारे जाणून घेत आहे आणि मी त्या जल व भूमीपासून ऐश्‍वर्य प्राप्त करीत आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील (सम्भव) करा (जल आणि भूमी यांपासून मिळणार्‍या लाभांचे ज्ञान प्राप्त करा आणि त्यांपासून लाभान्वित व्हा) ॥13॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी विद्याद्वारे पदार्थांचे संमिश्रण, विभेदन करीत त्यापासून रोगनाशक वस्तूंचा शोध लावावा आणि शरीर व आत्म्याचे रक्षण करून सदा सुखी राहावे.
Subject
ते पूर्वोक्त जल कसे आहे, यावविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -