Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 39 / Mantra 4

13 Mantra
39/4
Devata- श्रीर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- निचृद्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
मन॑सः॒ काम॒माकू॑तिं वा॒चः स॒त्यम॑शीय।प॒शू॒ना रू॒पमन्न॑स्य॒ रसो॒ यशः॒ श्रीः श्र॑यतां॒ मयि॒ स्वाहा॑॥४॥

मन॑सः। काम॑म्। आकू॑ति॒मित्याऽकू॑तिम्। वाचः। स॒त्यम्। अ॒शी॒य॒ ॥ प॒शू॒नाम्। रू॒पम्। अन्न॑स्य। रसः॑। यशः॑। श्रीः। श्र॒य॒ता॒म्। मयि॑। स्वाहा॑ ॥४ ॥

Mantra without Swara
मनसः काममाकूतिञ्वाचः सत्यमशीय । पशूनाँ रूपमन्नस्य रसो यशः श्रीः श्रयताम्मयि स्वाहा ॥

मनसः। कामम्। आकूतिमित्याऽकूतिम्। वाचः। सत्यम्। अशीय॥ पशूनाम्। रूपम्। अन्नस्य। रसः। यशः। श्रीः। श्रयताम्। मयि। स्वाहा॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (देह सोडून गेलेला जीवात्मा आपले मनोगत वा कामना व्यक्त करीत आहे, या मंत्राचा मतितार्थ समजण्यासाठी अशी कवि-कल्पना करणे आवश्यक आहे.) (जीवात्मा म्हणतो) हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे मी (जीवात्मा) (स्वाहा) सत्य विधीद्वारे पूर्वी सांगितलेल्या रीतीने दाहकर्म झाल्यानंतर (पुढील जन्मी) (मनसः) अंतःकरण आणि (वाचः) उत्तम वाणी (प्राप्त करावी) तसेच (सत्यम्) (कामम्) सत्य आणि उत्तमकामनांची पुर्ती इच्छितो आणि (आकूतिम्) मला (पुढीलजन्मी) उत्साह, (पशूनाम्) गौआदी पशूं (रूपमा्) सुंदर रूप (अशीय) मिळावे (अशी कामना करीत आहे) (मयि) माझ्यात म्हणजे जीवात्म्यात (अन्नस्य) (रसः) अन्न आदीचे मधुर स्वादिष्ट रस तसेच (यशः) कीर्ती (श्रीः) शोभा व ऐश्‍वर्य (श्रयताम्) आदीनी आश्रय घ्यावा. ज्याप्रमाणे माझी कामना की मला हे सर्व मिळावे, तद्वत हे मनुष्यहो, तुम्हासही हे सर्व मिळो वा हे सर्व तुमच्या आश्रयाखाली असावेत. ॥4॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक शुभ विज्ञान, उत्साह आणि सत्य वचनाद्वारे मृतदेहाचा दाहकर्म विधिपूर्वक करतात, ते पशू, प्रजा, धनधान्य आदी पदार्थ पुरुषार्थाद्वारे अवश्य प्राप्त करतात. ॥4॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी.