Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 11

37 Mantra
4/11
Devata- अग्निर्देवता Rishi- आङ्गिरस ऋषयः Chhand- स्वराट् ब्राह्मी अनुष्टुप्,आर्षी उष्णिक् Swara- गान्धारः, ऋषभः
Mantra with Swara
व्र॒तं कृ॑णुता॒ग्निर्ब्रह्मा॒ग्निर्य॒ज्ञो वन॒स्पति॑र्य॒ज्ञियः॑। दैवीं॒ धियं॑ मनामहे सुमृडी॒काम॒भिष्ट॑ये वर्चो॒धां य॒ज्ञवा॑हसꣳ सुती॒र्था नो॑ऽअस॒द्वशे॑। ये दे॒वा मनो॑जाता मनो॒युजो॒ दक्ष॑क्रतव॒स्ते नो॒ऽवन्तु॒ ते नः॑ पान्तु॒ तेभ्यः॒ स्वाहा॑॥११॥

व्रतम्। कृ॒णु॒त॒। अ॒ग्निः। ब्रह्म॑। अ॒ग्निः। य॒ज्ञः। वन॒स्पतिः॑। य॒ज्ञियः॑। दैवी॑म्। धिय॑म्। म॒ना॒म॒हे॒। सु॒मृ॒डी॒कामिति॑ सुऽमृडी॒काम्। अ॒भिष्ट॑ये। व॒र्चो॒धामिति॑ वर्चः॒ऽधाम्। य॒ज्ञवा॑हस॒मिति॑ य॒ज्ञऽवा॑हसम्। सु॒ती॒र्थेति॑ सु॒ऽती॒र्था। नः॒। अ॒स॒त्। वशे॑। ये। दे॒वाः। मनो॑जाता॒ इति॒ मनः॑ऽजाताः। म॒नो॒यु॒ज॒ इति॑ मनः॒ऽयुजः॑। दक्ष॑ऽक्रतव॒ इति॒ दक्ष॑ऽक्रतवः। ते। नः॒। अ॒व॒न्तु॒। ते। नः॒। पा॒न्तु॒। तेभ्यः॑। स्वाहा॑ ॥११॥

Mantra without Swara
व्रतङ्कृणुत व्रतङ्कृणुताग्निर्ब्रह्माग्निर्यज्ञो वनस्पतिर्यज्ञियः दैवीन्धियम्मनामहे सुमृडीकामभिष्टये वर्चाधाँ यज्ञवाहसँ सुतीर्था नो असद्वशे । ये देवा मनोजाता मनोयुजो दक्षक्रतवस्ते नो वन्तु ते नः पान्तु तेभः स्वाहा ॥

