Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 12

37 Mantra
4/12
Devata- आपो देवताः Rishi- आङ्गिरस ऋषयः Chhand- भूरिक् ब्राह्मी अनुष्टुप्, Swara- गान्धारः
Mantra with Swara
श्वा॒त्राः पी॒ता भ॑वत यू॒यमा॑पोऽअ॒स्माक॑म॒न्तरु॒दरे॑ सु॒शेवाः॑। ताऽअ॒स्मभ्य॑मय॒क्ष्माऽअ॑नमी॒वाऽअना॑गसः॒ स्व॑दन्तु दे॒वीर॒मृता॑ऽऋता॒वृधः॑॥१२॥

श्वा॒त्राः पी॒ताः। भ॒व॒त॒। यू॒यम्। आ॒पः॒। अ॒स्माक॑म्। अ॒न्तः। उ॒दरे। सु॒शेवा॒ इति॑ सु॒ऽशे॑वाः। ताः। अ॒स्मभ्य॑म्। अ॒य॒क्ष्माः। अ॒न॒मी॒वाः। अना॑गसः। स्वद॑न्तु। दे॒वीः। अ॒मृताः॑। ऋ॒ता॒वृधः॑। ऋ॒त॒वृध॒ इत्यृ॑त॒ऽवृधः॑ ॥१२॥

Mantra without Swara
श्वात्राः पीता भवत यूयमापो अस्माकमन्तरुदरे सुशेवाः । ता अस्मभ्यमयक्ष्मा अनमीवा अनागसः स्वदन्तु देवीरमृता ऋतावृधः ॥

श्वात्राः पीताः। भवत। यूयम्। आपः। अस्माकम्। अन्तः। उदरे। सुशेवा इति सुऽशेवाः। ताः। अस्मभ्यम्। अयक्ष्माः। अनमीवाः। अनागसः। स्वदन्तु। देवीः। अमृताः। ऋतावृधः। ऋतवृध इत्यृतऽवृधः॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वज्जन म्हणतात) हे मनुष्यांनो, (अस्माकम्) सेवन केल्यानंतर आमच्या (अन्तः) शरीरामधे व (उदरे) पोटामधे जे जल (अस्मभ्यम्) आमच्यासाठी सर्वांसाठी (सुशेवाः) श्रेष्ठ सुख देणारे आहे, (अनमीघः) ज्वरादी रोग रहित (असून अयक्ष्माः) क्षय आदी रोग दोषांपासून दूर ठेवणारे आहे (अनागसः) पाप आदी दोषांपासून अस्पृश्य ठेवणारे आहे (ऋतावधः) सत्याची वृद्धी करणारे आहे (अमृतः) नाशरहित अमृतरसाने युक्त आहे (देवी) असे दिव्यगुणयुक्त जे जल आहे किंवा जी प्राणशक्ती आहे, (ताः) आमच्याप्रमाणे त्या जलाचे तुम्ही लोक ही उत्तम प्रकारे सेवन करा. या अशा सुखकारक रोग दोष आणि पाप यांपासून दूर ठेवणार्‍या दिव्यगुण प्रदाता जलाचे सेवन करून (यूयम्) तुम्ही सर्वजण सुखांचा उपभोग घेणारे (भयत) व्हा. ॥12॥
Essence
भावार्थ- मनुष्यांनी विद्वानांच्या सहवासात राहून त्यांच्या पासून उत्तम ज्ञान व विद्या कलाकौशल्यादी शिकाव्यात चांगल्या प्रकारे शुद्ध केलेल्या शरीर आत्म्याची शक्ती वाढविणार्‍या आणि रोगांचा नाश करणार्‍या अशा जल आदी पदार्थांचे सर्वांनी सेवन केले पाहिजे. कारण असे की विद्या आणि आरोग्य यांशिवाय कोणीही माणूस निरंतर कर्म करण्यात समर्थ होऊ शकत नाही यामुळे या दोन्ही कर्माने (विद्याप्राप्ती व आरोग्यरक्षण) सर्वदा अनुष्ठान केले पाहिजे. ॥12॥
Subject
अशा प्रकारच्या यज्ञाचे अनुष्ठान करून मनुष्यांनी काय काय केले पाहिजे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे-