Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 39 / Mantra 7

13 Mantra
39/7
Devata- मरुतो देवताः Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- भुरिग्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒ग्रश्च॑ भी॒मश्च॒ ध्वान्तश्च॒ धुनि॑श्च।सा॒स॒ह्वाँश्चा॑भियु॒ग्वा च॑ वि॒क्षिपः॒ स्वाहा॑॥७॥

उ॒ग्रः। च॒। भी॒मः। च॒। ध्वा᳖न्त॒ इति॒ धुऽआ॑न्तः। च॒। धुनिः॑। च॒ ॥ सा॒स॒ह्वान्। स॒स॒ह्वानिति॑ सस॒ह्वान्। च॒। अ॒भि॒यु॒ग्वेत्य॑भिऽयु॒ग्वा। च॒। वि॒क्षिप॒ इति॑ वि॒क्षिपः॑। स्वाहा॑ ॥७ ॥

Mantra without Swara
उग्रश्च भीमश्च ध्वान्तश्च धुनिश्च । सासह्वाँश्चाभियुग्वा च विक्षिपः स्वाहा ॥

उग्रः। च। भीमः। च। ध्वान्त इति धुऽआन्तः। च। धुनिः। च॥ सासह्वान्। ससह्वानिति ससह्वान्। च। अभियुग्वेत्यभिऽयुग्वा। च। विक्षिप इति विक्षिपः। स्वाहा॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, मृत्यूनंतर जीवात्मा (स्वाहा) आपापल्या कर्माप्रमाणे (वेगवेगळ्या स्वभावाचा असतो) पैकी कोणी (उग्रः) उग्र स्वभावाचा (च) तर कोणी शान्त असतो. कोणी (भीमः) भयदायक (च) कोणी निर्भय असतो. कोणी (ध्वान्तः) अंधकारमय (च) तर कोणी प्रकाशमय असतो. कोणी (धुनिः) कम्पमान (च) तर कोणी निष्कम्प असतो. कोणी (सासह्वान्) सहनशील (च) तर कोणी असहिष्णु असतो. कोणी (अभियुग्वा) सर्वदा नियमाप्रमाणे वागणारा (च) तर कोणी सर्वाहून वेगळा असतो तर कोणी कोणी (विक्षिपः) विक्षेपवान (विशिष्टपणे आचरण करणारा) असतो ॥7॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जे जीव पापाचारी असतात ते कठोर स्वभावाचे तर धर्मात्मा जीव शांत स्वभावाचे असतात, जे भीती घालणारे असतात ते भीम तर जे स्वतः भयग्रस्त आहेत, ते भीतात्मा असतात. जे अभय देणारे असतात ते निर्भय तर जे अविद्यावान असतात, ते अंधकारात चाचपडणारे असतात, पण जे विद्यावान योगी असतात, ते प्रकाशवान असतात. जे जीवात्मा जितेंद्रिय नसतात, ते चंचल स्वभावाचे, तर ते चंचल नसतात, ते स्थिर व शांत आपापल्या कर्मांची फळें सहन करत-भोगत विशिष्ट स्वभाव प्राप्त करून या जगात नित्य भ्रमण करतात, असे तुम्ही स्पष्टपणे जाणून घ्या. ॥7॥
Subject
कोणते जीवात्मा कोणत्या गुणांचे असतात, याविषयी -