व्रतम्। कृणुत। अग्निः। ब्रह्म। अग्निः। यज्ञः। वनस्पतिः। यज्ञियः। दैवीम्। धियम्। मनामहे। सुमृडीकामिति सुऽमृडीकाम्। अभिष्टये। वर्चोधामिति वर्चःऽधाम्। यज्ञवाहसमिति यज्ञऽवाहसम्। सुतीर्थेति सुऽतीर्था। नः। असत्। वशे। ये। देवाः। मनोजाता इति मनःऽजाताः। मनोयुज इति मनःऽयुजः। दक्षऽक्रतव इति दक्षऽक्रतवः। ते। नः। अवन्तु। ते। नः। पान्तु। तेभ्यः। स्वाहा॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ब्रह्म) जो ब्रह्म (अग्निः) शब्दाने प्रसिद्ध (असत) आहे (अग्नी शब्द सच्चिदानंद लक्षणयुक्त ‘ब्रह्म’ म्हणजे परमेश्‍वराचा वाचक आहे) आणि (यज्ञः) ज्याची संज्ञा यज्ञ म्हणजे ज्याचे एक नाम यज्ञ आहे तोच (वनस्पतिः) वनांचे पालन करणारा (अग्निः) अग्नी आहे (अग्नी शब्दाने परमेश्‍वर व आग असे दोन अर्थ अभिप्रेत आहेत) यामुळे आम्ही परमेश्‍वराची उपासना करू व अग्नीपासून विविध लाभ प्राप्त करू. उपासना आणि अग्नीचा कुशल उपयोग (अमिष्ट्ये) आपल्या इष्टसिद्धीकरिता (सुतीर्था) दुःखापासून तारणारे वेदाध्ययन आदी तीर्थ आहेत, त्या (सुमृडीकम्) उत्तम सुख देणार्‍या (वर्चोधाम्) विद्या व प्रकाश देणार्‍या (परमेश्‍वर विद्या देणारा व अग्नी प्रकाश देणारा) (दैवीम्) दिव्यगुणाने संपन्न अशा (धिमम्) परमेश्‍वरापासून बुद्धीला आणि अग्नीपासून प्रात्यक्षिक कृती व त्याचे विविध प्रयोग यांचे ज्ञान (मनामहे) मिळवू. (मे) जे (दक्षक्रतवः) शारीरिक कौशल्य, बळ आणि आत्मिक शक्तीने युक्त आहेत (मनोजाताः) जे विज्ञानाद्वारे ज्ञातव्य तथ्यांना जाणणारे आहेत आणि जे (मनोयुजः) सत् च असत (यथार्थ व कल्पित यातील भेद ओळखणारे आहेत, असे (देवाः) विद्वान जन (वशे) ज्या प्रकारच्या तेजोमय कर्मात प्रवृत्त असतात तसेच ज्यांच्याकडून (स्वाहा) विद्यायुक्त वाणी प्राप्त होऊ शकते (तेभ्यः) अशा त्या विद्वान (वैज्ञानिकादी) कडून दिव्यगुणयुक्त प्रज्ञेची (ममामहे) याचना करीत आहोत (विद्वज्जनांनी आम्हांस ज्ञान, विज्ञान व त्याची कृती यांचे शिक्षण-प्रशिक्षण द्यावे) (ते) त्या विद्वानांनी (नः) आमचे (अवन्तु) रक्षण करावे, आम्हांस विद्या, व उत्तम क्रिया (विज्ञानाचे सिद्धांन्त त्याची क्रिया, प्रयोग आदी) शिकवाव्यात आणि अशारितीने (नः) आमचे (पान्तु) रक्षण करावे. ॥11॥
Essence
भावार्थ - ज्याची संज्ञा म्हणजे दुसरे एक नांव ‘अग्नी’ आहे, त्या ब्रह्माला मनुष्यांनी जाणले पाहिजे न त्याची उपपासना करून उत्तम ज्ञान मिळविले पाहिजे. ज्या प्रकारच्या प्रज्ञा-बुद्धीने विद्वज्जन यज्ञ संपन्न करतात, त्या यज्ञाद्वारे मनुष्यांनी शिल्पविद्या व त्यापासून उपकारक क्रिया-प्रक्रियांचे ज्ञान प्राप्त करावे आणि विद्वज्जनांच्या सहवासात राहून, त्यांच्याकडून विद्या-ज्ञानादी प्राप्त करून स्वतः स्वतंत्र व्यवहार करण्यास शिकावे. कारण असे की ज्ञानाशिवाय कोणीही मनुष्य सुखाची वृद्धी करू शकत नाही. म्हणून विद्वान ज्ञाता मनुष्यांकरिता हेच उचित कर्म आहे की ब्रह्मविद्या (म्हणजे परमेश्‍वराची भक्ती-उपासना) जाणावी आणि पदार्थ विद्येचे (भौतिकशास्त्र) ज्ञान मिळवून त्याचे निरंतर रक्षण करावे. अशा प्रकारे ज्ञान विज्ञानाद्वारे रक्षण-लाभ प्राप्त करून मनुष्यांनी परमेश्‍वरास आणि विद्वानांनी प्रिय असलेले कर्म आचरावेत. ॥11॥
Subject
अग्नी या शब्दाच्या अनेक अर्थांचे ज्ञान संपादित करून त्यांपासून काय काय उपकार (लाभ) मिळविले पाहजिेत, पुढील मंत्रात या विषयीचे प्रतिपादन केले आहे -