Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 4 / Mantra 10

37 Mantra
4/10
Devata- यज्ञो देवता Rishi- आङ्गिरस ऋषयः Chhand- निचृत् आर्षी जगती,साम्नी त्रिष्टुप् Swara- निषादः
Mantra with Swara
ऊर्ग॑स्याङ्गिर॒स्यूर्ण॑म्रदा॒ऽऊर्जं॒ मयि॑ धेहि। सोम॑स्य नी॒विर॑सि॒ विष्णोः॒ शर्मा॑सि॒ शर्म॑ यज॑मान॒स्येन्द्र॑स्य॒ योनि॑रसि सुऽस॒स्याः कृ॒षीस्कृ॑धि। उच्छ्र॑यस्व वनस्पतऽऊ॒र्ध्वो मा॑ पा॒ह्यꣳह॑स॒ऽआस्य य॒ज्ञस्यो॒दृचः॑॥१०॥

ऊर्क्। अ॒सि॒। आ॒ङ्गि॒र॒सि॒। ऊर्ण॑म्रदा॒ इत्यूर्ण॑ऽम्रदाः। ऊर्ज॑म्। मयि॑। धे॒हि॒। सोम॑स्य। नी॒विः। अ॒सि॒। विष्णोः॑। शर्म॑। अ॒सि॒। शर्म॑। यज॑मानस्य। इन्द्र॑स्य। योनिः॑। अ॒सि॒। सु॒स॒स्या इति॑ सुऽस॒स्याः। कृ॒षीः। कृ॒धि॒। उत्। श्र॒य॒स्व॒। व॒न॒स्प॒ते॒। ऊ॒र्ध्वः। मा॒। पा॒हि॒। अꣳह॑सः। आ। अ॒स्य। य॒ज्ञस्य॑। उ॒दृच॒ इत्यु॒त्ऽऋचः॒ ॥१०॥

Mantra without Swara
ऊर्गस्याङ्गिरस्यूर्णम्रदा ऊर्जं मयि धेहि । सोमस्य नीविरसि विष्णोः शर्मासि शर्म यजमानस्येन्द्रस्य योनिरसि सुसस्याः कृषीस्कृधि । उच्छ्रयस्व वनस्पत ऊर्ध्वा मा पाह्यँहस आस्य यज्ञस्योदृचः ॥

ऊर्क्। असि। आङ्गिरसि। ऊर्णम्रदा इत्यूर्णऽम्रदाः। ऊर्जम्। मयि। धेहि। सोमस्य। नीविः। असि। विष्णोः। शर्म। असि। शर्म। यजमानस्य। इन्द्रस्य। योनिः। असि। सुसस्या इति सुऽसस्याः। कृषीः। कृधि। उत्। श्रयस्व। वनस्पते। ऊर्ध्वः। मा। पाहि। अꣳहसः। आ। अस्य। यज्ञस्य। उदृच इत्युत्ऽऋचः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वनस्पते) शोध व नूतन आविष्करणास योग्य अशा ज्या विद्या किंवा ज्ञान आहे, त्या विद्यांचा प्रकाश व विकास करणार्‍या हे विद्वान (ज्ञानी वैज्ञानिका) (आङ्गिरसि) अग्नी आदी पदार्थांच्या साह्याने गुणांचे ज्ञान प्राप्त करून (ऊर्णम्म्रदाः) काही दोष व अवगुण असतील त्यांना दूर करून व (ऊर्स) पराक्रम तसेच अन्न-उत्पादनाची वृद्धी करणारी जी शिल्पविद्या (असि) आहे अथवा जी शिल्पविद्या बल आणि अन्नादींना धारण करीत (असि) असते तसेच जी शिल्पविद्या (सोमस्य) उत्पादित पदार्थांचे (नीवि) संरक्षण व संवर्धन करणारी आहे, त्याचप्रमाणे जी शिल्प विद्या (विष्णोः) गतिमान बुद्धी व विचारांना प्रेरणा देते (यजमानस्य) व सिद्धान्तांच्या कृती व व्यवहाराचे ज्ञान देते. (इन्द्रस्थ) परमोच्च ऐश्‍वर्याने युक्त अशा मनुष्याच्या बुद्धिमत्तेचे (योनिः) जी कारण (असि) आहे. तसेच जी शिल्पविद्या (अस्य) या (उद्दचः) ऋचांच्या अर्थांचे दर्शन घडविणारी आहे. (यज्ञस्य) शिल्प विद्येचे यंत्र-तंत्र कार्यपद्धती सांगणारी आहे (शर्म) व सुखदायक (असि) आहे. असे इतके अतिउपकारक लाभ देणार्‍या शिल्पविद्येला ज्ञान घेण्यास मी उत्सुक आहे (मयि) माझ्यासारख्या जिज्ञासू व्यक्तीस (आघेहि) ती शिल्पविद्या व कृती शिकविण्यासाठी व माझा स्वीकार कर. या शिल्पविद्येद्वारे (सुसस्याः) उत्कृष्ट धान्य उत्पन्न करण्यासाठी (कृषीः) व आकर्षण करणार्‍या यंत्रांचा (म्हणजे सिंचन पद्धतींचा) (कृधि) शोध नवा. (उर्ध्वः) उत्कर्ष व उन्नतीची कामना करणार्‍या (मा) मला (व माझ्यासारख्या कृषीशील जनांना) (उच्छ्रयस्व) उत्तम धान्य देणार्‍या शेतीचे ज्ञान दे. तसेच (अंहसः) पाप आणि दुःख यांपासून माझे व सर्वांचे (पाहि) रक्षण कर. विमान आदी यानांमधे जे उंच व मोठे यंत्रादी वापरले जातात वा यज्ञामधे (वनस्पते) वृक्षाची जी उंच शाखा उभी केली जाते, त्याचाही (कृषी आदी विद्यांच्या प्रगतीसाठी) (उच्छ्रयस्व) उचित उपयोग कर. (विद्यावान ज्ञानी वैज्ञानिकांनी अग्नी आदी पदार्थच्या योग्य गुणांचा ज्ञान प्राप्त करावा. शिल्प विद्येचे विज्ञानाचे, यंत्र तंत्र विकसित करावे. वेदमंत्रात सांगितलेल्या ज्ञान व कृतीची माहिती निष्ठेने मिळवावी व त्यापासून कृषी व मंत्रालयाचा विकास करून त्याद्वारे सर्वांना उपकृत करावे. विमानादी गतिशील यान-वाहनादीचा उपयोगही सर्वांसाठी उपकारक होईल, असाच करावा. हा एवढा गहन संदेश वेदमंत्रात दिला असून स्वामी दयानंद सरस्वती यांनी मंत्रातील तो अर्थ व्यक्त करून सर्वांना सांगितला आहे) ॥10॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी विद्वानांच्या सहवासात राहून शिल्पविद्येचे ज्ञान मिळवावे व त्याचा प्रसार करून सर्व मनुष्यांना सुखी व समृद्ध केले पाहिजे ॥10॥
Subject
हा शिल्पविद्या यज्ञ कसा आहे, पुढील मंत्रात हा विषय विशद केला आहे -