Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 39 / Mantra 1

13 Mantra
39/1
Devata- अग्निर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
स्वाहा॑ प्रा॒णेभ्यः॒ साधि॑पतिकेभ्यः। पृ॒थि॒व्यै स्वाहा॒ऽग्नये॒ स्वाहा॒ऽन्तरि॑क्षाय॒ स्वाहा॑ वा॒यवे॒ स्वाहा॑। दि॒वे स्वाहा॒। सूर्या॑य॒ स्वाहा॑॥१॥

स्वाहा॑। प्रा॒णेभ्यः॑। साधि॑पतिकेभ्य॒ इति॒ साधि॑ऽपतिकेभ्यः ॥ पृ॒थि॒व्यै। स्वाहा॑। अग्नये॑। स्वाहा॑। अ॒न्तरि॑क्षाय। स्वाहा॑। वायवे॑। स्वाहा॑। दि॒वे। स्वाहा॑। सूर्य्या॑य। स्वाहा॑ ॥१ ॥

Mantra without Swara
स्वाहाप्राणेभ्यः साधिपतिकेभ्यः पृथिव्यै स्वाहेग्नये स्वाहेन्तरिक्षाय स्वाहा वायवे स्वाहा । दिवे स्वाहा । सूर्याय स्वाहा ॥

स्वाहा। प्राणेभ्यः। साधिपतिकेभ्य इति साधिऽपतिकेभ्यः॥ पृथिव्यै। स्वाहा। अग्नये। स्वाहा। अन्तरिक्षाय। स्वाहा। वायवे। स्वाहा। दिवे। स्वाहा। सूर्य्याय। स्वाहा॥१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्हास उचित आहे की (साधिपतिकेभ्यः) इंद्रियांचा अधिपती जो जीव वा त्याच्या सह विद्यमान (प्राणेभ्यः) प्राणांकरिता (स्वाहा) सत्य क्रिया (करा) (पृथिव्यै) भूमीकरिता (स्वाहा) सत्यवाणीचा उपयोग करा (अग्नेय) अग्नीसाठी (स्वाहा) सत्य क्रिया करा (अन्तरिक्षाय) मृत्युनंतर जीव आकाशात विहार करतो, त्यासाठी) आकाशाकरिता (स्वाहा) सत्यवाणीचा उपयोग करा. (वायवे) वायूप्राप्ती अर्थ (स्वाहा) सत्यक्रिया करा (दिवे) विद्युतप्राप्ती अर्थ (स्वाहा) सत्य वाणीचा आणि (सूर्य्याय) सूर्यमंडळाच्या प्राप्तीअर्त (स्वाहा) सत्य क्रिया करा (पंच महाभूतानी बनलेले शरीर, अग्नी, वायू आदी तत्त्वांकरिता परत गेले त्या त्या तत्वांना परत जाण्यासाठी चिता हे साधन व अंत्येष्टि हा उचित मार्ग आहे, म्हणून मृतदेहासाठी योग्य त्या सत्य क्रिया अवश्य करावी, हा आशय आहे) ॥1॥
Essence
भावार्थ - या अध्यायात अन्त्येष्टिकर्माचे वर्णन आहे. या कर्मास नरमेध, पुरुषमेधही म्हणतात. जेव्हा कोणा मनुष्याच्या मृत्यू होतो, तेव्हा मृतदेहाच्या भस्मीकरणासाठी त्या मृतशरीराच्या व वजनाएवढे तूप घ्यावे, त्यात एका शेर मापास एक गुंज कस्तूरी, एक मासा केशर, आणि चंदन आदी काष्ठें यथावश्यक प्रमाणात आणावीत. नंतर चिता रचण्याची रीती अशी की चितेची लांबी, ‘माणूस हात उंचावून जेवढी उंची होईल, तेवढी लांब असावी. साडे तीन हात रुंद आणि इतकीच खोल असावी. भूमीमधे एक वीत एवढी खोल एवढी जागा खोदून घ्यावी. त्यावर खालून वरपर्यंत समिधा रचून घ्याव्यात. त्यावर मृतदेह ठेवून देहाच्या दोन्ही बाजूस आणि वर समिधा चांगल्या प्रकारे रचाव्यात. छाती आदी अवयवांवर कापूर व ??? ठेवून, कापूर पेटवून त्याद्वारे चिता पेटवावी जेव्हा अग्नी चांगल्याप्रकारे प्रदीप्त होईल, तेव्हा या अध्यायाच्या स्वाहान्त मंत्रांची वारंवार आवृत्ती करीत तुपाच्या आहुती देत शवास सम्यकरीत्यां भस्म करावे. अशा पद्धतीने शवाचे दाहकर्म करणार्‍यांना यज्ञकर्म केल्याएवढे फळ मिळते. या शिवाय लक्षात ठेवण्यासारखे हे की मृतदेहाला कधीही भूमीत पुरणे, गाडून टाकणे आदी कर्म करू नये, तसेच जंगलात टाकून येऊ नये, पाण्यात बुडवूं नये, त्या देहाची केवळ दाहकर्माद्वारे अंत्येष्टि करावी. जे लोक दाहकर्म न करता अन्य मार्गांचा अवलंब करतात, ते महापाप करतात. कारण की मृतदेहाच्या विकृतावस्थेमुळे दुर्गंधी वाढते आणि त्यामुळे चराचर जगामध्ये अगणित रोग उत्पन्न होतात. यामुळे पूर्वी वर्णित विधीप्रमाणे शवाचे दाहकर्म करण्यातच सर्वांचे कल्याण आहे, अन्यप्रकारे कदापी नव्हे ॥1॥
Subject
आता एकोणचाळीसाव्या अध्यायाचा आरंभ केला जात आहे. या अध्यायाच्या प्रथम मंत्रात अंत्येष्टिकर्म (अंत्यविधि-संस्कार) या विषयी सांगितले आहे -